Home आरोग्य Health Care : नवीन वर्षात हेल्दी आणि फिट राहण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स
आरोग्य

Health Care : नवीन वर्षात हेल्दी आणि फिट राहण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

1

उद्यापासून २०२६ या नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. नवीन वर्ष म्हणजे नवी उमेद, नवा आनंद, नवा उत्साह, नवीन संकल्प, नवीन सुरुवात. २०२५ या वर्षाने प्रत्येकाच्याच आयुष्यात चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही आठवणी आणि अनुभव दिले असतील. मात्र २०२६ या वर्षात प्रवेश करताना सर्वानी सकारात्मक राहून २०२६ वर्षाचे स्वागत करावे. आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे स्वतःचे आरोग्य जपणे. आज प्रत्येक व्यक्ती कामासाठी, पैशासाठी स्वतःच्या आरोग्याचा विचार न करता सतत पळत आहे. याचा दुष्परिणाम त्याच्या तब्येतीवर दिसून येत आहे. (New Year 2026)

खूपच कमी वयात अनेक लोकं मोठ्या आणि दुर्धर आजारांना सामोरे जात आहे. त्यामुळेच आज ३१ डिसेंबर २०२५ वर्षाच्या शेवटच्या दिवशी सगळ्यांनीच नवीन वर्षात आरोग्य जपण्याचा संकल्प केला पाहिजे. खूप जास्त नाही पण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनशैलीत थोडे आणि छोटे बदल करून तुम्ही नक्कीच हेल्दी राहू शकता. कारण शेवटी ‘सर सलामत पगडी हजार’ म्हणजेच उत्तम आरोग्य जर असेल तर तुम्ही नक्कीच भरपूर पैसा कमावून जीवनाचा आनंद घेऊ शकता. तुमच्या रोजच्या जीवनात तुम्ही कशा पद्धतीने बदल करून हेल्दी राहू शकता पाहूया. (Health Care)

लवकर उठण्याची सवय करा
अनेकांसाठी सकाळी लवकर उठणे हे सर्वात कठीण काम आहे. मात्र, जर तुम्ही सकाळी लवकर उठण्यास सुरुवात केली तर तुम्हालाच एक नवीन आणि चांगला बदल तुमच्या आयुष्यात झालेला दिसेल. सकाळी लवकर उठल्यास तणाव कमी होतो, एकाग्रता वाढते, आरोग्य सुधारते कारण तुम्हाला व्यायाम आणि सकस नाश्त्यासाठी वेळ मिळतो, मानसिक आरोग्य चांगले राहते, ज्यामुळे दिवसभर सकारात्मकता राहील. वेळेचे नियोजन करता येईल. तसेच शारिरीक ताण येणार नाही यासाठी सकाळी लवकर उठण्याची सवय लावा. (Marathi News)

हेल्दी ब्रेकफास्ट
सकाळचे पहिले जेवण म्हणजे तुमचा नाश्ता. लक्षात घ्या तुमच्या नाश्ता कायम निरोगी आणि पौष्टिक असायला हवा कारण तो तुम्हाला दिवसभर चार्ज करतो. सकाळी उठल्यानंतर पोटभर नाश्ता करावा. नाश्ता केल्यामुळे पोट भरलेले राहते, यासोबतच शरीरात थकवा अशक्तपणा जाणवत नाही. त्यामुळे सकाळच्या नाश्त्याची सुरुवात हलक्या पदार्थांचे सेवन करून करावी. नाश्ता न करणे हे खूपच चुकीचे आहे कारण असे केल्याने वजन वाढू शकते. याव्यतिरिक्त हृदयविकार, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्टेरॉलचा धोका वाढू शकतो. (Todays Marathi HEadline)

Health Care

भरपूर पाणी प्या
निरोगी राहण्यासाठी अन्नाइतकेच पाण्याचे सेवनही गरजेचे आहे. यासाठी दिवसातून किमान ७ ते ८ ग्लास पाणी प्या. पण, हिवाळ्यात जास्त पाण्याचे सेवन होत नाही. तेव्हा तुम्ही ज्यूस, सूप, दूध किंवा नारळाच्या पाण्याचे सेवन करू शकता. पण, सकाळची सुरुवात कोमट पाण्याने करा. (Top Marathi News)

कॅफिन प्रमाण कमी करा
तुमच्या कॅफिनच्या सेवनाकडे लक्ष द्या. दिवसभर स्वतःला ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी अति प्रमाणात चहा-कॉफी पिऊ नका. त्याऐवजी पाणी, लिंबाचा रस, नारळ पाणी, स्मूदी, दूध आणि कोल्ड्रिंक्सने स्वतःला हायड्रेट करा. (Latest Marathi Headline)

