Home आरोग्य Sweating : घामोळ्यांच्या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी उपाय
आरोग्य

Sweating : घामोळ्यांच्या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी उपाय

75

सध्या उन्हाचा पार कमालीचा वाढताना दिसत आहे. या उन्हामुळे घाम येण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. घाम येणे ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी अतिघाम येण्यामुळे दुसरे त्रास होण्याची देखील शक्यता असते. उन्हाळ्यात सर्वात जास्त त्रास होतो तो घामोळ्यांचा. उन्हाळ्यात किंवा दमट हवामानात जास्त घाम आल्यामुळे त्वचेवरील घामाच्या नलिका बंद होतात, तेव्हा घाम त्वचेखाली अडकून घामोळ्या येतात. यामुळे त्वचेवर बारीक लाल पुरळ उठतात, खाज सुटते आणि जळजळ होते. याशिवाय घट्ट किंवा सिंथेटिक कपड्यांमुळे त्वचेवर घर्षण होऊन हवा खेळती राहत नाही. त्यामुळे देखील घामोळ्या येतात. त्वचेवर जमा झालेली धूळ आणि घामामुळे त्वचा रंध्रे बंद झाल्यामुळे आणि अतिप्रमाणात लोशन किंवा क्रीम लावल्यानेही छिद्रे बंद होऊन घामोळ्या येतात. घामोळ्यांची समस्या टाळण्यासाठी शारीरिक स्वच्छता राखणं आवश्यक आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास त्वचा विकार गंभीर होण्याची शक्यता असते. सोपे घरगुती उपाय करून ही समस्या तुम्ही दूर करू शकता. (Sweating)

कोरफडचा गर
कोरफड हे त्वचेसाठी सर्वोत्तम असलेले एक औषध आहे. यामुळे त्वचारोगांमध्ये मोठ्या प्रमाणात आराम मिळतो. अंगावर घामोळ्या येत असेल तर शक्यतो कोरफचा गर वापरा मात्र पर्याय नसेल तर कोरफडचा चांगल्या प्रतीचा जेल वापरा. सातत्याने खाज येणाऱ्या जागेवर कोरफडचा गर किंवा जेल चोळा. त्यानंतर १० मिनिटांनी त्वचा धुवून घ्या आणि टॉवेलने हलक्या हाताने पुसून काढा. (Summer Care)

खोबरेल तेल
नारळाच्या तेलामध्ये असलेले प्रक्षोभक आणि अँटी-बॅक्टेरियल घटक त्वचेशी संबंधित अनेक समस्या जसे की त्वचेवर पुरळ उठणे, खाज सुटणे, जळजळ होणे इत्यादी कमी करू शकतात. या तेलाचा वापर तुम्ही रोज रात्री करू शकता. त्वचेवर पुरळ येण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी खोबरेल तेल आणि कापूरचाही वापर केला जाऊ शकतो. हा उपाय करण्यासाठी खोबरेल तेलात कापूर बारीक करून मिक्स करा आणि ते मिश्रण प्रभावित भागावर लावा. हे मिश्रण संक्रमित भागावर दिवसातून दोनदा लावल्याने या समस्येपासून आराम मिळतो. (Marathi)

कच्चा बटाटा
बटाटा हा त्वचेसाठी एक नैसर्गिक ब्लिचचे काम करतो. त्यामुळे त्वचेवरील अनेक अपायकारक गोष्टींना कच्चा बटाटा हा खोलवर जाऊन स्वच्छ करतो. उन्हाळ्यात घामोळ्यांचा त्रास असेल तर त्यावर तुम्ही कच्च्या बटाट्याचा रस प्रथम तयार करून घ्या. यामध्ये गुलाब पाणी मिसळा. हा रस त्वचेला लावा. थोडा वेळाने कोमट पाण्याने त्वचा धुवून टॉवेलने हळूहळू पुसून कोरडी करा. (Todays Marathi Headline)

Sweating

मुलतानी माती
मुलतानी माती त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. उष्णतेमुळे होणारी उष्माघात याच्या वापराने कमी करता येते. मुलतानी मातीमध्ये प्रतिजैविक गुणधर्म आहेत. ते बुरशी, बॅक्टेरिया, विषाणू वाढण्यापासून प्रतिबंधित करते. घामोळ्यांची उष्णता टाळण्यासाठी तुम्ही मुलतानी मातीची पेस्ट लावू शकता. एक किंवा दोन चमचे मुलतानी माती घ्या, आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि पेस्ट बनवल्यानंतर घामोळ्यांच्या भागावर लावा. 15 मिनिटांनी कोरडे झाल्यानंतर थंड पाण्याने धुवा. आठवड्यातून 4 दिवस असे केल्यास उन्हापासून आराम मिळेल. (Social Updates)

तुळशीची पाने
तुळशीच्या पानांच्या सेवनाने पुरळ आणि खाज येण्यापासून आराम मिळतो. तुम्ही ते त्वचेवरही लावू शकता. यामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीमाइक्रोबियल गुणधर्म त्वचेची खाज दूर करतात. यामध्ये कापूर, युजेनॉल आणि थायमॉल नावाचे घटक असतात, जे त्वचेवरील खाज दूर करतात. तुळशीची पाने पाण्यात टाकून पेस्ट बनवा आणि त्वचेवर लावा. (Top Marathi News)

चंदन पावडर  
घामोळ्यांवर चंदन पावडर लावल्यानेही आराम मिळतो. चंदनमध्ये प्रतिजैविक गुणधर्म देखील असतात जे उष्णतेवरील पुरळ कमी करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. हा गुणधर्म उष्णता निर्माण करणार्‍या जीवाणूंशी लढण्यास मदत करू शकतो. याशिवाय चंदनाच्या पावडरमध्ये कूलिंग इफेक्ट असतो जो त्वचेला थंड ठेवण्यासह चिडचिड, खाज सुटण्यास मदत करतो. दोन चमचे चंदन पावडरमध्ये 4 ते 5 चमचे गुलाब जल टाकून पेस्ट बनवा. ही पेस्ट प्रभावित भागावर लावा. 10 ते 15 मिनिटांनंतर तुम्ही ते थंड पाण्याने धुवा. हे आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरले जाऊ शकते. याचा मोठा फायदा होऊ शकतो. (Latest Marathi Headline)

काकडी
उन्हाळ्यामध्ये काकडीचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. कारण यातील पोषण तत्त्वांमुळे शरीराला थंडावा मिळतो. शरीर हायड्रेट राहण्यास मदत मिळते. काकडीमुळे घामोळ्यांचा त्रास देखील कमी होतो. काकडी फेस मास्क लावल्यास त्वचेवर चमक येते आणि थंडावा देखील मिळतो. घामोळ्यांपासून सुटका मिळवण्यासाठी काकडीचे स्लाइस कापून घ्या. काही मिनिटांसाठी फ्रीजमध्ये थंड होण्यास ठेऊन द्या. यानंतर घामोळ्यांवर हे स्लाइस ठेवा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही काकडीची पेस्ट करूनही वापरू शकता. (Top Trending News)

=========

Skin Care : हायपरपिग्मेंटेशनपासून सुटका हवी? घरच्याघरी करा हे 5 सोपे उपाय

Skin Care : फेसमास्क लावताना करू नका या 5 चुका; अन्यथा त्वचेचे होईल मोठे नुकसान

DIY Body Scrub : किचनमधील वस्तूंनी तयार करा नैसर्गिक बॉडी स्क्रब, फक्त 15 रुपयांत मिळवा ग्लोइंग त्वचा

=========

कडूलिंब
कडूलिंब हा त्वचा विकारांमध्ये अतिशय गुणकारी मानला जातो. तुम्हाला उन्हामुळे घामोळ्या आल्या असेल. त्वचेला खाज सुटत असेल. तर कडूलिंबाचे पाने त्यांच्या काड्यांसह पाण्यात उकळा हे पाणी कोमट झाल्यानंतर त्याने आंघोळ करा. कडूलिंबाची पाने पाण्यात उकळल्यानंतर त्याचे सर्व गुणधर्म या पाण्यात उतरतात. त्यामुळे हे पाणी आरोग्यासाठी उपयुक्त असते. दररोज या पाण्याने स्नान केल्याने घामोळ्या कमी होतात आणि खाजही सुटत नाही. (Top Stories)

आईसपॅक
बाजारात आईसपॅक भेटतात किंवा तो तुम्ही घरच्या घरी तयार करू शकतात. एका पांढऱ्या फडक्यात बर्फाचे बारीक तुकडे घाला. ते व्यवस्थित फोल्ड करा. या पॅकने घामोळ्या असलेल्या जागेवर हळूवारपणे चोळा. बर्फामुळे त्वचा ओली होईल. थोडा वेळाने टॉवेलने त्वचा हळूवार हातांनी कोरडी करा. (Social News)

(टीप : कोणतेही उपाय करताना डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!

📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा

Related Articles

Blood Pressure 
आरोग्य

Health : स्मरणशक्ती शार्प ठेवण्यासाठी आजच आहारात करा ‘हे’ बदल

आपण दैनंदिन जीवनात करत असलेल्या प्रत्येक लहान सहान गोष्टीचा चांगला, वाईट परिणाम...

Potato
आरोग्य

Potato : खरंच बटाटा खाल्ल्याने वजन वाढते का?

आपल्या भारतीय घरांमध्ये स्वयंपाक घराचा राजा कोण असे विचारल्यावर सर्वच लोकांचे एकच...

Pooja Bhatt Relationships
आरोग्य

Dental Care : मोत्यासारखे पांढरेशुभ्र दात पाहिजे, मग आजच ‘हे’ उपाय करा

असे अनेकदा म्हटले जाते की दातांची ट्रीटमेंट ही सर्वात खर्चिक असते. त्यामुळे...

आरोग्य

Joints Sound : हाडांमधून येणाऱ्या कटकट आवाजाचे कारण आणि त्यावर उपाय

अनेकदा आपल्या लक्षात येते की, आपण खाली बसतो, उठतो तेव्हा आपल्या हाडांमधून...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!