यंदा १९ एप्रिल २०२६ रोजी अक्षय तृतीया आहे. याच दिवशी गंगोत्री आणि यमुनोत्री या पहिल्या दोन धामांचे दरवाजे उघडले जातील. तर केदारनाथ मंदिर हे 22 एप्रिल आणि बद्रीनाथ मंदिर 23 एप्रिल रोजी उघडले जाणार आहे. या दिवसांपासून अधिकृतपणे चारधाम यात्रेला सुरुवात होते. २०२५ मध्ये ही यात्रा ३० एप्रिलला सुरू झाली होती. यंदा ११ दिवस आधीच दरवाजे उघडल्यामुळे मे महिन्यातील उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची आणि भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या चार धाम यात्रेला हिंदू धर्मामध्ये मोठे महत्त्व आहे. ही यात्रा केल्यानंतर पुण्य प्राप्त होऊन मोक्ष मिळतो अशी मान्यता आहे. त्यामुळे लाखो लोकं दरवर्षी ही यात्रा करतात. मात्र ही यात्रा करणे वाटते तितके सोपे अजिबातच नाहीये. (Chardham Yatra)
कारण हिमालयातील अत्यंत कठीण, उंचावर आणि बर्फाच्छादित भागात ही यात्रा पार पडते. साधारणपणे एप्रिल-मे ते ऑक्टोबर-नोव्हेंबर या काळात चालणारी ही यात्रा ट्रेकिंग, अनिश्चित हवामान आणि दुर्गम मार्गांमुळे अत्यंत अवघड मानली जाते. या ठिकाणी अनेक लोकांनी विविध प्रकारचे त्रास होतात, ज्यामुळे ही यात्रा पूर्ण करणे देखील अवघड होऊन जाते. असे होऊ नये म्हणून चारधाम यात्रेला जाताना आपण या यात्रेसाठी फिट आहोत की नाही हे जाणून घेणे आवश्यक आहे. शिवाय या यात्रेला जाताना कोणकोणती काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून यात्रेदरम्यान त्रास होणार नाही हे देखील पाहिले पाहिजे. (Chardham yatra News)
नोंदणी आवश्यक
चार धामच्या प्रवासाला जाण्यापूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे. तुम्ही उत्तराखंडमधील चार धाम यात्रेसाठी registrationandtouristcare.uk.gov.in वर नोंदणी करू शकता. नोंदणीसाठी तुम्हाला क्यूआर कोडसह प्रवास नोंदणी तयार करावा लागेल. त्याची पडताळणी धाम येथे होणार आहे. तुम्ही, ऑनलाइन नोंदणी करू शकत नसल्यास, उत्तराखंड सरकारने हरिद्वार, डेहराडून, चमोली, रुद्रप्रयाग आणि उत्तरकाशी जिल्ह्यात 24 नोंदणी केंद्रे स्थापन केली आहेत. तेथेही तुम्ही नोंदणी करू शकता. ऑफलाइन नोंदणी करणाऱ्यांना हायटेक रिस्टबँड दिले जातील. (Marathi)

वैद्यकीय तपासणी आवश्यक
चार धाम यात्रा करणे सोपे काम नाही. कारण, या प्रवासातील रस्ते फार धोकादायक मानले जातात. उंच डोंगर, घनदाट जंगल अशी मनाला मोहनारी दृश्य दिसत असली तरी वाट मात्र खडतर आहे. त्यामुळे तुम्हाला शारिरीकदृष्ट्या फिट आसने गरजेचे आहे. यात्रा सुरू करण्यापूर्वी वैद्यकीय चाचणी जरूर करून घ्या. तुम्ही पूर्णपणे निरोगी आहेत याची खात्री करून मगच प्रवास सुरु करा. (Social Updates)
कोलेस्ट्रॉलची तपासणी
कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं की हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. जर तुम्हाला कोलेस्ट्रॉलची समस्या असल्यास तुम्ही चार धाम यात्रेला जाणं न जाणं फायदेशीर ठरेल. (Marathi)
अतिउच्च रक्तदाब
अतिउच्च रक्तदाबामुळे हृदयावर मोठ्या प्रमाणात ताण येण्याची शक्यता असते. त्याचबरोबर जर मधुमेहाचा त्रास असल्यास चार धाम यात्रेला न जाण्याचा सल्ला दिला जातो.
