Home गाजावाजा स्पेशल Kharmas : जाणून घ्या लवकरच सुरु होणाऱ्या खरमासाची माहिती
गाजावाजा स्पेशल

Kharmas : जाणून घ्या लवकरच सुरु होणाऱ्या खरमासाची माहिती

1

आपल्या हिंदू धर्मामध्ये मुहूर्त आणि शुभ दिवस या दोन गोष्टींचे मोठे महत्त्व आहे. आपण कोणत्याही लहान मोठ्या खरेदीच्या आधी शुभ दिवस आणि मुहूर्त ठरवतो आणि मग खरेदी करतो. याशिवाय लग्न, मुंज, गृहप्रवेश, साखरपुडा आदी समारंभ करताना तर शुभ दिवसासोबतच शुभ मुहूर्त देखील पाहिला जातो. मात्र वर्षभरात असे काही काळ येतात जेव्हा शुभ कार्य करण्याला मनाई असते. यातलाच एक काळ म्हणजे ‘खरमास’. हिंदू धर्मात खरमाला विशेष महत्त्व आहे. खरमास हा अशुभ महिना असतो. खरमास वर्षातून दोन वेळा येता. डिसेंबर-जानेवरी आणि मार्च-एप्रिल या महिन्यात खरमास येतो. दरवर्षी मार्गशीर्ष आणि पौष महिन्यात खरमास येतो. खरमासला मीनमास असेही म्हणतात. (Kharmas)

मान्यतेनुसार सूर्य ग्रह जेव्हा धनु किंवा मीन राशीत प्रवेश करतो तेव्हा खरमास सुरू होतो, कारण या काळात सूर्याची ऊर्जा कमी होते. २०२५ सालातला दुसरा खरमास हा येत्या १६ डिसेंबर २०२५ रोजी सुरु होत आहे. या दिवशी सूर्य धनु राशीत प्रवेश करेल. १६ डिसेंबरला सुरू होणार खरमास हा १४ जानेवारी २०२६ रोजी संपेल. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, त्यावेळी खरमास संपतो. धनु ही गुरूची राशी आहे. त्यामुळे या काळात केलेल्या शुभ कार्यांना गुरू आणि सूर्य देवाचा आशीर्वाद मिळत नाही. म्हणूनच खरमासात शुभ कार्य करण्याला मनाई केली जाते. (Marathi News)

हिंदू धर्मात, सूर्याला नऊ ग्रहांचा राजा आणि आत्म्याचा कारक मानले जाते. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, दर महिन्याला सूर्य देव एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करत असतो, ज्याला ‘संक्रांती’ असे म्हटले जाते. वर्षातून दोनदा, जेव्हा सूर्य देव गुरु राशी धनु आणि मीन राशीत प्रवेश करतो. तेव्हा त्या ३० दिवसांच्या कालावधीला ‘खरमास’ किंवा ‘मलमास’ म्हटले जाते. या काळात सर्व शुभ करण्यास मनाई असते. जेव्हा सूर्य धनु किंवा मीन राशीत असतो तेव्हा त्याचे तेज आणि शक्ती कमी होते. कोणत्याही शुभ कार्यासाठी सूर्याची पूर्ण शक्ती आणि तेज आवश्यक असते. मात्र याकाळात सूर्याचे तेज कमी असल्याने हाती घेतलेल्या कामात यश आणि शुभतेचा अभाव समजला जातो. याउलट गुरुच्या प्रभावामुळे, हा काळ आत्मशुद्धी, चिंतन आणि धार्मिक विधींसाठी देखील चांगला मानला जातो. मात्र तिक सुखांसाठी किंवा नवीन नातेसंबंध सुरू करण्यासाठी अनुकूल मानला जात नाही. (Marathi Headline)

