Home आंतरराष्ट्रीय Van Allen Probe : सावधान…. पृथ्वीच्या दिशेनं येत आहे आगीचा गोळा….
आंतरराष्ट्रीय

Van Allen Probe : सावधान…. पृथ्वीच्या दिशेनं येत आहे आगीचा गोळा….

73

अमेरिका-इराण युद्धाने अवघ्या जगामध्ये हाहाकार माजवला आहे. जगभरातील तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ लागल्यामुळे सर्वत्र महागाई वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. अमेरिका-इराण युद्धामुळे मध्यपूर्वेला मोठा फटका बसत आहे. या सर्व घडामोडींमध्ये पृथ्वीच्या दिशेने आकाशातूनही एक संकट येत असल्याची माहिती समोर आली आहे. ( Van Allen Probe )

आकाशातून ६०० किलोग्रॅम वजनाचा एक जळता गोळा पृथ्वीच्या दिशेने येत आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाचा व्हॅन अॅलन प्रोब उपग्रह सुमारे १४ वर्षे अंतराळात राहिल्यानंतर आता पृथ्वीवर परत येत आहे. नासाच्या शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार या उपग्रहाचे अवशेष १० ते ११ मार्च दरम्यान पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतील. त्यानंतर ते पृथ्वीच्या कुठल्याही भागात कोसळण्याची शक्यता आहे.

या उपग्रहाचा बहुतांश भाग वातावरणात प्रवेश करताना जळून खाक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शिवाय पृथ्वीवर पडणारा भाग ९९ टक्के समुद्रात कोसळेल, असा अंदाज नासाच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र एक टक्का भाग पृथ्वीवरील इतर भागात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशीही भीती व्यक्त करण्यात आली आहे. ( Van Allen Probe )

नासाचा ६०० किलोग्रॅम वजनाचा हा उपग्रह सुमारे १४ वर्षांपासून कक्षेत फिरत आहे. या उपग्रहाचे नाव व्हॅन अॅलन प्रोब ए असून त्याचे वजन १३२३ पौंड म्हणजेच अंदाजे ६०० किलोग्रॅम आहे. ऑगस्ट २०१२ मध्ये पृथ्वीभोवतीच्या रेडिएशन बेल्टचा अभ्यास करण्यासाठी व्हॅन अॅलन प्रोब बी सोबत हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला होता. सात वर्षे सक्रिय राहिल्यानंतर २०१९ मध्ये हे दोन्ही उपग्रह निष्क्रिय करण्यात आले. त्यानंतर ते हळूहळू त्यांच्या कक्षेतून खाली येत आहेत.

व्हॅन अॅलन प्रोब ए चे मिशन आता संपत आले आहे. यासंदर्भात नासाने स्वतंत्र निरीक्षण समिती नेमली आहे. त्या समितीच्या आणि यूएस स्पेस फोर्सच्या अंदाजानुसार भारतीय वेळेनुसार १० मार्च रोजी रात्री हा उपग्रह पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करणार आहे. त्यानंतर बुधवार पहाटे तो पृथ्वीवर आदळण्याची शक्यता आहे. यासाठी २४ तासांची ‘विंडो’ निश्चित करण्यात आली आहे. उपग्रहाच्या प्रवेशाच्या वेळेत थोडाफार बदल होऊ शकतो, असे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. ( Van Allen Probe )

नासाच्या अंदाजानुसार व्हॅन अॅलन प्रोब ए वातावरणातून जाताना पूर्णपणे जळून खाक होऊ शकतो. मात्र तसे न झाल्यास त्यातील काही भाग आगीच्या गोळ्याच्या स्वरूपात पृथ्वीवर पडू शकतो. तरीही पृथ्वीवरील कोणालाही दुखापत होण्याचा धोका अत्यंत कमी असल्याचे नासाच्या विशेष समितीने स्पष्ट केले आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे ७० टक्के भाग पाण्याने व्यापलेला असल्यामुळे उपग्रहाचे अवशेष खुल्या समुद्रात पडण्याची शक्यता जास्त आहे.

नासाकडून व्हॅन अॅलन प्रोब ए च्या प्रत्येक हालचालीचा मागोवा घेतला जात आहे. तरीही तो नेमका कुठे पडेल हे निश्चित सांगणे कठीण आहे. उपग्रहाचा कक्षीय मार्ग वर्तुळाकार नसून ताणलेल्या अंड्यासारखा होता. त्याच्या सर्वात दूरच्या बिंदूवर तो पृथ्वीपासून सुमारे ३०,४१५ किलोमीटर अंतरावर गेला होता, तर सर्वात जवळच्या बिंदूवर तो ६१८ किलोमीटर उंचीवर पोहोचला होता. त्यामुळे त्याचे अचूक स्थान निश्चित करणे अवघड ठरत आहे. ( Van Allen Probe )

=======

हे देखील वाचा : Space Mission वर खरंच पैसा बर्बाद होतो ?

=======

शास्त्रज्ञांच्या मते, उपग्रह वातावरणात प्रवेश करताना तीव्र घर्षण आणि उष्णतेमुळे त्याचा बहुतांश भाग जळून नष्ट होईल. मात्र काही मजबूत धातूचे भाग पूर्णपणे जळून नष्ट होणार नाहीत आणि ते पृथ्वीवर पडू शकतात. त्यांच्या वेगाचा आणि पडण्याच्या शक्यतेचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करत आहेत.

व्हॅन अॅलन प्रोब ए आणि व्हॅन अॅलन प्रोब बी यांना पृथ्वीभोवती असलेल्या व्हॅन अॅलन रेडिएशन बेल्टचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात आले होते. हे ऊर्जावान कणांचे दोन थर आहेत, जे पृथ्वीला सौर वादळे आणि अवकाशातील किरणोत्सर्गापासून संरक्षण देतात. रेडिएशन बेल्टचा शोध लावणारे शास्त्रज्ञ जेम्स व्हॅन अॅलन यांच्या सन्मानार्थ या मोहिमेला व्हॅन अॅलन प्रोब्स असे नाव देण्यात आले. जवळजवळ एक दशक महत्त्वाची वैज्ञानिक माहिती गोळा केल्यानंतर हा उपग्रह आता आपल्या अंतिम प्रवासावर आहे. ( Van Allen Probe )

– सई बने

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!

📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा

Related Articles

Katrina Kaif
आंतरराष्ट्रीय

Jiang Xueqin : चीनच्या नॉस्ट्राडॅमसने सांगितले ट्रम्पचे भविष्य

अमेरिका-इराण युद्धामध्ये पंधरा दिवसांचा विराम आला आहे. यात चीनची भूमिका असल्याची माहिती...

Jewellery
आंतरराष्ट्रीय

Jared Kushner : ट्रम्पचा जावई आहे तरी कोण

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर कायमचा विराम आणण्यासाठी पाकिस्तानची राजधानी...

Mobile
आंतरराष्ट्रीय

First Lady Melania Trump : अमेरिकेच्या फर्स्ट लेडीसाठी शाही सवारी

इराणमध्ये सत्तांतर करण्याच्या हेतूने अमेरिकेने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरुद्ध लष्करी मोहीम...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!