श्वसनाचा आजार
यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ सर करताना ऑक्सिजन कमी कमी होत जातो, त्यामुळे अस्थमा आणि दमा यासारखे श्वसनाचे आजार असल्यास चार धाम यात्रेला न जाणं फायदेशीर ठरेल. (Marathi News)
लक्षात ठेवा
चारधाम यात्रेचे नियोजन करताना स्वत:च्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचे आहे. थंडीमध्ये डिहायड्रेशनचा त्रास होऊ नये यासाठी पुरेसं पाणी शरीरात जाणं गरजेचं आहे. प्रवासात मेडिकल किट, शरीराला उष्णता देणारे पदार्थ सोबत ठेवणं फायदेशीर आहे. डोंगर चढताना नेहमी नाकाने दीर्घ श्वास घ्या. यामुळे फुफ्फुसांना अधिक ऑक्सिजन मिळेल आणि तुम्ही लगेच दमणार नाही. यात्रेदरम्यान फास्ट फुड, जंक फुड, शुगर ड्रिंक्स, कॉफी, सिगरेटचे सेवन किंवा अधिक तळलेले तसेच मसालेदार जेवण करू नका. त्रास होऊ शकतो. (Top Marathi News)
प्रवासाआधी ‘हे’ करा
चार धाम यात्रा कठिण यात्रा आहे. हरिद्वार येथून गंगा स्नान करुनच चारधाम यात्रेला सुरुवात होते. चारही धामांना भेट देण्यासाठी एकूण 10 दिवस तरी लागतात. त्यामुळं इतके दिवस तुम्ही बाहेर असाल काय काळजी घ्यावी, हे तुमच्या लक्षात असायला हवं. चार धाम यात्रेपैकी दोन मंदिरांपर्यंत जाण्याचा मार्ग अवघड आहे. केदारनाथ आणि यमुनोत्री येथील प्रवास अवघड आहे. तर, त्या तुलनेत बद्रीनाथ आणि गंगोत्री मंदिरांकडील प्रवास थोडा सोप्पा आहे. चार धाम यात्रेला गेल्यानंतर जर तुम्हाला पायी ट्रेक करायचा नसेल तर तुम्ही घोडा किंवा खच्चर, पालखीदेखील घेऊ शकता. मात्र, रजिस्टर्ट लोकांकडून घोडा किंवा खच्चर घ्या. कारण त्यांचे रेट फिक्स असतात. (Latest Marathi Headline)
=========
Chaitrangan : चैत्र महिन्यात काढली जाणारी चैत्रांगण रांगोळी
Navratri : जाणून घ्या चैत्र आणि अश्विन नवरात्रात नेमका फरक काय?
=========
‘या’ वस्तू जरूर घ्या
चार धाम यात्रेचा प्रवास करतेवेळी सोबत मेडिकल किट, शरीराला उर्जा देणारे पदार्थ, खाण्याचे सामान आपल्या सोबत असू द्या. तसेच रोख रक्कम, आयडी कार्ड, गरम कपडे, रेनकोड, छत्री, ट्रेकिंग स्टिक, ड्राय फ्रुट्स, स्नॅक्स, थर्मल बॉटल, पर्सनल हायजीनचे सामान (टुथब्रश, शॅम्पू, सॅनिटायझर, मॉइश्चरायजर) सोबत ठेवा. (Top Stories)
‘या’ लोकांनी यात्रा टाळा
तज्ञ सल्ला देतात की, ५५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांना हृदयविकार, अस्थमा, हाय ब्लड प्रेशर, मधुमेह सारखे आजार असतात. त्यामुळे अशा लोकांना चार धाम यात्रा करताना काळजी घ्यावी किंवा करू नये. तसेच गर्भवती महिलांनी देखील डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि हेल्थ चेकअप करुनच चार धाम यात्रेला जावे किंवा टाळावे. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
- Chardham Yatra
- chardham yatra 2026
- Chardham Yatra and health care
- Chardham Yatra health care
- chardham yatra information
- Chardham Yatra saftey tips
- health care tips for Chardham Yatra
- how to take care during Chardham Yatra
- चारधाम यात्रा
- चारधाम यात्रा 2026
- चारधाम यात्रा आणि आरोग्य
- चारधाम यात्रेमध्ये ही काळजी घ्या
- चारधाम यात्रेला जाताना कोणती काळजी घ्यावी?