पंतप्रधान मोदींच्या तीन देशांच्या दौऱ्यातील शेवटचा दौरा ओमान या देशाचा आहे. पंतप्रधान मोदी या देशात पोहचल्यावर त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मस्कत आंतरराष्ट्रीय विमानतळावर गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. या दौ-यात पंतप्रधान ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. सोबतच पंतप्रधान सुलतान हैतम यांच्या राजवाड्यालाही भेट देणार आहेत. याच सुलतानाच्या राजवाड्याच्या आणि सुलतानाच्या संपत्तीच्या कथा सध्या सोशल मिडियावर रंगल्या आहेत. सुलतान हैथम हे जगातील निवडक श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये आहेत. या सुलतानाचे एक-दोन नाहीत, तर चक्क सहा राजवाडे आहेत. त्यातील एका राजवाड्याच्या भिंतींना सोन्याचा मुलामा चढवण्यात आला आहे. या सुलतानाकडे असलेल्या जहाजाच्या ताफ्याच्याची स्वतंत्र कथा आहेत. अत्यंत विलासी जीवन जगत असलेले सुलतान हैथम हे आधुनिक विचारसरणीचे आहेत. तेलावर अवलंबून असलेल्या या देशाची अर्थव्यवस्था आता पर्यटनाकडे वळवण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. (Sultan Haitham bin Tariq)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ओमान भेट ही अधिक चर्चेत आली ती तेथील सुलतान हैथम बिन तारिक यांच्यामुळे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओमानला भेट दिली तो दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेच्या ७० वा वर्धापन दिन होता. डिसेंबर २०२३ मध्ये ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांनी भारताला भेट दिली होती. तेव्हापासूनच नरेंद्र मोदी यांच्या या दौ-याची पायाभरणी झाली होती. ६८ वर्षीय हैथम बिन तारिक हे ओमान या अरब देशाचे सुलतान आणि पंतप्रधानही आहेत. (International news)
हैथम हे काबूस बिन सैद यांचे चुलत भाऊ आहेत. सुलतान हैथम यांच्या आधी ते ओमानचे सुलतान होते. सैद यांचे २०२० मध्ये निधन झाले. काबूस यांनी त्यांच्या मृत्युपत्रात हैथम यांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून नाव दिले होते. त्यामुळे हैथम यांना ओमानचे सुलतान करण्यात आले आणि ओमानच्या राजघराण्याचा आणि त्यातील अफाट संपत्तीचा वारसा त्यांच्याकडे आला. त्यांच्या अल सैद राजवंशाने ३०० वर्षांहून अधिक काळ ओमानवर राज्य केले आहे. सद्यपरिस्थितीत सुलतान हैथम बिन तारिक यांचे ओमानमध्ये सहा भव्य राजवाडे आहेत. या राजवाड्यांमध्ये २०० वर्षे जुना अल आलम पॅलेस समाविष्ट आहे. हा राजवाडा सध्या देशविदेशातील पर्यटकांचे सर्वात आवडते स्थळ आहे. सुलतान हैथम हे ओमानला पर्यटनाच्या दृष्टीकोनातून तयार करत आहेत. यात त्यांनी आपल्या राजवाड्यांचाही समावेश केला आहे. यापैकी या राजघराण्याचा मुळ राजवाडा म्हणून ओळखण्यात येणारा अल आलम पॅलेस सर्वाधिक लोकप्रिय आहे. (Sultan Haitham bin Tariq)
ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक अल सैद हे एक कुशल शासक म्हणून ओळखले जातात. कारण त्यांनी आधुनिक आणि पारंपरिक यांची जोड साधली आहे. सुलतान हैथम यांचे प्राथमिक शिक्षण मस्कतमधील सैदिया शाळेत झाले. पर्यंत सुलतान हैथम लेबनॉनमधील ब्रुम्ना हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होते. १९७९ मध्ये त्यांनी ऑक्सफर्डमधील पेम्ब्रोक कॉलेजमधून परराष्ट्र सेवा कार्यक्रम मधून पदवी प्राप्त केली. तेव्हापासून ते ओमानच्या सेवात आहेत. सुरुवातीला सुलतान हैथम यांच्यावर पाश्चात्य विचारसणीचा प्रभाव असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र सुलतान हैथम यांनी ओमानला आर्थिक दृष्टा मजबूत करण्यासाठी मोठी कामगिरी पार पाडली आहे. (International news)
सुलतान हैथम यांचा विवाह अहद बिंत अब्दुल्लाहशी झाला आहे. शाही परंपरेनुसार, सुलतानला फक्त एकच पत्नी आहे. या शाही दांम्पत्याला चार अपत्ये असून त्यांचा मोठा मुलगा सय्यद थियाझिन बिन हैथम याला २०२१ मध्ये क्राउन प्रिन्स म्हणून नियुक्त करण्यात आले. थियाझिन यानेसुद्धा वडिलांप्रणामे ऑक्सफर्डमध्ये शिक्षण घेतले असून राजकुमार सध्या संस्कृती, क्रीडा आणि युवा मंत्री आहे. सुलतान हैथम यांच्या संपत्तीची कायम चर्चा असते. कारण सुलतान हैथम यांच्याकडे सहा मोठे राजवाडे आहेत. त्यापैकी सर्वात प्रमुख अल आलम पॅलेस आहे, जो २०० वर्षे जुना आहे. त्याचे दरवाजे सोन्याचे असून या राजवाड्याच्या भिंती निळ्या रंगांनी सजवलेल्या आहेत. हा फ्लॅग पॅलेस १९७२ मध्ये शाही निवासस्थान म्हणून पुन्हा बांधण्यात आला. यात स्विमिंग पूल, स्पा आणि सुंदर बागांसह अतिथी व्हिला आहे. याच राजवाड्यात ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय, किंग चार्ल्स आणि नेदरलँड्सच्या राणीसारखे मोठे पाहुणे राहून गेले आहेत. (Sultan Haitham bin Tariq)

सुलतान हैथम यांची परदेशातही मोठी संपत्ती आहे. लंडनच्या स्टॅफोर्डशायरमधील १४ एकरचे हेसेलौर हाऊसही कायम चर्चेत असते. दुसरी मालमत्ता, वोनहॅम मॅनर असून तिची किंमत $३५ दशलक्ष आहे. ती १९८० मध्ये खरेदी करण्यात आली होती आणि त्यात ८०० मीटर लांबीचा तलाव आणि हरणांचे कुरण आहे. माजी सुलतान काबूस वर्षातून तीन दिवस तेथे घालवत असत आणि तलाव आणि मार्गांचे नूतनीकरण करण्यासाठी अंदाजे £७५०,००० खर्च करत असत. सुलतान हैथम यांच्याकडे शाही नौकांचा ताफा आहे. सर्वात मोठी अल सैद नौका आहे, जी ५०८ फूट लांब आहे आणि क्रूझ जहाजासारखी दिसते. तिची किंमत अंदाजे $६०० दशलक्ष आहे. त्यात २६ केबिन, एक पूर्णपणे सुसज्ज वैद्यकीय कक्ष, अनेक बैठक कक्ष, एक खाजगी थिएटर आणि एक जकूझी आहे. (International news)
====
हे देखील वाचा : Hanukkah : ज्यू समुदायाच्या प्रकाशोत्सवाला रक्ताचा डाग !
======
या नौकेचा आतील भाग ओमानी शैलीत सजवलेला आहे. या मोठ्या शाही नौकेशिवाय अल सलामा नावाची नौकाही अशाच शाही थाटात सजवलेली आहे. याशिवाय सुलतानाकडे विमानांचाही असाच ताफा आहे. त्यात तीन बोईंग ७४७ जंबो जेट, दोन एअरबस A320 आणि एक युरोकॉप्टर EC225 हेलिकॉप्टर यांचा समावेश आहे. सोबतच सुलतानाकडे १००० हून अधिक अस्सल अरबी घोडे आहेत. विलासी जीवन जगणारे सुलतान हैथम हे त्यांच्या व्हिजनसाठीही ओळखले जातात. ओमानची तेलावरील अवलंबून असणारी अर्थव्यवस्था भविष्यात धोक्यात येऊ शकते हे ओळखून त्यांनी ओमान व्हिजन २०४० लाँच केले आहे. (Sultan Haitham bin Tariq)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
- America
- BJP
- china
- congress
- cricket
- donald trump
- eknath shinde
- Entertainment
- india
- information
- International news
- Latest International News
- Latest Marathi Headline
- latest marathi news
- latest marathi updates
- latest social updates
- Maharashtra
- maharashtra politics
- Marathi News
- Mumbai
- Narendra Modi
- News
- Pakistan
- Political News
- political updates
- Politician
- Politics
- Social Updates
- Sultan Haitham bin Tariq
- todays marathi headlines
- Todays Marathi News
- Top Marathi Headlines
- Top Stories
- Uddhav Thackery
- राजकारण