चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी आणि त्वचेचा रंग अधिक चमकदार करण्यासाठी अनेक तरुणी बोटॉक्स, डर्मल फिलर, ग्लूटाथिओन,पीआरपी आणि मेसोथेरपीसारखी इंजेक्शन्स घेतात. या इंजेक्शन्समुळे चेह-यावरील सुरकुत्या कमी होतातच शिवाय त्वचा घट्ट होते, ओठांना सुरेख आकार येतो. चेह-याची त्वचा अधिक चमकदार होऊन सौदर्यात भर पडते. सुरकुत्या कमी करण्यास, रंग सुधारण्यास यातून मदत होते. मात्र हे सर्व उपाय अनेकवेळा अपायकारक होऊ शकतात. या इंजेक्शन्सच्या अतिरेकी वापरामुळे चेह-याची मुळ ठेवणच बदलल्याच्या आणि चेहरा विद्रुप झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. काही तरुणींना या इंजेक्शन्समुळे आपला जीवही गमवावा लागला आहे. अर्थात या सर्व धोक्याकडे कानाडोळा करत अनेक तरुणी केवळ सुंदर दिसण्यासाठी हार्मोन्स इंजेक्शनचा वापर करतात. पण फक्त तरुणीच नाही तर उंटांवरही या हार्मोन्स इंजेक्शनचा वापर होत आहे, ही माहिती सांगितली तर तुम्हाला आश्चर्य वाटले. पण ही खरी माहिती आहे. ( Saudi Arabia )

सौदी अरेबियात जगातील सर्वात मोठा उंटांचा मेळा होतो. किंग अब्दुल अझीझ कॅमल फेस्टिव्हल या नावानं होणारा हा उंटांचा मेळा तब्बल चाळीस दिवस भरतो. सौदीच्या या प्रतिष्ठित उंट महोत्सवात यावर्षी ३५,००० उंटांनी भाग घेतला होता. यात उंटांच्या ज्या स्पर्धा घेण्यात येतात, त्यांच्यामध्ये असलेल्या बक्षीसामुळे या संख्येत दरवर्षी भर पडत आहे. मात्र यावर्षी बक्षिसांच्या लालसेमुळे या उंटावर हार्मोन इंजेक्श्न्सचा मोठा वापर होत असल्याचा खुलासा झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. सौदी अरेबियामधील सामाजिक जीवनात उंटाला मोठे स्थान आहे. त्यामुळे तिथे उंटांना इजा केल्यास शिक्षेची तरतूद आहे. अशावेळी चाळीसहून अधिक उंटांवर सौदर्य वाढवण्यासाठी हार्मोन्स इंजेक्शन्सचा वापर झाला असून त्यांना आणि त्यांच्या मालकांना स्पर्धेतून बाद कऱण्यात आले आहे.
सौदी अरेबियामध्ये होत असलेला अब्दुल अजीज कॅमल महोत्सव हा जगातील सर्वात मोठ्या उंटांचा मेळा असतो. यामध्ये सहभागी उंटांच्या सौंदर्य आणि क्रीडा स्पर्धा या वैशिष्टपूर्ण होतात. चाळीस दिवस चालणा-या उंटमेळ्यासाठी सौदीमध्ये मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटक येतात. त्यामुळे डिसेंबर ते जानेवारी या काळात सौदीमधील पर्यटनात मोठी उलाढाल होते. मात्र यावर्षीच्या किंग अब्दुल अजीज कॅमल सौंदर्य स्पर्धेत सहभागी झालेल्या चाळीस उंटांना बोटॉक्स आणि हार्मोन इंजेक्शन घेतल्याच्या आरोपाखाली अपात्र ठरवण्यात आले आहे. यामुळे या स्पर्धेच्या आयोजकांना मोठा धक्का लागला आहे. या प्रकारामुळे सौदीमधील उंटमेळ्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण या मेळ्यामागे सौदीमधील संस्कृतीची जगभरात ओळख करुन देणे हे प्रमुख उद्दीष्ट आहे. सोबतच जगभरात सौदीमधील पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या व्हिजन २०३० च्या ध्येयाशी हा उंट मेळा सुसंगत आहे. अब्दुल अजीज कॅमल महोत्सव म्हणून ओळखला जाणारा उंट मेळा २००० मध्ये सुरू झाला. याचे स्वरुप एवढे भव्य असते की, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही त्याची नोंद करण्यात आली आहे. अलिकडच्या काही वर्षात या उंट मेळ्यात सौदीसोबत जगभरतील अन्य देशातील उंटही सहभागी होत आहेत. ( Saudi Arabia )
या लोकप्रियतेमागे या उंटमेळ्यातील विविध स्पर्धेतील विजेत्या उंट मालकांना मिळणा-या बक्षिसाचे आमिषही आहे. येथील विजेत्या उंटांच्या मालकांना अंदाजे ६५ दशलक्ष रुपयांहून अधिक रुपयांची बक्षिसे मिळतात. यावर्षी तर पहिल्या क्रमांकाच्या उंटाच्या मालकाला एक स्वतंत्र बेटच बक्षिस स्वरुपात मिळाले आहे. या बक्षिसामुळेच या उंट मालकांमध्ये आपला उंटच सर्वात सुंदर आणि मजबूत दिसावा याची स्पर्धा लागते. स्पर्धेसाठी उंटांची निवड त्यांचे डोके, मान, कुबड, चेहऱ्याचे वैशिष्ट्य, चाल आणि पोश्चर यावरून केली जाते. आता उंटांचे स्नायू मजबूत करण्यासाठी उंटांचे नाक, तोंड, ओठ, मान आणि कुबडे मोठे करण्यासाठी त्यांच्यावर बोटॉक्स आणि हार्मोन इंजेक्शनचा वापर करण्यात आला आहे.
=======
हे देखील वाचा : Saudi Arabia : बापरे… शर्यत जिंकणा-याला मिळाले चक्क खाजगी बेट
=======
अशा ४० उंटांना उंट सौंदर्य स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. या उंट मेळ्याच्या नियमांनुसार, उंटांमध्ये फिलर्स, बोटॉक्स किंवा हार्मोन्स इंजेक्शन देणे हे दंडनीय आहे. उंटांच्या शेपट्या कापणे किंवा रंगवणे यासारख्या कृत्यासाठीही मोठी दंडांची तरतूद आहे. याबाबत जाहीर झालेल्या अहवालानुसार काही उंटांच्या मालकांनी त्यांच्या उंटांचे ओठ वेगळे दिसण्यासाठी आणि अधिक आकर्षक दिसण्यासाठी कोलेजन लिप फिलरचा वापर केला. तसेच रबर बँडने उंटांच्या शरीरातील अवयवही फुगवण्यात आल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे या उंटांच्या मालकांना आता काय शिक्षा होणार याकडे लक्ष लागले आहे. तसेच त्यांनी जिंकलेली बक्षीसेही परत घेणार का, हा प्रश्नही विचारला जात आहे. ( Saudi Arabia )
सई बने
- altered features
- animal welfare
- Botox
- camel beauty contest
- camel breeding
- camel injections
- camel owners
- cheating scandal
- collagen lip filler
- competition rules
- cosmetic enhancement
- Cultural Heritage
- desert festival
- disqualification
- ethics
- fillers
- Guinness record
- hormone injections
- inflated lips
- King Abdulaziz Camel Festival
- prize money
- Riyadh region
- Saudi Arabia
- veterinary inspection
- Vision 2030 tourism