Home लाईफ स्टाईल Driving : रात्री कार चालवताना ‘या’ टिप्स लक्षात ठेवा आणि अपघात टाळा
लाईफ स्टाईल

Driving : रात्री कार चालवताना ‘या’ टिप्स लक्षात ठेवा आणि अपघात टाळा

0
Ravindra Chavan | K Facts

अनेकांना कार चालवायला खूप आवडते. ड्रायविंग अनेकांची आवड नाही तर पॅशन असते. प्रवास जवळचा असो किंवा लांबचा बरेच लोकं कारलाच प्राधान्य देतात. पण आजच्या काळात कार चालवणे अजिबातच सोपे राहिलेले नाही. दररोज आपण कार अपघाताच्या अनेक बातम्या वाचत असतो. त्यामुळे कार चालवताना अतिशय नीट आणि काळजीपूर्व ड्राईव्ह करणे गरजेचे आहे. कार चालवणे दिवसापेक्षा अधिक रात्री आव्हानात्मक असते कारण कमी प्रकाश, कमी दृश्यमानता आणि जास्त थकवा यामुळे रात्री अपघात होण्याची शक्यता वाढते. (Driving)

वाहन चालवताना प्रामुख्याने रात्री वाहन चालवताना आपण विशेष काळजी घेतली पाहिजे. रात्रीच्या वेळी गाडी चालवताना लोक बर्‍याच गोष्टींकडे दुर्लक्ष करतात, यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते. रात्री रहदारी कमी असते, सिग्नल यंत्रणा देखील बंद असते. त्यामुळे अनेक लोकं रात्री अतिवेगात गाडी चालवतात आणि नियमांचे उल्लंघन करतात. पण याच गोष्टी जीवावर देखील बेतू शकतात. अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी सुरक्षितपणे गाडी चालवायची असेल तर काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. रात्रीच्या वेळी गाडी चालवण्याशी संबंधित काही टिप्स आम्ही तुम्हाला देत आहोत. (Top Stories)

कारची दुरुस्ती आणि देखभाल पाहा
आपल्या कारचा मेंटेनन्स वेळोवेळी करत जा. जर तुम्ही रात्रीच्या सुमारास प्रवास करणार असाल तर आपली कार पूर्णपणे फिट आहे का याची तपासणी करुन घ्या. गाडीची हेडलाईट, ब्रेक, सिग्नल लाईट्स, फॉग लाईट्स व्यवस्थित काम करत आहे की नाही याची तपासणी करुन मगच प्रवास सुरू करा.

सर्व लाईट्स चेक करा
जर आपण रात्री वाहन चालवत असाल तर हेडलाईटसह सर्व लाईट्स योग्यरित्या कार्यरत आहेत की नाही याची पुष्टी करा. लाईट्स योग्यरित्या काम करत नसल्यास त्यांना मॅकेनिककडे जाऊन नीट करुन घ्या. (Car Tips)

गाडीच्या काचा, आरसे स्वच्छ करून नीट सेट करा
रात्रीच्या वेळी गाडी चालवताना आधी सर्व काचा साफ करा. विंडशील्ड साफ न केल्यास त्यामुळे गाडी चालवताना अडचण येऊ शकतात. समोरून प्रकाश पडल्यामुळे त्यामध्ये अधिक त्रास होतो. म्हणूनच, सर्व काचा स्वच्छ कराव्या. यासह, बाहेरील आणि आतील आरसे योग्यरित्या सेट केल्या पाहिजेत. (Driving Tips)

अतिरीक्त भोजन टाळा
जेंव्हा पोटभर अन्न खाल्ले जाते तेंव्हा झोप यायला वेळ लागत नाही. म्हणूनच गाडी चालवण्यापूर्वी अति अन्न खाऊ नका. थोड्या थोड्या वेळाने काहीतरी खाणे चांगले राहील , ज्यामुळे तुमला सुस्ती येणार नाही तसेच तुम्हाला एनर्जी मिळत राहील. (Marathi News)

आवडती गाणी ऐका
तुम्ही तुमची आवडती गाणी ऐकू शकता जेणेकरून गाडी चालवताना तुम्हाला झोप येणार नाही. शक्य झाल्यास गाणे गुणगूना झोपेला दूर सारण्यासाठी हा उपाय खुप प्रभावी आहे. यामुळे तुमचा प्रवास सुरक्षित होण्यास मदत मिळेल. (Todays Marathi Headline)

Driving

चहा-कॉफी प्या
गाडी चालवताना झोप येत असेल तर वाटेत ढाबा किंवा रेस्टॉरंटमध्ये थांबून हलका नाश्ता किंवा चहा-कॉफी प्यावी. हे तुम्हाला जास्त काळ जागे राहण्यास मदत करेल. मात्र याचे अति सेवन करणे टाळावे.

