Home आंतरराष्ट्रीय Mojtaba Khamenei : मोजतबा कोमात… इराणची सत्ता आयआरजीसीकडे
आंतरराष्ट्रीय

Mojtaba Khamenei : मोजतबा कोमात… इराणची सत्ता आयआरजीसीकडे

71

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला काही तासांची मुदत दिली आहे. ट्रम्प यांनी दिलेल्या धमकीला इराणकडूनही तशाच स्वरूपाचे उत्तर देण्यात आले आहे. मात्र या सर्वात इराणमधील सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांच्यासंदर्भात बातमी आली आहे. अमेरिकेने इराणवर पहिला हल्ला केला तेव्हापासून मोजतबा खामेनी हे गंभीर जखमी असल्याची चर्चा होती. मोजतबा यांच्यावर उपचार करण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना रशियाला हलवण्यात आल्याचीही माहिती पुढे आली. पण या युद्धाला चाळीस दिवस होताहोता, मोजतबा खामेनी हे इराणमध्येच असल्याची पुष्टी करण्यात आली आहे. इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी बेशुद्ध असून त्यांच्यावर पवित्र शहरात उपचार सुरू असल्याचा दावा करण्यात आला. हे पवित्र शहर कोम आहे. शिया धर्मीयांसाठी कोम शहर अतिशय पवित्र आहे. येथे इमाम अली इब्न मूसा रिदा यांची बहीण फातिमा बिंत मूसा यांची कबर आहे. हे शहर जगातील शिया विद्वत्तेचे सर्वात मोठे केंद्र आणि एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते, आणि जगभरातील शिया येथे अध्ययनासाठी येतात. याच कोम शहरात मोजतबा खामेनी यांच्यावर उपचार सुरू असल्याची बातमी आल्यावर आता इस्रायलने या शहरावर सर्वात मोठा हल्ला केला आहे. कोम शहरातील एका इमारतीमध्ये मोजतबा खामेनी यांच्यावर उपचार सुरू असल्यामुळे या शहरात सर्वत्र सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ( Mojtaba Khamenei )

अमेरिका-इस्रायल-इराण युद्धामध्ये ३९ व्या दिवसानंतर तणाव अधिक वाढला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पाषाणयुगात पोहोचवण्याची धमकी दिली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही अमेरिकेला जशास तसे उत्तर देणार असल्याचे सांगितले आहे. या सर्वात इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी कुठे आहेत, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी हे अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये ठार झाल्यावर आता इराणमध्ये नेतृत्व नेमके कुणाचे आहे, याची चर्चा सुरू झाल्यावर मोजतबा खामेनी यांच्या तब्येतीसंदर्भात माहिती पुढे आली आहे. इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी बेशुद्ध असून, देश चालवण्यास असमर्थ असल्याचेही वृत्त आहे. तसेच त्यांच्यावर इराणमधील सर्वात पवित्र शहरात उपचार सुरू असल्याच्या सुरुवातीला बातम्या आल्या. यानंतर काही तासांतच मोजतबा खामेनी यांच्यावर ज्या शहरात उपचार सुरू आहेत, त्याचे नावही पुढे आले. मोजतबा यांच्यावर कोम शहरात उपचार सुरू आहेत. त्यांच्याभोवती अत्यंत विश्वासू साथीदारांचे कडे आहे. मोजतबा यांच्या कुटुंबातील अनेक नातेवाईक अमेरिकेच्या हल्ल्यात मारले गेले आहेत. मात्र जे नातेवाईक जिवंत आहेत, ते आता मोजतबा यांच्यासोबत कोम शहरातील एका इमारतीमध्ये असल्याचीही माहिती पुढे आली. २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या इस्रायली आणि अमेरिकन हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनी मारले गेले. मात्र मोजतबाही गंभीर जखमी झाले. मोजतबा हे कोमात असून त्यांना त्यांच्या आसपास होत असलेल्या घटनांबाबतही माहिती नाही. इराणच्या कायद्यानुसार त्यांना सर्वोच्च पद बहाल करण्यात आल्यामुळे आयआरजीसी मोजतबा यांचे नाव पुढे करून अमेरिका, इस्रायलसोबत युद्ध करत आहे. तसेच मध्यपूर्वेत होत असलेले हल्लेही आयआरजीसीमार्फत होत असल्याची माहिती आहे. इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मोजतबा खामेनी यांच्यावर कोममध्ये गंभीर अवस्थेत उपचार सुरू आहेत आणि ते कोणत्याही सरकारी निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊ शकत नाहीत, त्यामुळे संपूर्ण इराणची व्यवस्था आयआरजीसीच्या ताब्यात आली आहे.

=======

हे देखील वाचा : Dubai’s tourism And Hotel Industry : युद्धामुळे दुबईची चमक हरवली

=======

मोजतबा खामेनी यांच्यावर ज्या कोम शहरामध्ये उपचार सुरू आहेत, त्याच कोम शहरात सध्या एक मोठे समाधीस्थळ बांधण्याचे काम वेगात सुरू आहे. इराणची राजधानी तेहरानपासून दक्षिणेला सुमारे १४० किलोमीटर अंतरावर असलेल्या कोम शहरात दहाहून अधिक कबरी बांधण्यात येत आहेत. त्यात दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील मृत सदस्यांचे दफन करण्यात येणार आहे. ही बातमी बाहेर आल्यावर इस्रायलने आता कोम शहराला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. ज्या भागात समाधीस्थळाचे काम चालू आहे, तेथे जोरदार बॉम्बहल्ला करण्यात आला आहे. यामध्ये काही विशिष्ट इमारतींनाही लक्ष्य केले असून त्यामध्येच मोजतबा खामेनी यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले होते. या हल्ल्याबाबत इराणने अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ( Mojtaba Khamenei )

सई बने…

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Katrina Kaif
आंतरराष्ट्रीय

Jiang Xueqin : चीनच्या नॉस्ट्राडॅमसने सांगितले ट्रम्पचे भविष्य

अमेरिका-इराण युद्धामध्ये पंधरा दिवसांचा विराम आला आहे. यात चीनची भूमिका असल्याची माहिती...

Jewellery
आंतरराष्ट्रीय

Jared Kushner : ट्रम्पचा जावई आहे तरी कोण

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर कायमचा विराम आणण्यासाठी पाकिस्तानची राजधानी...

Mobile
आंतरराष्ट्रीय

First Lady Melania Trump : अमेरिकेच्या फर्स्ट लेडीसाठी शाही सवारी

इराणमध्ये सत्तांतर करण्याच्या हेतूने अमेरिकेने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरुद्ध लष्करी मोहीम...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!