Home गाजावाजा स्पेशल Triyuginarayan Temple : विशाल निकम आणि अक्षया हिंदळकर यांनी लग्न केलेल्या त्रियुगीनारायण मंदिराची माहिती
गाजावाजा स्पेशल

Triyuginarayan Temple : विशाल निकम आणि अक्षया हिंदळकर यांनी लग्न केलेल्या त्रियुगीनारायण मंदिराची माहिती

1
Naga Women Sadhu
Naga Women Sadhu

लग्न… प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा आणि संस्मरणीय दिवस. संपूर्ण जीवनाला चांगल्या अर्थाने कलाटणी देणारा हा दिवस कायम अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या लक्षात राहण्यासाठी सगळेच हरतऱ्हेने प्रयत्न करत असतात. आपले लग्न कसे होईल याचा विचार सर्वच खूप आधीपासून करून ठेवतात. आजकाल लग्न म्हटले की, देश विदेशातील अतिशय सुंदर निसर्गरम्य ठिकाणं बुक केले जातात आणि तिथे डेस्टिनेशन वेडिंग केले जाते. मात्र सध्या एका अनोख्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. हे लग्न एका अतिशय सुंदर आणि धार्मिक ठिकाणी संपन्न झाल्याने हे लग्न कमालीचे गाजत आहे. (Triyuginarayan Temple)

नुकताच मराठी अभिनेता विशाल निकम आणि अभिनेत्री अक्षया हिंदळकर यांनी लगीनगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. १२ फेब्रुवारी रोजी त्यांनी उत्तराखंडच्या त्रियुगीनारायण मंदिरात त्यांनी लग्न केले. विशाल आणि अक्षया यांनी त्यांच्या लग्नासाठी अत्यंत खास आणि पवित्र जागा निवडली आहे. जिथे लोकं अतिशय महागड्या ठिकाणी जाऊन लग्न करताना दिसत आहे, तिथे विशाल आणि अक्षया यांनी लग्नासाठी निवडलेल्या पवित्र ठिकाणामुळे या दोघांचे सर्वच लोकं कौतुक करत आहे. (Marathi)

विशाल आणि अक्षया यांनी उत्तराखंडच्या त्रियुगीनारायण मंदिरात लग्न केले. हे मंदिर आणि या मंदिराबद्दल लोकांना खूपच उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे आज आपण याबद्दल माहिती जाणून घेऊया. हिमालयाच्या पायथ्याशी दाेन हजार मीटर उंचीवर ज्या मंदिरात भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला असे मानले जाते ते मंदिर म्हणजे त्रियुगीनारायण. हे मंदिर आणि या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर मधल्या काही काळापासून विवाहस्थळ म्हणून लोकप्रिय होताना दिसत आहे. येथे दरवर्षी २०० हून अधिक विवाह संपन्न हाेतात. (Top Trending News)

Triyuginarayan Temple

त्रियुगीनारायण हे मंदिर उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात आहे. तीन युगांपासून येथील अग्निकुंड अखंड प्रज्वलित असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या मंदिराचे नाव त्रियुगीनारायण पडले. असे मानले जाते की या मंदिरात अग्नी प्रदक्षिणा केल्याने पती-पत्नी जन्मजन्मांतरीचे सहचर होतात. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार पूर्वी फक्त आजूबाजूच्या गावांतील लोकच विवाह करत. २०१५ ला येथील लग्नाचा एक व्हिडिओ पाहिल्यानंतरपासून देश-विदेशातील विवाहेच्छुकांची संख्या वाढली. त्रियुगीनारायण मंदिरात विवाहासाठी रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे या मंदिरात लग्नासाठी तारीख मिळणे अवघड असते. या मंदिरात एका दिवसात फक्त तीन विवाह लावण्याची व्यवस्था आहे. (Marathi News)

शिव-पार्वती विवाहात, विष्णूंनी माता पार्वतीचा भाऊ म्हणून सर्व विधींमध्ये सहभागी झाले, तर ब्रह्मदेव या विवाहासाठी पुजारी हाेते. विवाह स्थळासाठी निश्चित केलेल्या जागेला ब्रह्मशिला म्हणतात, जी मंदिरासमोर आहे. या मंदिराच्या महात्म्याचे वर्णन पुराणातही आढळते. लग्नापूर्वी सर्व देवतांनीही येथे स्नान केले होते त्यामुळे येथे तीन कुंड बनविण्यात आली. ती रुद्रकुंड, विष्णुकुंड आणि ब्रह्मकुंड नावाने आेळखली जातात. या तिन्ही तलावांतील पाणी सरस्वती कुंडातून येते. शिव आणि पार्वती यांच्या विवाहाचा साक्षीदार म्हणून येथे प्रज्वलित केलेला अग्नी आजही अखंड तेवत असल्याचे सांगितले जाते. या अग्नीला “अखंड धुनी” असे म्हटले जाते आणि तो वैवाहिक नात्यातील सातत्य, निष्ठा आणि समर्पणाचे प्रतीक मानला जातो. (Top Stories)

=========

Lord Shiv : महादेवासोबत असणाऱ्या ‘त्रिशुळ’ मागे आहे मोठा मतितार्थ

=========

देवी पार्वती ही राजा हिमावतची कन्या होती आणि तिला भोलेनाथ पती म्हणून हवे होते. यासाठी माता पार्वतीनेही कठोर तपस्या केली. यानंतर भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी माता पार्वतीशी विवाह केला. त्रियुगीनारायण मंदिरातच भगवान शिव आणि माता पार्वती यांनी सात फेरे घेतले अशी आख्यायिका आहे. पौराणिक कथेनुसार, भगवान विष्णू देवी पार्वतीच्या भावाच्या रूपात शिव-पार्वतीच्या विवाहाला उपस्थित होते आणि सर्व विधींचे पालन करत होते. या काळात ब्रह्माजी पुजारी बनले. म्हणून, लग्नाचे ठिकाण ब्रह्मशिला म्हणूनही ओळखले जाते, जे त्रियुगीनारायण मंदिराच्या अगदी समोर आहे. असे म्हटले जाते की लग्नापूर्वी येथे देवी-देवतांच्या स्नानासाठी तीन पाण्याचे तलाव बांधण्यात आले होते, जे रुद्र कुंड, विष्णू कुंड आणि ब्रह्मकुंड म्हणून ओळखले जातात. तसेच पुराणानुसार, त्रियुगीनारायण मंदिर त्रेता युगापासून अस्तित्वात आहे. पौराणिक कथेनुसार, याच ठिकाणी भगवान विष्णूने वामन अवतार घेतला होता. म्हणून, या ठिकाणी भगवान विष्णूची वामन देवतेच्या रूपात पूजा केली जाते. (Social News)

(टीप : येथे दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे दिलेली आहे.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

गाजावाजा स्पेशल

Akshaya Tritiya : जाणून घ्या अक्षय्य तृतीयेच्या दिवसाचे धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेचा सण येत्या...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

गाजावाजा स्पेशल

Ekadshi : वैशाख महिन्यात येणाऱ्या वरुथिनी एकादशीचे महत्त्व

हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता...

Flight Ticket Booking
गाजावाजा स्पेशल

E-Arrival Card नक्की काय आहे? कोणासाठी महत्वाचा आणि कोणती कागदपत्रे सादर करावी याबद्दल घ्या जाणून

E-Arrival Card :  भारतातील विमानतळ प्रवेश प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल होत आहे....

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!