आज २४ जानेवारी २०२६ शनिवार. आजचा दिवस शनिदेव आणि हनुमान यांना समर्पित असून, आजच्या दिवशी या दोघांच्या उपासनेला मोठे महत्त्व आहे. आजची तिथी शुक्ल षष्ठी असून, आजचे नक्षत्र उत्तराभाद्रपदा आहे. आजच्या दिवसातील अमृतकाळ हा सकाळी ०७.१२ पासून ते ०८:३६ पर्यंत असे. तर राहूकाळ हा १० वाजेपासून ते ११:२४ पर्यंत राहणार आहे. आजच्या दिवशी सुर्योदय सकाळी ०७ वाजून १२ मिनिटांनी झाला आहे तर सुर्यास्त संध्याकाळी ०६ वाजून २४ मिनिटांनी होईल. आजचा दिवस हा बारा राशीच्या लोकांसाठी कसा असेल?, बारा राशींचे आजचे भविष्य काय आहे चला जाणून घेऊया.
मेष
मेष राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होण्याच्या शक्यता आहे. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची साथ मिळेल, त्यामुळे कामाचे कौतुक होईल. व्यवसायात तुम्हाला नवीन यश मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात असलेले वाद, मनमुटाव आज मिटतील आणि वैवाहिक आयुष्य सुखकर होऊ शकते.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस धावपळीचा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात शिक्षकांकडून पाठिंबा मिळेल. व्यवसायातही तुम्हाला चांगला नफा दिसेल. आज तुमच्या कुटुंबात असणारे कौटुंबिक वाद मिटण्याची देखील शक्यता आहे.
मिथुन
तुम्हाला तुमच्या जुन्या कर्जातून मुक्ती मिळेल. अनेक कामांमध्ये संयम ठेवणे खूप गरजेचे आहे. आज राग आणि घाई यावर नियंत्रण न ठेवल्यास परिस्थिती बिघडू शकते. सकारात्मक राहा आणि नवीन अनुभवांसाठी तयार रहा.
कर्क
खाजगी नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी बदली होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत हलक्याने घेऊ नका. पैशांच्या बाबतीत सावध राहा आणि थोडी बचत करण्याचा विचार करा. अनावश्यक खर्च कमी करा.
सिंह
ऑफिसमध्ये तुमच्या कामामुळे आज तुमचा बॉस तुमच्यावर खूश असणार आहे. इतरांच्या बाबींमध्ये अनावश्यक हस्तक्षेप करणे टाळा. आज सिंह राशींच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमचे विचार इतरांवर चांगला प्रभाव टाकतील. नवीन ओळखी होतील किंवा जुने संबंध सुधारतील.

कन्या
आज घरी शुभ कार्यक्रम ठरू शकतात. कामांचे नियोजन करण्यासाठी वेळ चांगला आहे. तुमच्या कामामुळे काही लोकांना फायदा होऊ शकतो. प्रिय व्यक्तींसोबत वेळ घालवल्यामुळे आनंद आणि समाधान मिळेल. तुमच्या मेहनतीला चांगलं फळ मिळेल. तुम्हाला डोळ्यांशी संबंधित समस्या येऊ शकते.
तूळ
आज तुमचा आदर आणि सन्मान वाढेल. उधार घेतलेले पैसे आज परत मिळू शकतात. मानसिकदृष्ट्या तुम्ही संतुलित आणि शांत राहाल. नकारात्मक लोकांच्या सानिध्यात आणि संपर्कात राहू नका.
वृश्चिक
आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांना आज यश मिळेल. मात्र लक्षात ठेवा लोभामुळे नुकसानही होऊ शकते. वैवाहिक जीवन सुखकर राहील. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आज तुम्हाला नक्कीच यश देईल आणि तुम्ही यशस्वी व्हाल. आज बहुतेक तुमची रखडलेली कामेही पूर्ण होतील.
धनु
आज तुमच्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम दिसतील. आज तुमची सामाजिक प्रतिमा सुधारेल. वेळेनुसार तुमचे वर्तन बदला. तुमच्या योजना आणि कामे सुरू करण्यासाठी हा काळ योग्य आहे. संवाद केल्याने गैरसमज दूर होतील. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल.
मकर
तुमचा सहज आणि उत्साही स्वभाव लोकांना तुमच्याकडे आकर्षित करेल. पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतो. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. लक्षात घ्या गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य नाही. तुम्हाला सरकारी योजनांचा पूर्ण फायदा होईल.
कुंभ
आज तुमच्या महत्त्वाच्या निर्णयाचे कौतुक होईल. पती-पत्नी एकमेकांच्या मदतीने आज मोठी समस्या सोडवण्यात यशस्वी होतील. व्यवसायात तुम्हाला काही चढ-उतारांचा सामना करावा लागेल.
मीन
मालमत्तेच्या कामात तुम्हाला धावपळ करावी लागू शकते. दुसऱ्यांच्या कामात ढवळाढवळ करू नका. मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील. एखाद्या जुन्या मित्राची भेट होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील.
( टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics