Home आरोग्य Beauty Tips : हिवाळ्यात फाटलेल्या ओठांसाठी करा ‘हे’ सोपे लाभदायक उपाय
आरोग्य

Beauty Tips : हिवाळ्यात फाटलेल्या ओठांसाठी करा ‘हे’ सोपे लाभदायक उपाय

1
Kojagiri Purnima

हिवाळा म्हणजे थंड वारा, कोरडी हवा आणि सततची कोरडे होणारी त्वचा. कोरड्या वाऱ्यांमुळे आपली संपूर्ण त्वचा कोरडी होते. याचा परिणाम आपल्या नाजूक ओठांवर देखील होतो. थंडीच्या हंगामात अनेकांच्या ओठांवर वेदनादायक क्रॅक्स पडतात, रक्त येते, हसता येत नाही, जेवताना तोंड उघडणे देखील कठीण वाटते, कधी कधी खूप जळजळ होते. यासाठी आपण बरेच उपाय केले तरी पाहिजे तितका फायदा आपल्याला होत नाही. (Lip Care)

ओठांची त्वचा अतिशय पातळ आणि संवेदनशील असल्याने ओठ कोरडे होणे आणि त्यांना तडे जाणे ही बाब खूप सामान्य आहे. फुटलेले ओठ कोणत्याही वयात आणि कोणत्याही ऋतूत होऊ शकतात. पण हिवाळ्यात हा त्रास वाढतो. कोरडे आणि फुटलेले ओठ केवळ दिसायला अनाकर्षक वाटतातच. मात्र यासाठीच आता आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत, जे करून तुम्हाला नक्कीच त्याचे लाभ होतील. (Winter Care)

* जर तुमचे ओठ खूप फाटले असतील तर त्यासाठी बदामाचे तेल प्रभावी ठरू शकते. बदामाच्या तेलामध्ये अँटी-ऑक्सीडेंट्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आढळतात, ज्यामुळे ओठांची सूज कमी होऊन फाटलेल्या ओठांचा त्रास कमी होतो. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर बदामाचे तेल लावावे.

* थंडीच्या दिवसात त्वचा खूप फाटू शकते. अशा परिस्थितीमध्ये नारळाच्या तेलाचा वापर प्रभावी ठरू शकते. फाटलेल्या ओठांचा त्रास कमी करण्यासाठी दिवसातून कमीत कमी 2 ते 3 वेळा ओठांना नारळाचे तेल लावावे. यामुळे हळूहळू तुमचे ओठ मुलायम होतील. (Todays Marathi Headline)

* व्हॅसलीनमध्ये थोडे ऑलिव्ह ऑईल मिसळा आणि रोज रात्री झोपताना ओठांवर लावा. यामुळे तुमच्या फाटलेल्या ओठांची समस्या तर दूर होईल.

Beauty Tips

* फाटलेल्या ओठांचा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही सायीचाही वापर करू शकतात.त्यामुळे तुमचे ओठ लोण्यासारखे मऊ होतील. यासाठी दररोज ओठांवर साय लावून हलक्या हाताने मसाज करावा. काही दिवसांतच याचा परिणाम दिसेल आणि तुमचे ओठ गुलाबी व मऊ होतील. (Top Marathi Headline)

* फाटलेल्या ओठांवर क्रीम लावणे खूप फायदेशीर आहे. रोज झोपण्यापूर्वी ओठांवर क्रीम लावा आणि थोडा वेळ मसाज करा. यामुळे फाटलेले ओठ खूप मऊ होतील.

* ‎शरीरातील पाण्याची कमतरता ओठ पटकन कोरडे करते. त्यामुळे दिवसातून सात ते आठ ग्लास पाणी पिणं गरजेचं. व्हिटॅमिन बी, सी आणि ई असलेले पदार्थ जसे की संत्री, डाळिंब, ड्रायफ्रूट्स, बिया, आणि हिरव्या पालेभाज्या ओठांचा नैसर्गिक मऊपणा टिकवतात. (Latest Marathi News)

* ‎हिवाळ्यात अनेक जण गरम पाण्याने आंघोळ करतात. पण गरम पाणी त्वचेतील नैसर्गिक तेलं कमी करतं आणि याचा परिणाम ओठांवरही दिसतो. त्यामुळे खूपच गरम पाण्याचा वापर टाळावा किंवा आंघोळीनंतर लगेच मॉइश्चरायझर आणि लिप बाम लावावा.

* ओठांना तडे जाण्यापासून वाचवण्यासाठी गुलाबपाणी, कच्चे दूध आणि मध्यापासून घरीच एक DIY क्रीम तयार करून. ती क्रीम लावून ओठांची निगा राखण्यास मदत होईल. (Top Trending Headline)

* हिवाळ्यात ओठांवर मृत पेशी जास्त जमा होतात. त्यामुळे दोन-तीन दिवस ओठ स्क्रब करा. मध मिसळून कॉफी पावडरमध्ये मध मिसळून त्याचा वापर स्क्रबर म्हणून करता येतो. साखर आणि लिंबाच्या रसाने देखील ओठांना घासल्यास फायदा होईल.

=======

Skin Care: लटकणारी त्वचा टाईट करण्यासाठी करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय

=======

* काकडीचा रस ओठांवर लावल्याने काळे डाग दूर होतात. लिंबू, बटाटा आणि बीटरूटचा रस रात्री ओठांवर लावून सकाळी ओठ धुतल्यास ओठावरील काळे डाग दूर होतील. (Top Stories)

* कोरडे ओठ असणाऱ्यांनी नेहमी लिप बाम लावावा. हिवाळ्यात शक्यतो मॅट लिपस्टिक लावणे टाळा. जर लावायची असेल तर आधी ओठ चांगले मॉइश्चरायझ करून मगच लावावी.

* रात्री झोपण्यापूर्वी देखील नाभीवर मोहरीचे तेल लावा. सुंदर आणि मऊ ओठांसाठी हा आयुर्वेदिक उपाय नक्की करून पाहा. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Blood Pressure 
आरोग्य

Health : स्मरणशक्ती शार्प ठेवण्यासाठी आजच आहारात करा ‘हे’ बदल

आपण दैनंदिन जीवनात करत असलेल्या प्रत्येक लहान सहान गोष्टीचा चांगला, वाईट परिणाम...

Potato
आरोग्य

Potato : खरंच बटाटा खाल्ल्याने वजन वाढते का?

आपल्या भारतीय घरांमध्ये स्वयंपाक घराचा राजा कोण असे विचारल्यावर सर्वच लोकांचे एकच...

Pooja Bhatt Relationships
आरोग्य

Dental Care : मोत्यासारखे पांढरेशुभ्र दात पाहिजे, मग आजच ‘हे’ उपाय करा

असे अनेकदा म्हटले जाते की दातांची ट्रीटमेंट ही सर्वात खर्चिक असते. त्यामुळे...

आरोग्य

Joints Sound : हाडांमधून येणाऱ्या कटकट आवाजाचे कारण आणि त्यावर उपाय

अनेकदा आपल्या लक्षात येते की, आपण खाली बसतो, उठतो तेव्हा आपल्या हाडांमधून...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!