Home आरोग्य Health : तुम्हाला श्वास घेताना त्रास होतो का? मग असू शकतो ‘हा’ आजार
आरोग्य

Health : तुम्हाला श्वास घेताना त्रास होतो का? मग असू शकतो ‘हा’ आजार

0

बॉलिवूडचे ‘ही-मॅन’अशी ओळख असलेल्या अभिनेते धर्मेंद्र यांचे नुकतेच निधन झाले. वयाच्या ८९ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही काळापासून त्यांची तब्येत ठीक नव्हती. त्यांना नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला रुग्णालयात भरती देखील केले होते. मात्र नंतर त्यांना घरी आणले होते आणि राहत्या घरीच त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. धर्मेंद्र हे ८९ व्या वर्षी देखील कमालीचे फिट होते. अनेकदा सोशल मीडियावर त्यांचे फिटनेसचे व्हिडिओ व्हायरल व्हायचे. ते चित्रपटांमध्ये देखील व्यस्त होते. असे असले तरी धर्मेंद्र हे ‘डिस्पनिया’ या आजाराने त्रस्त होते. आता डिस्पनिया आजार म्हणजे काय? तर या आजाराला आपण सामान्य भाषेत ‘श्वास लागणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे’ असे म्हणू शकतो. (Health)

डिस्पनिया म्हणजे नेमकं काय?
डिस्पनिया हा माणसाच्या श्वासाशी संबंधित असा आजार आहे. जेव्हा माणसाला श्वास घ्यायला त्रास होतो तेव्हा त्याला डिस्पनिया झाले असे म्हटले जाते. जसजसे माणसाचे वय वाढत जाते, तसतसे त्यांच्या शरीरातील अनेक स्नायूंचे कार्य मंदावू लागते. यातलीच श्वसनासंबंधित तक्रार निर्माण होते आणि त्रास जाणवू लागतो. डिस्पनिया याला सर्वसाधारणपणे श्वास घेण्यास त्रास, धाप लागणे किंवा श्वास गुदमरणे असे म्हटले जाते. डिस्पनिया हा स्वतःमध्ये रोग नसून एक लक्षण आहे. शरीरात काही आंतरिक तक्रार किंवा आजार सुरू असल्यास त्याचा परिणाम म्हणून हा त्रास निर्माण होतो. (Marathi News)

कधी कधी थोडा व्यायाम केल्यावर, गरम हवामानात किंवा तणावाखाली असताना धाप लागू शकते. पण जर तुम्हाला वारंवार किंवा कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय धाप लागत असेल, तर हे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. फुफ्फुसे, हृदय किंवा अगदी मानसिक आरोग्याच्या समस्या, जसे की चिंता, यामुळेही धाप लागू शकते. कधीकधी, फक्त शारीरिक तंदुरुस्ती कमी असणे हे देखील एक कारण असू शकते. मात्र, जर धाप लागणे सतत होत असेल किंवा वाढत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. श्वास घेण्याची प्रक्रिया फुप्फुसं, हृदय आणि श्वसनमार्ग यांच्या समन्वयावर अवलंबून असते. यापैकी कुठेही समस्या निर्माण झाली तर श्वास घेण्याची क्षमता कमी होते आणि धाप लागण्याचा अनुभव येतो. हृदयाची कार्यक्षमता कमी झाली की शरीराला पुरेसं ऑक्सिजनयुक्त रक्त मिळत नाही आणि श्वासोच्छ्वासाचा वेग वाढतो. (Top Marathi News)

Health

दमा, न्यूमोनिया, COPD (Chronic Obstructive Pulmonary Disease), फुप्फुसात पाणी भरणे, संक्रमण किंवा एलर्जी, हृदय निकामी होणे, हृदयाचे वाल्व किंवा रक्तप्रवाहातील अडचणी, हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीर देणारी चेतावणी, अॅनिमिया (रक्तातील हिमोग्लोबिन कमी असणे), चिंता, पॅनिक अटॅक अचानक जास्त परिश्रम करणे, स्थूलता किंवा फिटनेसची कमतरता, नैराश्य आदी कारणांमुळे हा आजार होऊ शकतो. (Top Trending News)

=======

Beauty Tips : ‘या’ घरगुती उपायांनी तुम्ही पिंपल्सपासून सुटका करून घेऊ शकता

=======

अचानक तीव्र धाप लागणे, छातीत वेदना, चेहरा किंवा ओठ निळसर पडणे, सतत चक्कर येणे, बोलताना किंवा चालताना श्वास रेंगाळणे, अशी लक्षणं दिसली तर ते धोकादायक ठरू शकतात. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. डिस्पनियाच्या गांभिर्यानुसार उपचार बदलतात, मात्र सर्वसाधारण धूम्रपान टाळणे, वजन नियंत्रित ठेवणे, नियमित व्यायाम करून फुप्फुसांची क्षमता वाढवणे, एलर्जी किंवा दमा असल्यास डॉक्टरांनी दिलेल्या इनहेलरचा योग्य वापर, ताण-तणाव कमी करण्यासाठी श्वसनाचे व्यायाम  करणे असा सल्ला डॉक्टर देतात. (Social News)

(टीप : कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांनाच सल्ला नक्की घ्या)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Blood Pressure 
आरोग्य

Health : स्मरणशक्ती शार्प ठेवण्यासाठी आजच आहारात करा ‘हे’ बदल

आपण दैनंदिन जीवनात करत असलेल्या प्रत्येक लहान सहान गोष्टीचा चांगला, वाईट परिणाम...

Potato
आरोग्य

Potato : खरंच बटाटा खाल्ल्याने वजन वाढते का?

आपल्या भारतीय घरांमध्ये स्वयंपाक घराचा राजा कोण असे विचारल्यावर सर्वच लोकांचे एकच...

Pooja Bhatt Relationships
आरोग्य

Dental Care : मोत्यासारखे पांढरेशुभ्र दात पाहिजे, मग आजच ‘हे’ उपाय करा

असे अनेकदा म्हटले जाते की दातांची ट्रीटमेंट ही सर्वात खर्चिक असते. त्यामुळे...

आरोग्य

Joints Sound : हाडांमधून येणाऱ्या कटकट आवाजाचे कारण आणि त्यावर उपाय

अनेकदा आपल्या लक्षात येते की, आपण खाली बसतो, उठतो तेव्हा आपल्या हाडांमधून...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!