अंतर ठेवून गाडी चालवा
वाहन चालवताना अंतर राखले पाहिजे. पुढील कार आणि आपले वाहन दरम्यान अंतर असले पाहिजे. जर आपल्याला कार थांबवायची असेल तर त्यासाठी आपल्याला पुरेसा वेळ मिळेल. महामार्गावर विशेष काळजी घेतली पाहिजे. (Marathi)

कारमधील लाईट्स बंद करा
गाडी चालवताना आतील लाईट्स लावू नयेत. तसेच डॅशबोर्डच्या लाईट्सचा बाईटनेस कमी करुन ठेवा. गाडीतील लाईट जास्त असल्यास समोरच्या दृश्यमानतेमध्ये फरक पडतो आणि स्पष्ट दिसत नाही. म्हणून आतला प्रकाश नेहमीच कमी किंवा बंद ठेवला पाहिजे. (Marathi News)

कार चांगल्या स्थितीत ठेवा
आपल्या कारची योग्य प्रकारे देखभाल करा. तुमच्या कारचे हेडलाइट्स, ब्रेक लाईट्स आणि टर्न सिग्नल्स व्यवस्थित काम करत असल्याची खात्री करा. तुमच्या कारमध्ये फॉग लाइट्स असतील तर तेही चालू ठेवा. (Top Marathi News)

ओव्हरस्पीड करू नका
रात्रीचा रस्ता सुनसान पाहून अनेकदा लोक भरधाव वेगात गाडी चालवतात. असे करणे चुकीचे आहे, रात्रीच्या वेळी कधीही अतिवेगाने गाडी चालवू नये, कारण रात्री गाडी चालवताना अनेकदा झोप येते, त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते. रात्री ड्रायव्हिंग करताना झोप येऊ नये म्हणून मधेच ब्रेक घेणं आणि रिफ्रेशमेंट घेत राहणं गरजेचं आहे. ओव्हरस्पीड करू नका आणि काळजीपूर्वक वाहन चालवा. रात्रीच्या वेळी रस्त्याची स्थिती समजून घेणे अधिक कठीण आहे. त्यामुळे सावकाश आणि मर्यादीत वेगात चालवा.(Latest Marathi Headline)

लो-बीम आणि हाय-बीम
रात्री गाडी चालवण्यापूर्वी लो-बीम आणि हाय-बीमच्या वापराविषयी खात्री करून घ्या. कार कमी बीमवर चालवा आणि आवश्यक असेल तेव्हाच उच्च बीमवर स्विच करा. जर गाडीचे लाईट्स खराब झाले असतील किंवा नीट काम करत नसेल तर रात्री गाडी चालवणे खूप धोकादायक आणि अवघड असते. कारण त्यामुळे गाडी चालवणाऱ्या व्यक्तीला रस्ता नीट दिसत नाही तसेच समोरून येणाऱ्या वाहनांनाही वाहनाची उपस्थिती नीट समजू शकत नाही. (Top Trending Headline)

=========

Travelling : भारतातील सर्वोत्तम रोड ट्रिप करायची असेल तर ‘ही’ ठिकाणं आहेत परफेक्ट ऑप्शन

=========

थोड्या थोड्या वेळाने ब्रेक घ्या
लांब गाडी चालवल्याने डोळ्यांना थकवा येऊ शकतो, त्यामुळे, डोळ्यांना विश्रांती देण्यासाठी दर काही तासांनी थांबणे आवश्यक आहे.

रात्री गाडी चालवण्यासाठी योग्य चष्मा वापरा
जर तुम्ही चष्मा वापरत असाल तर रात्री गाडी चालवताना योग्य त्या लेन्सचा वापर करा. ZEISS ड्राइव्हसेफ लेन्स खास रात्रीच्या वाहनचालकांसाठी बनवण्यात आली आहे. रात्री हेडलाइट्समधून येणारी चमक कमी करण्यासाठी आणि रात्री गाडी चालवताना कॉन्ट्रास्ट वाढवण्यासाठी हे लेन्स डिझाइन केलेले आहेत, ज्यामुळे ते अधिक आरामदायी आणि सुरक्षित आहेत. हे लेन्स दृष्टी सुधारतील आणि डोळ्यांचा ताण कमी करतील. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

लाईफ स्टाईल

Vallabhacharya : वल्लभाचार्य जयंती – कोण होते कृष्णभक्त वल्लभाचार्य?

आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अकरावी तिथी अर्थात. आज चैत्र महिन्यातील एकादशीचा...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!