निरोगी राहण्यासाठी उत्तम आहारासोबतच फळं खाणे देखील खूपच आवश्यक आहे. फळं कायम आपले आरोग्य नीट ठेवण्यासाठी आणि ते अधिक उत्तम करण्यासाठी मदत करत असतात. त्यामुळे प्रत्येक ऋतूमध्ये येणारी सर्व फळं आपण खाल्लीच पाहिजे. सर्वच घरांमध्ये फळं खरेदी केली जातात. बाजारात जाऊन नीट बघून, निवडून अतिशय उत्तम, खाण्यास योग्य आणि गोड रसाळ फळांची आपण खरेदी करतो. मात्र फळं खरेदी करताना तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का की, जेव्हा आपण फळं खरेदी करतो तेव्हा फळांच्या दुकानातील बऱ्याच फळांवर लहान लहान स्टिकर्स लावलेली असतात? आपण या स्टिकर्सकडे दुर्लक्ष करतो आणि फळं घेतो. घरी आल्यावर देखील ती स्टिकर्स सहज काढून टाकतो आणि फळं स्वच्छ करून खातो. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का की फळांवर हे स्टिकर्स का लावले जातात? या स्टिकर्सचा नक्की अर्थ काय? नाही माहिती ना…? मग चला आज याबद्दलच जाणून घेऊया. (Fruits)
फळांवरील स्टिकर्सवर एक नंबर किंवा कोड असतो आणि त्याचा एक विशेष अर्थ असतो. फळांवर लावण्यात आलेल्या स्टिकरवर जे कोड असतात ते फळांची गुणवत्ता दर्शवतात. या स्टिकर्सवर असलेली संख्या किती आहे आणि किती अंकी आहे तसेच कोणत्या क्रमांकाने सुरू होते यावरुन फळांची कॉलिटी निश्चित केली जाते. उदाहरणार्थ 5 क्रमांक एखाद्या फळाच्या स्टिकर्वर असेल तर ते फळ ऑर्गेनिक पद्धतीने पिकवलेले आहे. तर 4 क्रमांक असलेली फळे केमिकल आणि औषधांचा वापर करुन पिकवण्यात आली आहेत. (Latest Marathi Headline)

फळांवर चिकटवण्यात आलेल्या स्टिकर्सवरील संख्या पाच अंकी असेल आणि या स्टिकरवरील पहिला क्रमांक 9 असेल तर या कोडचा अर्थ असा होतो की, ही फळे सेंद्रिय पद्धतीने तयार केली आहेत. ही फळे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. जर एखाद्या फळावरील स्टिकरचा क्रमांक 8 ने सुरू होत असेल तर हे फळ अनुवांशिक संशोधन आणि बदल करुन तयार करण्यात आले आहे. म्हणजेच हे फळ नॉन ऑर्गेनिक फळ आहे. काही फळांच्या स्टिकरवरील संख्या 4 क्रमांकापासून होते. अशी फळे कीटकनाशके किंवा रसायनांचा वापर करुन पिकवलेली असतात. ही फळे सेंद्रिय फळांपेक्षा स्वस्त उपलब्ध असतात मात्र, ही आरोग्यासाठी फायदेशीर नसतात. (Top Trending News)
4 अंक असलेली फळे कधीही खरेदी करू नयेत. यामध्ये रसायने आणि औषधांचा वापर केलेला असतो. अशी फळे खाल्ल्याने आरोग्याला नुकसान जास्त होऊ शकते. फळे आणि भाज्यांमध्ये रसायनांचा अतिवापर केल्यास कर्करोगासारखे घातक आजार होऊ शकतात. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या फळांचा आहारात समावेश करा. काही फळे अशी आहेत त्यांच्यावर 5 अंकी संख्या असलेले स्टिकर्स चिटकवलेले असतात. तसेच यावरील संख्या 8 ने सुरू होतात. (Top Stories)
========
Whatsapp : WhatsApp वर तुम्हाला कोणी ब्लॉक केले हे ओळखण्यासाठी टिप्स
========
जर तुम्हाला फळांवर 85431 किंवा 82512 सारखे अंक लिहिलेले दिसले तर समजून घ्या की ही फळं अनुवांशिकरित्या सुधारित आहेत. याचा अर्थ असा की ही फळे नैसर्गिकरित्या पिकलेली नाहीत, तर प्रयोगशाळेत त्यावर प्रक्रिया करून तयार केलेले आहेत. 9 नंबरने सुरू होणारे 5 अंकी क्रमांक असलेले स्टिकर्स, जसे की 93435 किंवा 95365, याचा अर्थ असा की ही फळे रसायने आणि कीटकनाशकांशिवाय सेंद्रिय पद्धतीने पिकवली गेली आहेत. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics