Home सामाजिक Masan Holi : काशीमध्ये जगप्रसिद्ध मशान होळीची तयारी सुरू
सामाजिक

Masan Holi : काशीमध्ये जगप्रसिद्ध मशान होळीची तयारी सुरू

1

महाशिवरात्रीनिमित्त काशी विश्वनाथ धाम येथे लाखो शिवभक्तांनी बाबा विश्वनाथांचे दर्शन घेतले आहे. यावेळी झालेल्या भव्य शिव मिरवणुकीमध्ये लाखो भाविक “हर हर महादेव” चा जयघोष करत सहभागी झाले. आता याच शिवभक्तांना फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या मशान होळीची उत्सुकता लागली आहे. यावर्षी काशीमध्ये जगप्रसिद्ध मशान होळी, म्हणजेच भस्म होळी २८ फेब्रुवारी २०२६ रोजी साजरी केली जाणार आहे. हा अनोखा उत्सव रंगभरी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी, मणिकर्णिका आणि हरिश्चंद्र घाटाच्या स्मशानभूमीतील अंत्यसंस्काराच्या चितेच्या अस्थिकलशाने खेळला जातो. यावेळी हजारो शिवभक्त ही अनोखी परंपरा पाहण्यासाठी उपस्थित असतात. गेल्या काही वर्षांत या मशान होळीची लोकप्रियता एवढी वाढली आहे की, काशीसोबत देशभरातील शिवभक्त या होळीला हजेरी लावतातच, शिवाय परदेशी भक्तही ही अनोखी होळी पाहण्यासाठी उपस्थित असतात. ( Masan Holi )

काशी ही विश्वनाथांची नगरी आहे. याच काशीमध्ये होणाऱ्या अनेक परंपरा अद्भुत आहेत. यापैकीच एक म्हणजे मशान होळी. यावर्षी काशीमध्ये २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळच्या भस्म आरतीनंतर ही मशान होळी साजरी केली जाणार आहे. यासाठी काशीच्या मणिकर्णिका घाट आणि हरिश्चंद्र घाटावर आत्तापासून तयारी सुरू झाली आहे. ही होळी जीवन आणि मृत्यूच्या चक्राच्या पलीकडे असणाऱ्या भगवान शंकराला समर्पित असते. यामध्ये रंगांऐवजी अंत्यसंस्काराच्या भस्माचा वापर केला जातो. या मशान होळीसाठी काशीमध्ये लाखो भाविक येतात. या भाविकांचा उत्साह पाहता स्थानिक प्रशासनाला मोठी तयारी करावी लागली आहे. मशान होळीची सुरुवात २७ फेब्रुवारीपासून होईल. या दिवशी रंगभरी एकादशी आहे. तेव्हा साक्षात भगवान शंकर माता पार्वतीसोबत होळी खेळतात, अशी मान्यता आहे. ही होळी झाल्यावर मशान होळी खेळली जाते.

या मशान होळीला स्थानिक भाषेत भस्म होळी आणि भाभूत होळी असेही म्हटले जाते. काशीच्या मणिकर्णिका घाटावर गेल्या हजारो वर्षांपासून ही मशान होळी खेळली जात असल्याचे सांगितले जाते. या होळीमध्ये महिला सहभागी होत नाहीत. या दिवशी भगवान शंकराचे भक्त भूत आणि पिशाच्चांचे वेश धारण करतात आणि स्मशानात जमतात. ही मशान होळी साजरी करताना काही कठोर धार्मिक मान्यता आणि आध्यात्मिक नियम पाळले जातात. धार्मिक श्रद्धेनुसार, स्मशानभूमीत विविध सूक्ष्म शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा सक्रिय असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या मशान होळीमध्ये महिला आणि मुलांना सहभागी करून घेतले जात नाही. काशीमध्ये जी अनोखी मशान होळी खेळली जाते, त्यामागे एक कथाही सांगितली जाते. या पौराणिक कथेनुसार, मशान होळीची सुरुवात स्वतः भगवान शंकरांनी केल्याची वंदता आहे. रंगभरी एकादशीच्या दिवशी महादेव हे माता पार्वतीला घेऊन पहिल्यांदा काशीनगरीत आले. महादेव प्रथमच माता पार्वतीसह या नगरीत दाखल झाल्याने त्यांचे अनुयायी खूश झाले. या अनुयायांनी आपला आनंद साजरा करण्यासाठी गुलाल उधळला. या आनंदात देवही सामील झाले. ( Masan Holi )

=======

हे देखील वाचा : Holi Colors : होळी खेळताना रंग डोळे, कान किंवा तोंडात गेला तर काय करावे?

=======

मात्र त्यांनी भगवान शंकराचे सर्वात प्रिय भक्त असलेल्या भूत, आत्मे, पिशाच आणि अघोरी यांना या आनंदाच्या उत्सवात सामील होऊ दिले नाही. त्यामुळे महादेवाचे हे भक्त नाराज झाले. आपल्या भक्तांची नाराजी ओळखून भगवान शंकर स्वतः दुसऱ्या दिवशी स्मशानभूमीत गेले. तिथे त्यांनी गुलालाचा वापर न करता चितेच्या राखेचा वापर करून आपल्या भक्तांसोबत होळी खेळली. तेव्हापासून रंगभरी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी मशान होळी काशीच्या मणिकर्णिका आणि हरिश्चंद्र घाटावर खेळली जात आहे. या दिवशी साक्षात भगवान शंकर येथे उपस्थित असल्याचे भाविक मानतात. ही मशान होळी खेळल्यानंतर अहंकार आणि जीवनातील नकारात्मक भावनांचे दहन होत असल्याचे सांगितले जाते. मशान होळीची सुरुवात होण्यापूर्वी भगवान महादेवाची एक मोठी आरती होते. यावेळी होणारा डमरुनाद भाविकांना आगळी ऊर्जा देऊन जातो. त्यानंतर “हर हर महादेव”च्या जयघोषात मशान होळीची सुरुवात होते. अलिकडच्या काही वर्षांत या मशान होळीची लोकप्रियता जगभर झाली आहे. त्यामुळे मशान होळी पाहण्यासाठी परदेशातूनही मोठ्या संख्येने पर्यटक येतात. ( Masan Holi )

सई बने

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Health Care
सामाजिक

Chardham Yatra : चारधाम यात्रेची तयारी सुरू

उत्तराखंडची चारधाम यात्रा १९ एप्रिल रोजी सुरू होणार आहे. अक्षय तृतीयेचा मुहूर्त...

सामाजिक

Yamunotri Dham : यमुनोत्री धामची रहस्ये

उत्तराखंड राज्यातील चारधाम यात्रेचे हिंदू धर्मात मोठे महत्त्व आहे. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ...

सामाजिक

Narmadeshwar Mahadev Temple : रंग बदलणारे शिवलिंग

उत्तर प्रदेशामध्ये भगवान शंकराची अनेक मंदिरे आहेत. या मंदिरांच्या स्थापनेमागे पौराणिक कथा...

सामाजिक

Chilkur Balaji Temple : अनोखे व्हिसा मंदिर

प्रभू श्रीरामांचे परमभक्त असलेल्या महाबली हनुमानांचा जन्मोत्सव २ एप्रिल रोजी साजरा होणार...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!