Kharmas

खरमास कथा
पौराणिक कथेनुसार एकदा सूर्यदेव सात घोड्यांनी ओढलेल्या रथावर स्वार होऊन विश्वाची परिक्रमा करत होते. तेव्हा त्यांच्या रथाला लावलेले घोडे सतत चालल्यामुळे खूप थकले आणि सर्व घोडे तहानेने व्याकूळ झाले. घोड्यांची ही अवस्था पाहून सूर्यदेव फार दुःखी झाले आणि काळजी करू लागले. वाटेत त्याला एक तलाव दिसला ज्याजवळ दोन खार म्हणजे गाढवे उभी होती. भगवान सूर्यनारायणाने आपल्या तहानलेल्या घोड्यांना आराम देण्यासाठी दोन गाढवांना रथावर बांधले. पण खरांचा वेगही मंदावल्याने रथाचा वेग मंदावला. (Top Marathi News)

तरीही कसेबसे एक महिन्याचे आवर्तन पूर्ण झाले. तोपर्यंत घोड्यांना बरीच विश्रांती मिळाली होती. अशा प्रकारे हा क्रम सुरूच राहतो. त्यामुळे या महिन्याचे नाव खरमास ठेवण्यात आले. अशा रीतीने पौष महिन्यात खर मंद गतीने चालतात आणि या महिन्यात सूर्याची तीव्रता खूपच कमी होते. पौषाच्या संपूर्ण महिन्यात सूर्याचा प्रभाव पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात कमजोर होतो. सनातन धर्मात सूर्य हा महत्त्वाचा कारक मानला जात असल्याने सूर्याची कमकुवत स्थिती अशुभ मानली जाते, त्यामुळे खरमासात कोणत्याही प्रकारच्या शुभ कार्यावर बंदी आहे. (Latest Marathi Headline)

खरमासामध्ये या वेळी भगवान विष्णू आणि सूर्य देवाची पूजा केली जाते. भगवान कृष्ण हे समृद्धीचे प्रतिक मानले जातात. त्यांची या काळात पूजा अर्चना केल्यास व्यक्तीच्या जीवनात समृद्धी आणि आनंद येतो, असे सांगितले आहे. धार्मिक विद्वानांच्या मते भगवान विष्णू आणि सूर्यदेवाची दररोज खरमासात पूजा करावी. मानसिक शांती मिळविण्यासाठी खरमास दरम्यान ध्यान धरण्याचा सल्लाही देण्यात येतो. (Top Trending News)

=======

Chaturthi : मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या अखुरथ संकष्टी चतुर्थीचे महत्त्व

Kharmas : सावधान खरमास सुरु होतोय !

=======

खरमासात काय करावे काय करू नये?
लग्न, जावळ, कान टोचणे, गृहप्रवेश यासारखी सर्व शुभ कार्ये खरमासात होत नाहीत. या काळात कोणतेही नवीन काम, व्यवसाय इत्यादी सुरू करू नये. असे केल्याने व्यवसायात यश मिळत नाही आणि धनहानी देखील होऊ शकते असे मानले जाते. या महिन्यामुळे माणसाने लसूण, कांदा, मासे, अंडी आणि मांस-अल्कोहोल इत्यादि अन्नापासून दूर राहून शुद्ध शाकाहारी अन्न खावे. खरमासात दान धर्म करावे असं केल्याने पुण्य प्राप्त होते. या महिन्यात मनात कोणतीही इच्छा न बाळगता व्रत उपासना केल्याने चांगले फळ मिळते. या काळात गरजूंची सेवा करावी, दान करावे, साधू संतांची सेवा करावी. या काळात नवीन वस्त्र, दागिने, घर, वाहन दैनंदिनी जीवनावश्यक वस्तू खरेदी करू शकता. परंतु त्यांचा उपभोग करता येणार नाही. (Social News)

(टीप : वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

गाजावाजा स्पेशल

Akshaya Tritiya : जाणून घ्या अक्षय्य तृतीयेच्या दिवसाचे धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेचा सण येत्या...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

गाजावाजा स्पेशल

Ekadshi : वैशाख महिन्यात येणाऱ्या वरुथिनी एकादशीचे महत्त्व

हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता...

Flight Ticket Booking
गाजावाजा स्पेशल

E-Arrival Card नक्की काय आहे? कोणासाठी महत्वाचा आणि कोणती कागदपत्रे सादर करावी याबद्दल घ्या जाणून

E-Arrival Card :  भारतातील विमानतळ प्रवेश प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल होत आहे....

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!