Home आरोग्य Holi Colors : होळी खेळताना रंग डोळे, कान किंवा तोंडात गेला तर काय करावे?
आरोग्य

Holi Colors : होळी खेळताना रंग डोळे, कान किंवा तोंडात गेला तर काय करावे?

71

फाल्गुन या शेवटच्या मराठी महिन्यातील शेवटचा मोठा रंगांची उधळण करणारा सण म्हणजे, होळी. होलिका दहन झाल्यानंतर संपूर्ण भारतामध्ये एकमेकांना रंग लावून होळीचा आनंद साजरा केला जातो. अक्षरशः होळीच्या रंगामध्ये एकमेकांना न्हाऊ घातले जाते. मात्र सध्याच्या काळात बाजारात मिळणाऱ्या रंगांमध्ये कॅमिकल्सचे प्रमाण अधिक असते. या केमिकलयुक्त रंगांमुळे आपल्या शरीराला अनेक गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. सगळेच लोकं होळी खेळण्यासाठी नैसर्गिक रंगांना प्राधान्य देतात. मात्र मार्केटमध्ये नैसर्गिक रंगांच्या नावाखाली रासायनिक रंगांची विक्री नेहमीच होताना दिसते. हे रंग आपल्या शरीरासाठी घातक असतात. जर रंग खेळताना तुमच्या डोळ्यात किंवा कानात, तोंडात रंग गेला तर काय करावे हे आपण आज जाणून घेऊया. (Holi Colors)

डोळ्यात रंग गेल्यास काय करावे?
जर तुमच्या डोळ्यात रंग गेला तर डोळ्यात गेलेला रंग बाहेर काढण्यासाठी सर्वात आधी डोळे उघड झाक करत रहा. जेणेकरून डोळ्यांच्या कड्याना आणि पापण्यांवर लागलेला रंग निघून जाण्यास मदत होईल. त्यानंतर डोळ्याच्या आतील रंग पाण्याने धुवा. जर तुमच्या डोळ्यांवर रंग पडला तर सर्वप्रथम शांत राहा आणि स्वच्छ आणि थंड पाण्याने डोळे स्वच्छ करा. पण काळजी घ्या कारण कधीकधी रंगांमध्ये तीक्ष्ण कण देखील असतात, ज्यामुळे डोळ्यांमध्ये लहान जखमा होऊ शकतात. (Health)

पाण्याने धुतल्यानंतर, डोळे सर्व दिशेने फिरवा आणि नंतर पुन्हा एकदा पाणी शिंपडा. लुब्रिकेटिंग आय ड्रॉप्स निवडा आणि डोळे पाण्याने स्वच्छ केल्यानंतर, या आयड्रॉप्सचे दोन थेंब टाका. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच डोळ्याचे थेंब वापरण्याचा प्रयत्न करा. डोळे चोळणे टाळा. जर स्थिती अधिक गंभीर होत असेल, तर तुम्ही ताबडतोब वैद्यकीय मदत घ्यावी आणि तपासणी करून घ्यावी. यावेळी डोळ्यांवर कॉन्टॅक्ट लेन्स घालणे पूर्णपणे टाळा. कधीकधी कॉन्टॅक्ट लेन्समुळे संसर्ग वाढतो. (Todays Marathi Headline)

Holi Colors

रंग खेळायला जाण्यापूर्वी तुमच्या चेहऱ्याला तसेच डोळ्याभोवती चांगले मॉयश्चरायझर वापरा जेणेकरून तुमच्या डोळ्याभोवती कोणताही रंग जमा होणार नाही. शक्यतो होळी खेळताना नैसर्गिक रंगांचा वापर करा. होळी खेळताना गॉगल घातला तर अधिकच उत्तम. केसांवर टाकलेले रंगीत पाणी डोळ्यांमध्ये जाऊ नये, यासाठी केस बांधा किंवा टोपी घाला. तुम्हाला कोणी रंग लावत असेल तर डोळे बंद करा. डोळ्यांमध्ये कॉन्टॅक्ट लेन्स घालून कधीही होळी खेळू नका कारण रंग डोळे आणि लेन्समध्ये अडकतात, ज्यामुळे डोळ्यांवर वाईट परिणाम होऊ शकतो. रंग खेळून झाल्यावर तुमचे डोळे थंड पाण्याने स्वच्छ धुवावेत. (Marathi News)

कानात रंग गेल्यास काय करावे?
रंगपंचमी खेळत असताना आपल्या कानात कोरडे रंग गेले असतील तर ताबडतोब मान पुढील बाजूस झुकवा आणि आपल्या कानातून रंग काढून टाका. यानंतर कानातील उर्वरित रंग काढून टाकण्यासाठी इअरबड्स वापरा. आपले कान सुरक्षित ठेवण्यासाठी कोणतंही तेल (खोबरेल तेल) गरम करून कानात घाला आणि नंतर त्यावर कापसाचा बोळा घाला. कोमट पाण्यात भिजवलेल्या मऊ कापडाने कान हळूवार स्वच्छ करा.काडी, काडीपेटी किंवा टोकदार वस्तू वापरू नका, यामुळे रंग अधिक आत जाऊ शकतो किंवा पडद्याला इजा होऊ शकते. याशिवाय कानात चांगले तेलाचे काही थेंब घातले तर नक्कीच फायदा होईल. (Latest Marathi Headline)

तोंडात रंग गेल्यास काय करावे?
होळी खेळत असताना तुमच्या तोंडाचा रंग गेला तर ताबडतोब आणि तोपर्यंत गुळण्या करत राहा जोपर्यंत तोंडातून सर्व रंग बाहेर पडत नाही. रंग तोंडात गेल्यानंतर कमीत कमी १ तासांसाठी काहीही खाऊ किंवा पिऊ नका. थोड्या वेळानंतर माउथवॉश किंवा कोमट पाण्याने आपले तोंड स्वच्छ करा आणि त्यानंतरच काहीही खा. रंग़ विषारी किंवा भेसळयुक्त असल्यास हा प्रकार जीवावर बेतू शकतो. मळमळ, उलट्या होत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. पचायला हलके पदार्थ खावेत. तसेच होळीचा रंग लागलेले किंवा होळीच्या रंगांनी माखलेल्या हाताने कोणताही पदार्थ खाऊ नका. (Top Stories)

========

लहान लहान गोष्टीवरून चिडचिड होते? तुम्ही Decision Fatigue चे बळी तर नाही ना?

========

‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
नैसर्गिक आणि सेंद्रिय रंगांनी होळी खेळा. होळी खेळण्यापूर्वी आपल्या संपूर्ण शरीरावर तेल लावण्यास विसरू नका. काहीही खाण्यापूर्वी आपले हात एकदम व्यवस्थित स्वच्छ करा. डिहायड्रेशनपासून बचाव करण्यासाठी सतत पाणी पित राहा. जर तुम्ही उन्हात होळी खेळत असाल तर दर ३ तासांनी पुन्हा सनस्क्रीन लावा. शरीरावरचे रंग काढून टाकल्यानंतर मॉइश्चरायझर लावण्यास विसरू नका. रंग काढून टाकण्यासाठी सतत आंघोळ करू नका. गोड पदार्थांचे जास्त सेवन करू नका. ओल्या कपड्यांमध्ये जास्त काळ राहू नका. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Blood Pressure 
आरोग्य

Health : स्मरणशक्ती शार्प ठेवण्यासाठी आजच आहारात करा ‘हे’ बदल

आपण दैनंदिन जीवनात करत असलेल्या प्रत्येक लहान सहान गोष्टीचा चांगला, वाईट परिणाम...

Potato
आरोग्य

Potato : खरंच बटाटा खाल्ल्याने वजन वाढते का?

आपल्या भारतीय घरांमध्ये स्वयंपाक घराचा राजा कोण असे विचारल्यावर सर्वच लोकांचे एकच...

Pooja Bhatt Relationships
आरोग्य

Dental Care : मोत्यासारखे पांढरेशुभ्र दात पाहिजे, मग आजच ‘हे’ उपाय करा

असे अनेकदा म्हटले जाते की दातांची ट्रीटमेंट ही सर्वात खर्चिक असते. त्यामुळे...

आरोग्य

Joints Sound : हाडांमधून येणाऱ्या कटकट आवाजाचे कारण आणि त्यावर उपाय

अनेकदा आपल्या लक्षात येते की, आपण खाली बसतो, उठतो तेव्हा आपल्या हाडांमधून...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!