Home लाईफ स्टाईल Travelling : भारतातील सर्वोत्तम रोड ट्रिप करायची असेल तर ‘ही’ ठिकाणं आहेत परफेक्ट ऑप्शन
लाईफ स्टाईल

Travelling : भारतातील सर्वोत्तम रोड ट्रिप करायची असेल तर ‘ही’ ठिकाणं आहेत परफेक्ट ऑप्शन

1

आपल्या रोजच्या व्यापातून, धावपळीतून, दैनंदिन रुटीनमधून ब्रेक म्हणून लोकं विकेंड ट्रिप प्लॅन करतात आणि जवळच कुठेतरी जाऊन रिलॅक्स होतात. मात्र काही लोकांना रिलॅक्स होण्यासाठी मस्त लॉन्ग ड्राइव्हला जायला आवडते. दरवेळेस मित्रमैत्रिणींसोबत किंवा कुटुंबासोबत रेझॉर्टवर जाऊन रिलॅक्स होण्यापेक्षा कधी कधी काहीतरी नवीन अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच एखादी रोड ट्रिप प्लॅन करू शकता. भारतात रोड ट्रीपसाठी अनेक उत्तम आणि संस्मरणीय पर्याय आहेत. यातलेच महत्त्व आणि अतिशय प्रसिद्ध असे रोड ट्रिपचे ऑप्शन आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. रोड ट्रीपमध्ये तुम्ही निसर्गाच्या अगदी जवळ जाऊन त्याचे सौंदर्य पाहू शकता. त्या त्या परिसरातील संस्कृती, पदार्थ अनुभवू शकता. रोड ट्रिप अनेकांचे स्वप्न असते तर अनेकांची पॅशन असते. याच रोड ट्रिपचे काही उत्तम पर्याय खालील प्रमाणे. (Travelling)

चंदीगड ते कसौली
हिवाळा असो वा उन्हाळा, डोंगरावर जाण्याची मजा वेगळीच असते. पावसाळ्यात हलक्या पावसाच्या सरीतून तुम्ही रोड ट्रिपला जाऊ शकता. यासाठी तुम्ही चंदीगड आणि कसौलीचा मार्ग निवडू शकता. त्याचे अंतर 59 किमी आहे, जे तुम्ही सुमारे २ तासांत पार करू शकता. येथे तुम्हाला सर्वत्र हिरवगार डोंगर दिसेल, ज्यामुळे तुमचा प्रवास आणखी संस्मरणीय बनू शकतो. तुम्ही आठवड्याच्या शेवटी या रोड ट्रिपचे नियोजन करू शकता. (Road Trip)

उदयपूर ते माउंट अबू 
पावसाळ्यात राजस्थान पाहण्यासारखे आहे. जर तुम्ही उदयपूरमध्ये राहत असाल किंवा फिरायला गेला असाल तर तुम्ही माउंट अबूला रोड ट्रिप करू शकता. पावसाळ्यात येथील दृश्य देखील खूप सुंदर असते. येथील रस्ते खूप चांगले असून रोड ट्रिपवर जाण्यासाठी हा एक उत्तम पर्याय असेल. जर आपण येथील अंतराबद्दल बोललो तर उदयपूर ते माउंट अबू हे अंतर १६१ किमी आहे, जे तुम्ही २-३ तासांत पूर्ण करू शकता. (marathi News)

दिल्ली ते ग्वाल्हेर 
जर तुम्ही दिल्लीत राहत असाल किंवा रोड ट्रिपची योजना आखली असेल, तर ग्वाल्हेरला जाणे चांगले उत्तम आहे. पावसाळ्यात दिल्लीचे दृश्यही खूप सुंदर होते. ग्वाल्हेरच्या रोड ट्रिप दरम्यान तुम्हाला वाटेत मथुरा आणि आग्रा सारखी ठिकाणे आहेत जी तुमचा प्रवास संस्मरणीय बनवू शकतात. तुम्ही किमान एकदा तरी या रोड ट्रिपचा अनुभव नक्कीच घ्यावा. त्याचे अंतर सुमारे ३६१ किमी आहे. (Top marathi News)

Travelling

पुणे ते बेलगाम
पश्चिमी घाटातून जाणारी ही रोड ट्रिप निसर्गसौंदर्याने परिपूर्ण आहे. पुण्यापासून बेलगामपर्यंतचा सुमारे ३०० किमीचा प्रवास घनदाट जंगल, वळणावळणाचे रस्ते आणि थंड हवामान अनुभवायला देतो. या प्रवासात सातारा, पंचगणी आणि महाबळेश्वरसारखी प्रसिद्ध हिल स्टेशन्स पाहायला मिळतात. दोन दिवसांची ही रोड ट्रिप मन आणि शरीर दोन्ही ताजेतवाने करते. (Top Stories)

मनाली ते लेह
ही ट्रिप भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि साहसी रोड ट्रिपपैकी एक आहे. हा जगातील सर्वात कठिण मार्ग आहे. या ट्रिपमध्ये तुम्ही उंच पर्वत, बर्फाच्छादित रस्ते आणि निळे आकाशाचा आनंद घेऊ शकता. हा संपूर्ण रोड काल्पनिक, स्वप्नवतच जाणतो. मात्र, हिवाळ्यात हा रस्ता बंद असतो. या रस्त्यावर तुम्ही फक्त उन्हाळ्यामध्ये म्हणजेच मे ते सप्टेंबर सहलीचे नियोजन करू शकता. या काळात, तुम्हाला रोहतांग पास, बारालाचा ला आणि खारदुंग ला सारख्या वरच्या ठिकाणांचे नयनरम्य दृश्ये पाहता येतील. (Top Marathi News)

मुंबई ते गोवा
महाराष्ट्रातून सुरू होणारी कोकण कोस्ट रोड ट्रिप ही निसर्गप्रेमींसाठी स्वर्गसमान आहे. मुंबई किंवा पुण्यापासून सुरू होणारा हा सुमारे ६०० किमीचा प्रवास अरब सागराच्या किनाऱ्याने जातो. वाटेत रत्नागिरी, सिंधुदुर्गसारखी निसर्गरम्य ठिकाणे, हिरवीगार डोंगररांग आणि शांत समुद्रकिनारे मन मोहून टाकतात. या रोड ट्रिपसाठी साधारण २ ते ३ दिवस पुरेसे ठरतात. (Latest Marathi Headline)

=======

Blue Mind Therapy : ब्लू माइंड थेरपी नक्की काय आहे? आरोग्याला होणारे फायदे घ्या जाणून

=======

गंगटोक ते नाथुला खिंड
पूर्व भारताचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे. सिक्कीमचा हा रोड ट्रिपचे आनंद द्विगुणित करते. गंगटोक ते नाथुला खिंडीपर्यंतचा मार्ग डोंगरांमधून जातो. तुम्हाला हवे असल्यास, वाटेत तुम्ही चांगू तलावाला भेट देऊ शकता. तसंच बाबा हरभजन मंदिराला भेट द्यायला विसरू नका. हिवाळ्यात, हा मार्ग बर्फाने झाकलेला असतो आणि खूप सुंदर दिसतो. (Top Trending News)

गुवाहाटी ते तवांग
भेट देण्यासाठी तवांग हा एक उत्तम पर्याय आहे. तवांग बौद्ध संस्कृतीचा वारसा सांभाळत आहे. येथे अनेक सुंदर मठ आहेत. तुम्ही गुवाहाटीहून तवांगला रस्त्याने जाऊ शकता. वाटेत सुंदर पर्वत, सुंदर तलाव आणि घनदाट जंगले दिसतात. गुवाहाटी ते तवांग हा प्रवास अगदी सहज आणि कमी पैशात करता येतो. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

लाईफ स्टाईल

Vallabhacharya : वल्लभाचार्य जयंती – कोण होते कृष्णभक्त वल्लभाचार्य?

आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अकरावी तिथी अर्थात. आज चैत्र महिन्यातील एकादशीचा...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!