स्वतःला वेळ द्या
आपण आपल्या कामाच्या व्यापात आपण इतके व्यस्त असतो की स्वत:साठी वेळच काढत नाही. त्यामुळे या नवीन वर्षात स्वत:साठी किमान दररोज ३० मिनिटं काढण्याचा संकल्प करा. या वेळेत तुम्ही मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर, टिव्हीपासून दूर राहा. स्वतःशी गप्पा मारा, तुमचे छंद जोपासा, वाचन करा, स्वतःचीच कंपनी एन्जॉय करा. (New Year News)

चालणे
दररोज किमान ३० मिनिटे चाला. नियमित चालल्यामुळे शरीर सक्रिय राहण्यास मदत होते. याशिवाय शरीराचा रक्तप्रवाह सुधारतो आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यावर चांगले परिणाम दिसून येतात. त्यामुळे दिवसभरातून नियमित ३० मिनिटं चालणे आवश्यक आहे. कार्डिओ केल्यामुळे शरीराचे रक्तभिसरण सुधारते. शिवाय घर किंवा ऑफिसमध्ये वर-खाली करण्यासाठी लिफ्टऐवजी जिन्यांचा वापर करा. असे केल्याने तुम्ही तुमचे पाय तसेच हृदय निरोगी ठेवू शकता. (Top Marathi News)

योग्य झोप
दररोज सात तासांची झोप घेणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. रात्रीची झोप पूर्ण झाली नाही तर दिवसा डुलकी घेणं महत्त्वाचं आहे. दिवसातून किमान तास तासांची झोप घेणं आरोग्यासाठी आणि अनेक आजारांना प्रतिबंधित करण्यास देखील मदत करते. (Top Trending Headline)

=======

Stomach Pain : हिवाळ्यात उद्भवणाऱ्या पोटाच्या विविध समस्यांवर करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय

Health Tips : नवं वर्ष सुरू होण्यापूर्वी लावा या 5 सवयी, रहाल फिट आणि हेल्दी

Health Tips : प्रेग्नेंसीमध्ये काम आणि आरामामध्ये असे ठेवा संतुलन, वाचा टिप्स

=======

वेळेवर जेवण करा
वेळेवर जेवण केल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते, पचनक्रिया सुधारते, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते, चयापचय क्रिया वाढते, ऊर्जा टिकून राहते आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते, ज्यामुळे एकूणच आरोग्य चांगले राहते आणि रात्री शांत झोप लागते. रात्रीचे जेवण झोपण्याच्या २-३ तास आधी, शक्यतो संध्याकाळी ७ ते ८ च्या दरम्यान घ्यावे, जेणेकरून शरीराला पचनासाठी पुरेसा वेळ मिळेल. (Top Stories)

आहाराकडे लक्ष द्या
जर तुम्ही नवीन वर्षात फिटनेसचा विचार केला असेल तर त्यासाठी योग्य आहाराकडेही लक्ष द्या. यासाठी आहारात फळे आणि भाज्यांचे प्रमाण वाढवा. तसेच, जंक फूड आणि प्रीढर्वेटिव्ह्सचं प्रमाण कमी करा. यामुळे तुमची अनेक आजारांपासून सुटका होईल. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Blood Pressure 
आरोग्य

Health : स्मरणशक्ती शार्प ठेवण्यासाठी आजच आहारात करा ‘हे’ बदल

आपण दैनंदिन जीवनात करत असलेल्या प्रत्येक लहान सहान गोष्टीचा चांगला, वाईट परिणाम...

Potato
आरोग्य

Potato : खरंच बटाटा खाल्ल्याने वजन वाढते का?

आपल्या भारतीय घरांमध्ये स्वयंपाक घराचा राजा कोण असे विचारल्यावर सर्वच लोकांचे एकच...

Pooja Bhatt Relationships
आरोग्य

Dental Care : मोत्यासारखे पांढरेशुभ्र दात पाहिजे, मग आजच ‘हे’ उपाय करा

असे अनेकदा म्हटले जाते की दातांची ट्रीटमेंट ही सर्वात खर्चिक असते. त्यामुळे...

आरोग्य

Joints Sound : हाडांमधून येणाऱ्या कटकट आवाजाचे कारण आणि त्यावर उपाय

अनेकदा आपल्या लक्षात येते की, आपण खाली बसतो, उठतो तेव्हा आपल्या हाडांमधून...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!