Home आरोग्य Anger : तुम्हालाही खूप राग येतो? मग ‘हे’ उपाय कराच
आरोग्य

Anger : तुम्हालाही खूप राग येतो? मग ‘हे’ उपाय कराच

1

अनेकदा आपल्या लक्षात येते की, आपण उगीच चीड चीड करत असतो. आपल्याला देखील जाणवते की आपण खूपच जास्त चिडत आहोत आणि कधी कधी तर विनाकारण किंवा अगदी शुल्लक कारणावरून देखील आपल्याला खूप जास्त राग येतो. राग येणे ही एक भावना आहे. मुख्य म्हणजे राग हा नैसर्गिक असला तरी त्याची मर्यादा ही आपल्यावरच अवलंबून असते. किती राग यावा हे आपल्याच हातात असते. चिडचिड ही एक मानसिक समस्या आहे. जेव्हा जेव्हा आपण किंवा आपल्या कुटुंबाची चिडचिड होते तेव्हा इतर कुटुंबातील सदस्य देखील आपल्यावर रागावू लागतात किंवा दुर्लक्ष करू लागतात. (Anger)

चिडचिडा स्वभाव म्हणून आपल्याला लोकं टाळू लागतात. रागाने माणसाची विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती कमी होते. संतप्त लोक अशी अनेक पावले उचलतात जे चुकीचे ठरू शकतात. जर तुम्हालाही अनावश्यक गोष्टींचा राग येत असेल आणि तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवू शकत नसाल, तर यावर तुम्ही सोपे उपाय करून ताबा मिळवू शकतात. मग राग आल्यावर नक्की कोणते उपाय करावे किंवा राग शांत कसा करावा? चला जाणून घेऊया. (Health)

समस्येचे कारण
चिडचिडेपणाच्या समस्येवर मात करण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे आपल्या समस्येचे कारण शोधण्याचा प्रयत्न करणे. कारण मानसिक, भावनिक किंवा शारीरिक आहे हे स्पष्ट करा. जर तुम्हाला स्वतःहून समजत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. आवश्यक असल्यास, मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्या. तुम्ही या मार्गांनी तुमची समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करू शकता. (Marathi)

शांत राहा
रागाच्या भरात चुकीचे बोलण्यापेक्षा खूप राग येतो तेव्हा गप्प राहणे चांगले. तुम्ही काहीही बोलणार नाही तेव्हा वादाची परिस्थिती अजिबात निर्माण होणार नाही. दुसरीकडे, तुम्ही रागात असताना गप्प राहिल्यास, रागात चुकीचे शब्द वापरणे टाळाल. तिथेच हे प्रकरण मिटणार आहे. बोलायचेच असेल तर विचारपूर्वक बोला. (Todays Marathi Headline)

Anger

मोती परिधान करा
जे लोक बोलण्यावर रागावतात त्यांनी त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या आकाराचे मोती चांदीच्या अंगठीत किंवा पेंडेंटमध्ये घालावेत. मोती कमीत कमी ८ ते १२ कॅरेट धारण केले पाहिजेत, यामुळे व्यक्तीचा चंद्र ठीक राहील आणि रागात असताना देखील तुम्ही त्यावर योग्य नियंत्रण ठेवू शकाल. (Top Marathi News)

योग्य आहार
बिया आणि काजू खाल्ल्याने शरीरातील सेरोटोनिन वाढण्यास मदत होते. त्यात मुबलक प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असल्याने, तुम्ही त्यांचे सेवन करून नैराश्य किंवा तणाव कमी करू शकता. चीज, दही आणि आंबवलेले सोयाबीन यासारख्या गोष्टींचा समावेश प्रोबायोटिक पदार्थांमध्ये केला जातो. हे खाल्ल्याने तुमचा मूड सुधारू शकतो. सॅल्मन फिशचे सेवन मानसिक आरोग्यासाठी चांगले मानले जाते. जर तुम्ही मांसाहारामध्ये सर्वोत्तम पर्याय शोधत असाल तर चवीसोबतच आरोग्यासाठी सॅल्मन हा उत्तम पर्याय आहे. यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड मुबलक प्रमाणात आढळते. पालक, कोबी, मटार आणि काकडी यांसारख्या सर्व हिरव्या पालेभाज्यांमध्ये मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात आढळते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही त्यांचा आहारात समावेश केला तर ते तणावापासून मुक्त होण्यास आणि मूड सुधारण्यास मदत करू शकते. (Latest Marathi Headline)

ध्यान
ध्यान आसनाचा नियमित सराव केल्याने तुमचा राग दूर करण्यात खूप मदत होऊ शकते. जर तुम्हाला वारंवार राग येण्याची सवय असेल, तर तुम्ही दररोज सकाळी एखाद्या निर्जन ठिकाणी 10-15 मिनिटे या मुद्रेचा सराव करावा. (Top Stories)

======= 

Parenting Tips : टीनएजमध्ये प्रायव्हसी का महत्त्वाची? पालकांनी समजून घ्यायला हव्या या गोष्टी

=======

भुजंगासन
भुजंगासन म्हणजेच कोब्रा पोज हा एक उत्तम योगासन आहे जो तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकतो. त्याचा नियमित सराव केवळ रागावर नियंत्रण ठेवत नाही तर मणक्याशी संबंधित समस्या दूर करण्यासही मदत करतो. भुजंगासनाचा सराव नेहमी सकाळी रिकाम्या पोटी करावा.

सर्वांगासन
सर्वांगासनाला सर्व आसनांचा राजा म्हटले जाते. या आसनाच्या नावावरून हे स्पष्ट होते की हे आपल्या शरीराच्या सर्व अवयवांसाठी एक आसन आहे. जर तुम्ही रोज सर्वांगासनाचा सराव केला तर तुम्ही तुमच्या रागावर बऱ्याच अंशी नियंत्रण ठेवू शकता. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!

📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🗳️ तुमची निवड करा
तुम्ही कोणत्या विषयावरील लेख जास्त वाचता?
📚 खालीलपैकी कोणत्या विषयावरील ब्लॉग तुम्हाला वारंवार वाचायला आवडतात?
💡 एक किंवा अधिक पर्याय निवडा:

Related Articles

Blood Pressure 
आरोग्य

Health : स्मरणशक्ती शार्प ठेवण्यासाठी आजच आहारात करा ‘हे’ बदल

आपण दैनंदिन जीवनात करत असलेल्या प्रत्येक लहान सहान गोष्टीचा चांगला, वाईट परिणाम...

Potato
आरोग्य

Potato : खरंच बटाटा खाल्ल्याने वजन वाढते का?

आपल्या भारतीय घरांमध्ये स्वयंपाक घराचा राजा कोण असे विचारल्यावर सर्वच लोकांचे एकच...

Pooja Bhatt Relationships
आरोग्य

Dental Care : मोत्यासारखे पांढरेशुभ्र दात पाहिजे, मग आजच ‘हे’ उपाय करा

असे अनेकदा म्हटले जाते की दातांची ट्रीटमेंट ही सर्वात खर्चिक असते. त्यामुळे...

आरोग्य

Joints Sound : हाडांमधून येणाऱ्या कटकट आवाजाचे कारण आणि त्यावर उपाय

अनेकदा आपल्या लक्षात येते की, आपण खाली बसतो, उठतो तेव्हा आपल्या हाडांमधून...

⚙️ Font Size

100%
WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!