Home आंतरराष्ट्रीय Gutka in London : अशी झालीय लंडनची दैना !
आंतरराष्ट्रीय

Gutka in London : अशी झालीय लंडनची दैना !

0

ब्रिटनची राजधानी लंडन हे त्या देशातले सर्वात मोठे शहर आहे. लंडन हे जागतिक स्तरावर राजकारण, शिक्षण, मनोरंजन, फॅशन आणि संस्कृतीचे एक महत्त्वाचे केंद्र ठरले आहे. मुख्यम्हणजे, ब्रिटनच्या राजघराण्याचे वास्तव्यही याच शहरात असल्यामळे या शहराला शाही स्वरुप आले आहे. लंडनमधील बकिंगहॅम पॅलेस, टॉवर ऑफ लंडन, लंडन आय, बिग बेन, टॉवर ब्रिज, ब्रिटिश संग्रहालय, वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे, नॅशनल गॅलरी, मॅडम तुसाद आणि हाइड पार्क यासारख्या अनेक ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी रोज देश-विदेशातील हजारो पर्यटक येथे येतात. लंडन शहराची संस्कृती, शाही इतिहास, जागतिक दर्जाची संग्रहालये यांचा अभ्यास करण्यासाठीही या शहरात अनेक अभ्यासक रोज येतात. याच लंडन शहरात ४० हून अधिक विद्यापीठे आहेत, जिथे जगभरातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन, इम्पीरियल कॉलेज लंडन, किंग्ज कॉलेज लंडन, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, क्वीन मेरी युनिव्हर्सिटी ऑफ लंडन यासारख्या प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणेही मानाचे समजले जाते. या सर्वांमुळे लंडन शहराची ओळख झाली असली तरी, आता याच लंडन चेहराचे रुपडे बदलले आहे. कारण एकेकाळी प्रतिष्ठीतांचे शहर म्हणून ओळखले जाणारे लंडन हे भिका-यांचे शहर होऊ लागले आहे. ज्या लंडन शहरामधील इमारती त्याच्या ऐतिहासिक सामर्थ्यांची ओळख करुन देत होत्या, त्याच इमारती आता गुटखा आणि पानाच्या पिचकारीनं रंगल्या आहेत. या गलिच्छ होत असलेल्या लंडनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. लंडनमधील एका तरुणीनं हा व्हिडिओ शूट केला असून त्यामध्ये तिने ग्रूमिंग गॅगनंतर  या गुटख्याच्या थुंकीनं आणि वाढत्या अस्वच्छतेनं लंडनची सर्वात दुर्दशा होत असल्याचे सांगण्यात आले आहे. ( Gutka in London ) 

Gutka in London
Gutka in London

लंडन, या शहराचे नाव काढले तरी, आपल्यासमोर येते ती या भव्य ऐतिहासीक शहरातील अनेक इमारती. राजवाडे आणि संग्रहालये. पण याच ऐतिहासीक शहराची सध्या दुर्दशा होत आहे. लंडनच्या पत्रकार ब्रुक डेव्हिसने सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून त्यामधील लंडनचे रुप बघून अनेकांना धक्का बसला आहे. या व्हिडिओमध्य ब्रुक डेव्हिसने आपल्या शहरातील रस्त्यांची स्थिती पहा कशी आहे, म्हणून लंडनमधील एक-एक रस्ते दाखवायला सुरुवात केली आहे. यातून मग तपकिरी, लाल रंगानं खराब झालेले रस्ते दिसायला लागतात. हे तपकिरी रंगाचे डाग पानाचे असून यामुळे या शहराचे सौदर्य बिघडून गेले आहे. पानाच्या आणि गुटख्याच्या या थुंकीमुळे येथील व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. पान खाणारे कुठल्याही स्वच्छतेच्या नियमांचे पालन न करता, थुंकत असून यामुळे व्यावसायिकांच्या वस्तूही खराब होत आहेत. रस्त्याच्या कोपऱ्यांवर, रस्त्याच्या मधोमध, खांबांवर आणि फुटपाथवर ठेवलेल्या फुलांच्या कुंड्यांवरही आता या पानाच्या पिचका-या दिसत आहेत.  

ब्रुक डेव्हिसने आपल्या शहराची ही दुर्दर्शा दाखवतांना तब्बल ३० मिनिटांचा व्हिडिओ केला आहे. त्यासाठी तिनं रस्त्यावरुन ३० मिनिटांची पायपीट केली. या ३० मिनिटामध्ये जळपास ५० ठिकाणी तिनं स्वतः लोकांना पान खाऊन पिचका-या टाकतांना पाहिलं आहे. हा सर्व व्हिडिओ शूट करतांना ब्रुक डेव्हिसने पाकिस्तानच्या ग्रूमिंग गॅंगचीही आठवण काढली आहे. लंडन आधीच पाकिस्तानच्या ग्रूमिंग गॅंगनं बदनाम केलं आहे. लंडनमधील हजारो मुलींचे आयुष्य या ग्रूमिंग गॅंगनं उद्धवस्त केलं आहे. अशा लंडनमध्ये आता भिका-यांच्या टोळ्याही मोठ्या प्रमाणात वाढल्याची खंतही ब्रुक व्यक्त करीत आहे. ( Gutka in London ) 

पानाच्या थुंकीने रंगलेले रस्ते ही लंडनमध्ये एक समस्या बनली आहे. ब्रुकच्या या व्हिडिओनं हे वास्तव जगासमोर आणले आहे. पण त्यासोबतच लंडनमधील अनेक व्यापारी आता पानावर बंदी आणावी म्हणून मागणी करु लागले आहेत. पान खाऊन थुंकणारे कुठलाही नियम पाळत नाहीत, त्यामुळे पोलीसांनी आता त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात येत आहे. यामागे एक आणखी काऱण आहे, उत्तर लंडन कौन्सिल हे डाग साफ करण्यासाठी दरवर्षी अंदाजे ₹३.६ दशलक्ष खर्च करत आहे. गुटख्याच्या घाणीची साफसफाई करण्यासाठी प्रामाणिक करदात्यांचे पैसे का वाया घालवायचे, हा प्रश्न आता लंडनमधील नागरिक विचारु लागले आहेत. 

=======

हे देखील वाचा : London : लंडनमध्ये स्थलांतरितांचा मुद्दा पेटणार !

=======

याआधी लंडन शहर हे ग्रूमिंग गॅंगमुळे चर्चेत आले होते. पाकिस्तानच्या या टोळ्यांनी लंडनच्या किशोरवयीन मुलींना लक्ष्य करुन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक एलोन मस्क यांनी ग्रूमिंग गँग घोटाळ्यावरून ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांना लक्ष्य केले आहे. या सर्व प्रकऱणात हजारो किशोरवयीन मुलींवर अत्याचार झाले आहेत. हे सर्व प्रकऱण गाजत असतांनाच आता लंडनमध्ये पानाच्या थुंकीनं लाल झालेले रस्ते वादात सापडले आहेत. पंतप्रधान किर स्टारमर यांनी या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेऊन, देशात अस्वच्छता आणि गुन्हेगारी करणा-यांना थेट देशातून बेदखल करावे, अशी मागणीही लंडनमध्ये जोर धरु लागली आहे. ( Gutka in London ) 

सई बने

 

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Katrina Kaif
आंतरराष्ट्रीय

Jiang Xueqin : चीनच्या नॉस्ट्राडॅमसने सांगितले ट्रम्पचे भविष्य

अमेरिका-इराण युद्धामध्ये पंधरा दिवसांचा विराम आला आहे. यात चीनची भूमिका असल्याची माहिती...

Jewellery
आंतरराष्ट्रीय

Jared Kushner : ट्रम्पचा जावई आहे तरी कोण

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर कायमचा विराम आणण्यासाठी पाकिस्तानची राजधानी...

Mobile
आंतरराष्ट्रीय

First Lady Melania Trump : अमेरिकेच्या फर्स्ट लेडीसाठी शाही सवारी

इराणमध्ये सत्तांतर करण्याच्या हेतूने अमेरिकेने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरुद्ध लष्करी मोहीम...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!