Home लाईफ स्टाईल Winter : धुक्यात गाडी चालवताना ‘या’ गोष्टी कायम लक्षात ठेवा
लाईफ स्टाईल

Winter : धुक्यात गाडी चालवताना ‘या’ गोष्टी कायम लक्षात ठेवा

0

डिसेंबर महिन्याचा उत्तरार्ध सुरु झाला असून थंडीने देखील चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सगळ्यांनाच हवीहवीशी वाटणारी गुलाबी थंडी वाढतच आहे. सकाळी आणि रात्री थंडीचा जोर जास्तच जाणवत आहे. या थंडीमुळे बाहेर सकाळ, संध्याकाळच्या वेळेला चांगलेच धुके पडत आहे. धुक्याची पांढरी चादर आपल्याला एक वेगळाच अनुभव देत असली तरी हे धुके धोकादायक देखील असू शकते. दाट धुक्यामध्ये रस्त्यावरून गाड्या चालवणे खूपच गंभीर आणि जीवघेणे ठरू शकते. कारण धुक्यामुळे समोरचे अस्पष्ट दिसते आणि अशा वेळी गाडी चालवणे नक्कीच धोकादायक आहे. दाट धुक्यात काहीही दिसत नाही, त्यामुळे रस्ते अपघात होण्याचे प्रमाण खूपच वाढते. त्यामुळेच धुक्यात वाहन चालवताना पूर्ण दक्षता बाळगणे, फारच महत्त्वाचे आहे. आज या लेखातून आम्ही तुम्हाला धुक्यात सुरक्षितपणे गाडी कशी चालवावी याच्या काही सोप्या टिप्स देणार आहोत. (Winter)

गाडीचा स्पीड कमी ठेवा
पहाटे धुक्यात कार चालवताना स्पीड कमी ठेवा. रस्त्यावरील विजिबिलिटीकमी होते, त्यामुळे जास्त वेगाने वाहन चालवणे टाळा. पुढे जाणाऱ्या वाहनापासून योग्य अंतर ठेवा. सुरक्षिततेसाठी, हे अंतर सुमारे 100 मीटर असावे. ५०० किमी/तास वेगाने गाडी चालवताना तुम्हाला अचानक ब्रेक लावावा लागल्यास, तुमच्याकडे वेळ आणि वाहनावर कंट्रोल असेल. (Winter Care)

हेडलाइट्स आणि ब्लिंकर ऑन ठेवा
धुक्यात गाडी चालवताना हेडलाइट्स आणि हॅझर्ड ब्लिंकर लाइट्स चालू ठेवा. यामुळे इतर वाहनांना तुम्हाला ओळखण्यास मदत होईल. दाट धुक्यातही काही अंतरावरून लाल दिवा दिसतो. यामुळे तुमच्या गाडीची व्हिजिबिलिटी वाढेल आणि अपघाताचा धोका कमी होईल. याशिवाय समोरून येणाