अनेकदा आपल्या लक्षात येते की, आपण खाली बसतो, उठतो तेव्हा आपल्या हाडांमधून कटकट असा आवाज येतो. ही समस्या सहसा गुडघे, घोटे, कंबर, हाताचे कोपरे आणि पायांच्या हाडांमध्ये दिसून येते. कधीकधी हा आवाज सामान्य असतो, परंतु जर त्यासोबत वेदना, कडकपणा किंवा सूज येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरत नाही. वाढत्या वयासोबतच शरीरही हळूहळू कमकुवत होऊ लागते आणि नंतर हाडांमध्ये वेदना आणि कमकुवतपणा येऊ लागतो. चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे, अगदी लहान वयातच हाडे कमकुवत होऊ लागतात आणि त्यातून कट-कट आवाज येऊ लागतो. जर लहान वयातच हाडांमधून कट-कट आवाज येऊ लागले, तर ती फक्त एक किरकोळ समस्या असू शकत नाही. हे ऑस्टियोपोरोसिस किंवा संधिवातासारख्या हाडांशी संबंधित आजारांचे लक्षण असू शकते. (Joints Sound)
मात्र दरवेळेस हाडांमधून येणारा कटकट आवाज हा आजाराशीच संबंधित आहे असे नाही. सांध्यांमधील ग्रीस कमी झाल्यानंतर हाडांसंबंधित अनेक समस्या वाढू लागतात. बऱ्याचदा ही समस्या सामान्य समजून दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. या समस्येवर योग्य वेळी उपचार न झाल्यामुळे अर्धांगवायू, गठिया किंवा पूर्ण सांध्याचा नाश होण्याची जास्त शक्यता असते. हाडांमधून येणारा आवाज अनेक कारणे असू शकतात. जेव्हा शरीरात असलेले वायूचे बुडबुडे सांध्यामध्ये अडकतात आणि दाबामुळे अचानक बाहेर पडतात तेव्हा क्रॅकिंगचा आवाज ऐकू येतो. याशिवाय, सांध्यांमध्ये स्नेहन नसणे, वाढते वय, अशक्तपणा, पोषणाचा अभाव आणि संधिवात यासारख्या समस्यांमुळे हाडांमधून आवाज येऊ शकतो. (Marathi)
जर तुम्ही बराच वेळ एकाच स्थितीत बसलात आणि नंतर अचानक उभे राहिलात तर तुमच्या पायातील स्नायू आणि अस्थिबंधन ताणले जातात, ज्यामुळेकटकटचा आवाज येतो. कधीकधी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे देखील हे होऊ शकते. हाडातून कटकट आवाज येण्यासह वेदना होत नसतील, तर सहसा काळजी करण्यासारखे काही नसते. पण जर तुम्हाला ही समस्या सतत येत असेल आणि वेदना किंवा सूज देखील येत असेल, तर काही घरगुती उपाय आणि जीवनशैलीतील बदल तुम्हाला मदत करू शकतात. (Latest Marathi Headline)

हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी समृद्ध आहार घ्या. दूध, दही, चीज, हिरव्या भाज्या, काजू आणि सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन डी मिळवा. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे सांध्यामधील स्नेहन कमी होते, ज्यामुळे हाडे कटकट करण्याची समस्या वाढू शकते. दिवसभर पुरेसे पाणी प्या. हलके स्ट्रेचिंग व्यायाम करा, जेणेकरून सांध्यांची लवचिकता टिकून राहील आणि स्नायूंमध्ये कडकपणा येणार नाही. योगा आणि चालणे देखील फायदेशीर ठरू शकते. सांध्याची मालिश केल्याने रक्ताभिसरण वाढते आणि हाडांना पोषण मिळते. दररोज मोहरी किंवा नारळाच्या तेलाने हलका मालिश करा. (Top Trending News)
जास्त वजनामुळे सांध्यावर दबाव वाढतो, ज्यामुळे हाडातून कटकट आवाज येते आणि वेदना होऊ शकतात. संतुलित आहार आणि नियमित व्यायामाने तुमचे वजन नियंत्रित करा. शिवाय तुम्ही तुमच्या आहारात देखील बदल करा. आहारात व्हिटॅमिन आणि कॅल्शियमने युक्त पदार्थांचे सेवन केले पाहिजे. संत्री हे फळ व्हिटॅमिन सीचे उत्तम स्त्रोत आहे. संत्रीमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी देखील असते. यामुळे आरोग्य सुधारते. तीळ हे कॅल्शियमचे उत्तम स्त्रोत आहे. सर्व वयोगटातील लोकांनी तीळ खावे. हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. आहारात पालक अन् ब्रोकोलीचा समावेश करा. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करा. दुग्धजन्य पदार्थ कॅल्शियमचे उत्तम स्त्रोत आहे. मुख्य म्हणेज असा कटकट आवाज येण्यामागे सांध्यांमधील ग्रीस कमी होणे हे देखील एक कारण असू शकते. (Top Stories)
=======
Health : पोटाचा घेर कमी करायचा? मग ‘हे’ उपाय करून पाहाच
=======
तुमच्या आहारात सांध्यांमधील ग्रीस कायम टिकवून ठेवण्यासाठी ओमेगा-३ फॅटी ॲसिडयुक्त अन्न, दूध, नारळ पाणी, नट्स इत्यादी पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे सांध्यांमधील वेदना कमी होतात आणि गुडघे दुखीची समस्या उद्भवत नाही. या पदार्थांचे सेवन केल्यामुळे सांध्यांमध्ये आवश्यक ल्युब्रिकेशन मिळते, ज्यामुळे वेदना कमी होतात. भिजवलेल्या बदामांमधील पोटॅशियम आणि ओमेगा-3 फॅटी ॲसिड हाडांच्या वाढीसाठी महत्त्वाचे आहेत आणि यामुळे हाडांची मजबुती टिकून राहते. गूळ आणि भाजलेले चणे कॅल्शियमचे चांगले स्रोत आहेत आणि यामुळे सांधे मजबूत होतात. हाडे मजबूत करण्यासाठी वजन उचलण्याचे व्यायाम खूप प्रभावी आहेत. चालणे, धावणे आणि उड्या मारणे यामुळे हाडे मजबूत होतात. याशिवाय, योगा आणि स्ट्रेचिंग केल्याने हाडे आणि सांध्यामध्ये लवचिकता येते. तुमचे वय 35-40 च्या दरम्यान असेल किंवा अधिक त्रास असेल तर संबंधित विषयातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics