Home लाईफ स्टाईल Hanuman Jayanti : हनुमानाने का घेतला होता पंचमुखी अवतार?
लाईफ स्टाईल

Hanuman Jayanti : हनुमानाने का घेतला होता पंचमुखी अवतार?

11
Diwali

2 एप्रिल रोजी हनुमान जयंतीचा उत्सव साजरा होणार आहे. एकनिष्ठ भक्त म्हणून हनुमानाची ओळख आहे. शिवाय हिंदू धर्मात प्रभू श्रीरामाचे परम भक्त असलेल्या हनुमानाला विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार, हनुमान महादेवाचा 11 वा अवतार आहे. प्रभू श्रीराम भक्त हनुमान महादेवाचा रुद्र अवतार मानला जातो. हा अवतार अत्यंत बलवान आणि बुद्धिमान आहे. हनुमान हे शक्तीचे प्रतीक आहे. हनुमान यांनी अनेक लीला करून दृष्ट शक्तींचा नाश केला आहे. विविध रूपं घेऊन त्यांनी राक्षसांना देखील मारले आहे. हनुमानांचे असेच एक अतिशय प्रसिद्ध रूप म्हणजे, पंचमुखी अवतार रूप. हनुमानांनी एका खास कार्यासाठी पंचमुखी अवतार घतला होता. आजही आपल्याला क्वचितच पंचमुखी हनुमानाची मंदिरं पाहायला मिळतात. मात्र हनुमानाने पंचमुखी अवतार का घेतला? हनुमानाच्या पाच मुखांचे महत्त्व काय? या पाच मुखांची नावे, दिशा यांचे महत्त्व काय? आदी अनेक गोष्टींबद्दल आज आपण माहिती जाणून घेऊया. (Hanuman Jayanti)

पौराणिक कथेनुसार, जेव्हा राम सीतेला परत मिळवण्यासाठी लंकेमध्ये आले तेव्हा सुरुवातीला राम आणि रावण यांच्याआधी अनेक लहान मोठी युद्ध झाली. या सर्व युद्धांमध्ये रावणाचे सैन्य पराभूत झाले. रावणाला जेव्हा समजले की, त्याचे सैन्य युद्धात पराभूत होत आहे. तेव्हा रावणाने त्याचा मायावी भाऊ अहिरावणाकडे मदत मागितली. अहिरावण देवी भवानीचा परम भक्त होता आणि त्यांला विविध विद्या देखील अवगत होत्या. त्याने त्याच्या मायावी विद्येच्या मदतीने प्रभू श्रीरामाच्या संपूर्ण सैन्याला निद्रास्त केले. दरम्यान, त्याने प्रभू राम आणि लक्ष्मण यांचे अपहरण करत त्यांना पाताल लोकात नेले. (Marathi)

देवी भवानीचा भक्त असलेल्या अहिरावणाला वरदान प्राप्त होते की, जो कोणी अहिरावणाने लावलेले 5 दिवे एकाच वेळी विझवू शकेल तोच अहिरावणाचा वध करु शकतो. या वरदानानुसार, अहिरावणाने पाच दिशांना पाच दिवे लावले होते. प्रभू श्रीराम आणि लक्ष्मणाला अहिरावणाच्या तावडीतून सोडवण्यासाठी हनुमानाने पंचमुखी अवतार धारण करून पाचही दिवे एकाच वेळी विझवून अहिरावणाचा वध केला. त्यानंतर प्रभू राम आणि लक्ष्मण अहिरावणाच्या बंधनातून मुक्त झाले. (Latest Marathi Headline)

Hanuman Jayanti

हनुमानाच्या पंचमुखी रूपातील प्रत्येक मुखाचे नाव आणि त्याचे महत्त्व
वानर मुख
पंचमुखी अवतारातील हनुमानजींचे पूर्व दिशेला जे मुख आहे त्याला वानर मुख म्हणतात. मान्यतेनुसार, वानर मुख शत्रूंवर विजय मिळवून देतो.

गरुड मुख
हनुमानाच्या पश्चिम दिशेला जे मुख आहे त्याला गरुड मुख म्हणतात. मान्यतेनुसार, हे मुख जीवनातील अडथळे आणि त्रास दूर करण्याचे काम करते.

वराह मुख
हनुमानजींच्या पंचमुखी अवतारात उत्तराभिमुख असलेल्याला मुखाला वराह मुख म्हणतात. असे मानले जाते की हनुमानाच्या या मुखाची पूजा केल्याने दीर्घायुष्य, कीर्ती आणि वैभव प्राप्त होते. (Top Stories)

नृसिंह मुख
दक्षिण दिशेला असलेल्या हनुमानाच्या या मुखाला नृसिंह मुख म्हणतात. धार्मिक मान्यतांनुसार नृसिंह मुखामुळे जीवनातील तणाव आणि अडचणी दूर होतात.

========

Hanuman Jayanti : हनुमान जयंतीचे महत्त्व आणि पूजेचा विधी

========

अश्व मुख
हनुमानजींचे पाचवे मुख आकाशाकडे आहे. याला अश्व मुख देखील म्हणतात. हे मुख मनोकामना पूर्ण करणारे मानले जाते.

हिंदू धर्मात मंगळवार आणि शनिवार हनुमानाला समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी आणि हनुमान जयंतीला देवाच्या पूजेदरम्यान हनुमानजींना लाल फुले, सिंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करावे. तसेच बजरंगबलीला गूळ आणि हरभरा अर्पण करावा. या दिवशी सुंदरकांड किंवा हनुमान चालिसाचे पठण करा. लक्षात ठेवा की, पंचमुखी हनुमान मूर्ती किंवा फोटो नेहमी घराच्या दक्षिण दिशेला लावावा. दक्षिण दिशेशिवाय घराच्या दक्षिण-पश्चिम कोपऱ्यात पंचमुखी हनुमानजींचे चित्रही लावू शकता, यामुळे वास्तुदोष दूर होतात. त्याचबरोबर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पंचमुखी हनुमानजींची मूर्ती ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा घरापासून दूर राहते. (Social News)

( टीप : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. आम्ही या माहितीची कोणतीही पुष्टी करत नाही. आमचा उद्देश फक्त तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

लाईफ स्टाईल

Vallabhacharya : वल्लभाचार्य जयंती – कोण होते कृष्णभक्त वल्लभाचार्य?

आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अकरावी तिथी अर्थात. आज चैत्र महिन्यातील एकादशीचा...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!