Home आंतरराष्ट्रीय China VS Japan : तैवानवरुन चीन जपान युद्धाच्या उंबरठ्यावर !
आंतरराष्ट्रीय

China VS Japan : तैवानवरुन चीन जपान युद्धाच्या उंबरठ्यावर !

1

तैवानवरुन चीन आणि जपान हे दोन देश युद्धाच्या उंबरठ्यावर पोहचले आहेत. तैवानच्या सीमेजवळ चीनचे लढाऊ विमान आणि जहाज दिसले. त्यानंतर जपानच्या पंतप्रधानांनी चीनची ही कृती म्हणजे, जपानच्या अस्तित्वाला धोका असल्याचे सांगितले. यावर चिनी राजदूतानं थेट जपानच्या पंतप्रधान, शानाए ताकाची यांना गळा कापण्याची धमकी दिली. अर्थात जपानच्या पंतप्रधान ताकाची यांनीही यावर, आमची सेना तयार असल्याचा संदेश चीनला पाठवला. यामुळे तैवानवरुन आशियातील हे दोन शक्तिशाली देश एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. चीनकडे २० लाख सैन्य आणि ६०० अण्वस्त्रे आहेत. (China VS Japan)

असे असूनही, जपानला पराभूत करणे चीनला अशक्यप्राय असल्याचे तज्ञांचे मत आहे. तैवानवर वर्चस्व मिळवण्यासाठी गेल्या काही महिन्यापासून चीन अधिक आक्रमक झाला आहे. तैवानभोवती, चीनने आपली युद्ध जहाजे पाठवण्यास सुरुवात केली आहे. सध्या तैवानच्या जवळ 20 चिनी लष्करी विमाने आणि सहा जहाजे तैनात करण्यात आली आहेत. 20 चिनी लष्करी विमानांपैकी 17 विमानांनी मध्यरेषा ओलांडली आहे. या चिनी विमानांनी तैवानच्या उत्तर आणि नैऋत्य हवाई संरक्षण ओळख क्षेत्रात प्रवेश केल्याची माहिती आहे. हे सर्व होत असतांना तैवानच्या मदतीसाठी जपाननं पुढाकार घेतला आहे. जपानच्या पंतप्रधान शानाए ताकाची यांनी चिनी विमानांच्या या हालचाली पाहून जपानी सैन्याला सज्ज रहाण्याचे आदेश दिले आहेत. (International News)

जपानचे सर्वात पश्चिमेकडील बेट, योनागुनी बेट, तैवानच्या अगदी जवळ आहे. तैवान आणि जपानमधील सीमा पूर्व चीन समुद्रात आहे. तैवान आणि जपानमधील सर्वात कमी अंतर योनागुनी बेट आणि तैवान दरम्यान आहे. योनागुनी बेट तैवानपासून फक्त १११ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळेच चीनच्या लष्करानं तैवानवर आक्रमण केलेच तर त्याचा फटका जपानलाही बसणार आहे. यामुळेच जपानमध्ये चीनविरोधात वातावरण आहे. जपानी पंतप्रधान ताकाची यांनी तैवानच्या संरक्षणासाठी जपानी सैन्य सज्ज असल्याचे सांगितले आहे. तैवानवर हल्ला झाला तर जपानी सैन्य त्याला योग्य उत्तर देईल, असे ताकाची यांनी सांगताच, चीनमध्ये खळबळ उडाली. (China VS Japan)

चीनने जपानच्या पंतप्रधानांचे विधान अत्यंत बेजबाबदार आणि चिथावणीखोर असल्याचे सांगितले. तर ओसाकामधील चीनचे कॉन्सुल जनरल झ्यू जियान यांनी एक पाऊल पुढे जात, तैवानवरील चिनी हल्ल्यात जे हस्तक्षेप करतील, त्यांचा शिरच्छेद करण्यात येईल, असे वादग्रस्त विधान केले. त्यामुळे तैवानवरुन चीन आणि जपान यांच्यातील वैर अधिक वाढले. सध्या चीनने आपल्या नागरिकांना जपानमध्ये प्रवास न करण्याचा आदेश दिला आहे. चिनी चित्रपट वितरकांनी जपानी चित्रपटांचे प्रदर्शन थांबवले आहे. या सर्व युद्धजन्य वातावरणात तैवान आणि जपानच्या बाजुने अमेरिका उतरली आहे. अमेरिकेने या सर्व वादानंतर आम्ही जपानचे रक्षण करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आशियामधील ही युद्धजन्य परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. (International News)

