Home सामाजिक Ujjain’s Mahakal Temple : बम बम भोले… बाबा महाकाल उत्सव सुरु
सामाजिक

Ujjain’s Mahakal Temple : बम बम भोले… बाबा महाकाल उत्सव सुरु

1

उज्जैनमधील बाबा महाकालचा महिमा हा खूप मोठा आहे. पवित्र अशा १२ ज्योतिर्लिंगांपैकी हे एक स्थान आहे. दक्षिणेकडे तोंड असलेले हे भारतातील एकमात्र ज्योतिर्लिंग आहे. मृत्युवर विजय मिळवणारा देवता, म्हणूनही उज्जैननगरीमध्ये बाबा महाकाल यांची पूजा केली जाते. उज्जैनमध्ये बाबा महाकाल यांची भस्म आरतीही खूप लोकप्रिय आहे. मृत्यूवर विजयाचे प्रतिक म्हणून या आरतीकडे भाविक बघतात. या सर्वांमुळेच उज्जैनमधील बाबा महाकाल यांच्या दरबारात रोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. पण हाच आकडा महाशिवारात्रीला दुप्पटीनं नाही तर चारपट वाढतो. यावर्षी महाशिवरात्र १५ फेब्रुवारी रोजी साजरी होत आहे. त्यासाठी बाबा महाकाल यांची उज्जैन नगरी सजू लागली आहे. आत्तापासूनच देशभरातीलच नव्हे तर परदेशातील भाविकही येथे दाखल होऊ लागले आहेत. ( Ujjain’s Mahakal Temple )

Ujjain’s Mahakal Temple

महाकाल मंदिरामध्येही या भव्य उत्सवाची तयारी सुरु झाली आहे. बाबा महाकाल यांची महाशिवरात्र या नगरीमध्ये पंधरा दिवस साजरी होते. १५ जानेवारी रोजी महाशिवरात्र असली तरी येथे ६ फेब्रुवारी रोजी बाबा महाकाल मंदिरात उत्सव सुरू होणार आहे. यासाठी भाविकांचा मेळा जमू लागला आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला भगवान शंकराच्या आवडत्या महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो. यावेळी, ही शुभ तिथी रविवार, १५ फेब्रुवारी रोजी येते. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान शंकर आणि देवी पार्वतीचा विवाह याच दिवशी झाला होता.

म्हणून या महाशिवरात्रीला देशभरातील सर्वच शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होते. त्यातही बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या उज्जैन येथील बाबा महाकाल मंदिरात हा महाशिवरात्रीचा सोहळा नऊ दिवस साजरा होतो. यावेळी, हा उत्सव ६ फेब्रुवारीपासून सुरू होईल. महाशिवरात्रीला आता काही दिवसच उरले असल्याने, उज्जैनमधील बाबा महाकाल मंदिरात भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या लग्नाच्या उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. फक्त बाबा महाकाल मंदिर नाही तर उज्जैनमध्ये भगवान शंकराची अनेक मंदिरे आहेत. या सर्वच मंदिरांमध्ये रंगरंगोटी सुरु झाली आहे. ( Ujjain’s Mahakal Temple )

बाबा महाकाल मंदिरातही मोठ्या संख्येनं येणा-या भाविकांच्या सोयीसाठी तयारी सुरु झाली आहे. शिवाय महाकाल मंदिराच्या भिंती आणि शिखरही रंगवले जात आहेत. ६ फेब्रुवारी पासून या मंदिरामध्ये नऊ दिवसांचा उत्सव सुरु होईल. त्यात बाबा महाकाल हे नऊ वेगवेगळ्या रूपांमध्ये भक्तांना दर्शन देतील. या उत्सव काळात मंदिरामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये दररोज रुद्राभिषेक होईल. यावेळी भक्तांची मोठी संख्या पाहता मंदिर २४ तास दर्शनासाठी सुरु ठेवण्यात येणार आहे. बाबा महाकाल यांच्या नऊ दिवसाच्या उत्सवात नऊ वेगवेगळ्या मूर्तींची स्थापना आणि पूजा देखील करण्यात येणार आहे. हे नऊ दिवस नवरात्रीच्या नऊ दिवसांसारखेच येथे साजरे केले जातात.

उत्सावाच्या पहिल्या दिवशी बाबांना वस्त्रांनी सजवले जाते. दुसऱ्या दिवशी बाबा महाकाल यांना शेषनागाने सजवले जाते. तिसऱ्या दिवशी, शिवलिंगासारखे दिसणारे घट स्थापित केले जाते. चौथ्या दिवशी, भगवानांची प्रतिमा दिसते. बाबा महाकाल यांना पवित्र पाणी, दूध, दही, तूप, मध आणि भस्माने अभिषेक करण्यात येतो. त्यानंतर त्यांना भांग, सुकामेवा आणि पारंपारिक वस्त्रांनी सजवले जाते. पाचव्या दिवशी, बाबांना मन-महेश, उमा महेश, शिव तांडव आणि होळकर म्हणून सजवले जाते. ( Ujjain’s Mahakal Temple )

=======

हे देखील वाचा : Religious : भारतातील ‘या’ मंदिरांमध्ये चक्क पुरुषांना जाण्यास आहे मनाई

=======

१५ फेब्रुवारी रोजी बाबा महाकाल यांची विशेष पूजा केली जाते. यावळी जलधारीसह चार तास पूजा आणि आरती होते. रात्री बाबा महाकाल यांना वर म्हणून स्नान घालून सजवले जाते. या रात्री एक विशेष शृंगार पूजा केली जाते, त्या पूजेला सेहरा दर्शन असेही म्हटले जाते. या नऊ दिवसांच्या उत्सवाच्या काळात मंदिर परिसरात भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम होतो. उज्जैनमधील बाबा महाकाल हे ज्योतिर्लिंग स्वयंप्रकाशित आहे. हे मंदिर त्याच्या भव्यतेसाठी ओळखले जाते. या नगरीमध्ये बाबा महाकाल यांना पृथ्वीचा राजा म्हणून मान दिला जातो. त्यामुळेच आपल्या राजाचा हा उत्सव साजरा करण्यासठी अवघी उज्जैन नगरी सजवली जाते. या उत्सवात सहभागी होण्यासाठी देश-विदेशातून भाविक या नगरीत दाखल होतात. आत्ताही मोठ्या संख्येनं भाविक या उज्जैन नगरीमध्ये दाखल होत असून हर हर महादेव चा जयघोष येथे सर्वत्र ऐकू येत आहे. ( Ujjain’s Mahakal Temple )

सई बने

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Health Care
सामाजिक

Chardham Yatra : चारधाम यात्रेची तयारी सुरू

उत्तराखंडची चारधाम यात्रा १९ एप्रिल रोजी सुरू होणार आहे. अक्षय तृतीयेचा मुहूर्त...

सामाजिक

Yamunotri Dham : यमुनोत्री धामची रहस्ये

उत्तराखंड राज्यातील चारधाम यात्रेचे हिंदू धर्मात मोठे महत्त्व आहे. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ...

सामाजिक

Narmadeshwar Mahadev Temple : रंग बदलणारे शिवलिंग

उत्तर प्रदेशामध्ये भगवान शंकराची अनेक मंदिरे आहेत. या मंदिरांच्या स्थापनेमागे पौराणिक कथा...

सामाजिक

Chilkur Balaji Temple : अनोखे व्हिसा मंदिर

प्रभू श्रीरामांचे परमभक्त असलेल्या महाबली हनुमानांचा जन्मोत्सव २ एप्रिल रोजी साजरा होणार...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!