महर्षी वाल्मिकी यांना रामायणाचे रचनाकार म्हणून ओळखले जाते. वाल्मिकी ऋषींनीच रामायणाची रचना केली आहे. ऋषी परंपरेतील अतिशय महान आणि श्रेष्ठ ऋषी म्हणून वाल्मिकी ऋषींची ओळख आहे. महर्षि वाल्मिकी ऋषी यांना संस्कृत भाषेचे पहिले कवी मानले जाते. महर्षि वाल्मिकीं यांचे नाव रत्नाकर होते आणि ते जंगलात राहणाऱ्या भिल्ल जातीत वाढले होते, त्यामुळे त्यांनी भिल्लांची परंपरा स्वीकारली आणि उपजीविकेसाठी ते डाकू बनले. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते रस्त्यावरून जाणाऱ्यांना लुटायचे आणि गरज पडेल तेव्हा मारायचे . वाल्मिकीचा शाब्दिक अर्थ असा आहे की जो मुंगी-टेकड्यांपासून जन्माला आलेला असा होतो. ते जेव्हा तपस्या करण्यासाठी बसले होते तेव्हा त्या दरम्यान त्याच्या आजूबाजूला मुंग्यांनी छोट्या टेकड्यां निर्माण करण्यात आल्या त्यावरुनच त्यांना वाल्मिकी हे नाव देण्यात आले. (Maharshi Valmiki)
एके दिवशी महर्षी नारद मुनी जंगलातून जात असताना डाकू रत्नाकरने त्यांना बांधून ठेवले. महर्षी नारद मुनींनी डाकूला विचारले तू अशी पाप कशाला करतो. त्यावर त्याने उत्तर दिले. मी माझ्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करतो. यावर महर्षी नारदमुनी म्हणाले , ज्यांच्यासाठी तू हे सर्व पाप करत आहेस ते तुझ्या या पापात भागीदार होणार का? या वर रत्नाकरने उत्तर दिले हो करणार , ते नेहमी माझ्या पाठीशी उभे राहणार. यावर नारद मुनी म्हणाले, एकदा तू तुझ्या कुटुंबियांना तरी विचार असे झाले तर मी तुला माझी संपत्ती देईन. (Marathi)
रत्नाकरने आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना माझा साथ देणार का असे विचारल्यावर सर्वांनी नकार दिला. या गोष्टीचे त्यांना खूप वाईट वाटले. त्यांनी वाईट कर्म करणे सोडले आणि तपश्चर्येचा मार्ग निवडला. त्यांनी अनेक वर्षे तपश्चर्या केली. त्यांना ज्ञान प्राप्त झाले आणि वाल्याच्या वाल्मिकी झाला. त्यांना ऋषी वाल्मिकी असे नाव मिळाले. त्यांनी महान ग्रंथ रामायणाची संस्कृत भाषेत निर्मिती केली. रत्नाकर यांना जेव्हा आपल्या पापांची जाणीव झाली तेव्हा त्यांनी पापाचे ते जीवन सोडून नवीन मार्ग स्वीकारायचा होते, परंतु त्यांना या नवीन मार्गाबद्दल काहीच माहिती नव्हती. त्यांनी नारदजींना मार्ग विचारला, तेव्हा नारदजींनी त्यांना रामनामाचा जप करण्याचा सल्ला दिला. (Latest Marathi Headline)

रत्नाकरने बराच वेळ राम नामाचा जप केला, पण अज्ञानामुळे चुकून त्याचा रामराम नामाचा जप मरा मरा झाला, त्यामुळे त्याचे शरीर अशक्त झाले आणि मुंग्यांनी त्याच्यावर हल्ला केला. कदाचित हीच त्याच्या पापांची शिक्षा असावी. त्यामुळे त्यांना वाल्मिकी असे नाव पडले. परंतु कठोर तपश्चर्येने त्यांनी ब्रह्मदेवांना प्रसन्न केले, परिणामी ब्रह्मदेवांनी त्यांना ज्ञान दिले आणि रामायण लिहिण्याची क्षमता दिली, त्यानंतर महर्षीं वाल्मिकीनी रामायण रचले. त्यांना रामायणाचे पूर्वीचे ज्ञान होते. एकदा ते गंगा नदीच्या काठी तपश्चर्येसाठी गेले असता एका पक्ष्याचे जोडपे प्रणय लीला करत असताना एका शिकारीने बाण मारून त्या नर पक्ष्याला ठार मारले.ते दृश्य पाहून त्याच्या मुखातून आपोआप एक श्लोक निघाला जो पुढीलप्रमाणे होता- (Top Stories)
===========
Shriram : प्रभू श्रीरामांच्या जन्माची कथा
Shriram : ‘हा’ आहे जगातील एकमेव देश जेथील राजा स्वत:ला मानतो श्रीरामांचा वंशज
============
मां निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः।
यत्क्रौंचमिथुनादेकम् अवधीः काममोहितम्॥
अर्थ : ज्या दुष्टाने हे घृणास्पद कृत्य केले त्याला जीवनात कधीही सुख मिळणार नाही.त्या दुष्टाने प्रेमात पडलेल्या पक्ष्याचा वध केला आहे. यानंतर महान कवीने रामायण रचले.
भगवान ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने महर्षी वाल्मिकींनी 24000 श्लोक आणि महा काव्य रामायण रचली. पौराणिक कथेनुसार, जेव्हा भगवान रामाने माता सीतेला जंगलात पाठवले, तेव्हा ती महर्षी वाल्मिकींच्या आश्रमात राहिली. तिने वाल्मिकी आश्रमात लव आणि कुश या जुळ्या मुलांना जन्म दिला. विष्णुधर्मोत्तर पुराणानुसार महर्षि वाल्मिकी यांचा जन्म त्रेता युगात भगवान ब्रह्मा म्हणून झाला आणि नंतर तुलसीदास म्हणून पुनर्जन्म झाला. अशी मान्याता आहे. वाल्मिकीयांना घेऊन पुराणामध्ये अनेक कथा प्रचलित आहेत. (Social News)
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
- know about maharshi valmiki
- know who is maharshi valmiki
- Lord Ram
- maharshi valmiki
- maharshi valmiki information
- maharshi valmiki rishi
- Ram Navami
- ramayaan and maharshi valmiki
- Ramnavami 2026
- Valmiki Rishi
- ऋषी वाल्मिकी
- महर्षी वाल्मिकी
- महर्षी वाल्मिकी कोण होते?
- महर्षी वाल्मिकी माहिती
- रामनवमी
- रामनवमी 2026
- रामायण आणि महर्षी वाल्मिकी
- रामायणाचे रचयता महर्षी वाल्मिकी