अशातच जपानच्या नियंत्रणाखालील सेनकाकू बेटांजवळ चिनी तटरक्षक दलाची जहाजे दिसली आहेत. जपानी तटरक्षक दलाने या चिनी जहाजांना या भागातून जाण्याच्या सूचना दिल्यावर ही जहाजे याभागातून मागे झाली आहेत. मात्र चीन, जपानचा हा हस्तक्षेप अनावश्यक मानत आहे. चीन, तैवानला आपला प्रदेश मानतो. तर जपान आणि अमेरिकेने तैवानला स्वतंत्र देशाचा दर्जा दिला आहे. तैवान देशाचे स्वातंत्र्य हे जपानसाठी महत्त्वाचे आहे. कारण तैवानवर चीन किंवा अन्य कुठल्याही देशाचे वर्चस्व असेल, तर त्यांना तिथून सहजपणे जपानवर हल्ला करता येणार आहे. जपानपासून तैवान फक्त ११० किलोमीटर अंतरावर आहे. तैवानभोवतीचा समुद्री परिसर जपानसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या समुद्रात मोठ्या प्रमाणात मासेमारी होते, यावर जपानचे अर्थकारण जसे अवलंबून आहे, तसेच जपानी लोकांचे प्रमुख खाद्यही अवलंबून आहे. जपानी खाद्यामध्ये मासे हा प्रमुख प्रकार असतो. पण हे मासे ज्या समुद्रात मिळतात, त्या समुद्रावर चीनचे वर्चस्व आले, तर जपानच्या मासेमारीलाही अटकाव करण्यात येणार आहे. (China VS Japan)

=========

Vladimir Putin : पुतिनचा वारसा लेकीकडे !

=========

चीन आणि जपानची युद्धसज्जताही जाणणे महत्त्वाचे आहे. चीनकडे २० लाख सैनिक आहेत, जे जपानपेक्षा १० पट जास्त आहेत. शिवाय चीनकडे ६०० अण्वस्त्रे आहेत. असे असले तरी चीन सहजासहजी जपानला नमवू शकणार नाही. कारण नौदल युद्धात जपान वरचढ आहे. त्यांच्याकडे जगातील सर्वात प्रगत पाणबुडीविरोधी नौदल आहे. जपानची रडार प्रणाली खूप प्रगत आहे. जपानने आधीच जगातील सर्वोत्तम पॅट्रियट PAC-3 MSE प्रणाली स्थापित केली आहे. शिवाय, जपानने अमेरिकेशी एक करार केला आहे, ज्या अंतर्गत युद्धाच्या वेळी अमेरिका टोकियोला रडार सेवा प्रदान करणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, अमेरिका आणि जपानमध्ये संरक्षण करार आहे. हे युद्ध झाल्यास आशियातील अनेक देश जपानच्या बाजुने उभे रहातील, हे चीनला माहित आहे. त्यामुळेच जपानबरोबर युद्धाचा निर्णय घेणे, चीनसाठी सर्वात आव्हानात्मक असणार आहे. (International News)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Katrina Kaif
आंतरराष्ट्रीय

Jiang Xueqin : चीनच्या नॉस्ट्राडॅमसने सांगितले ट्रम्पचे भविष्य

अमेरिका-इराण युद्धामध्ये पंधरा दिवसांचा विराम आला आहे. यात चीनची भूमिका असल्याची माहिती...

Jewellery
आंतरराष्ट्रीय

Jared Kushner : ट्रम्पचा जावई आहे तरी कोण

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर कायमचा विराम आणण्यासाठी पाकिस्तानची राजधानी...

Mobile
आंतरराष्ट्रीय

First Lady Melania Trump : अमेरिकेच्या फर्स्ट लेडीसाठी शाही सवारी

इराणमध्ये सत्तांतर करण्याच्या हेतूने अमेरिकेने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरुद्ध लष्करी मोहीम...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!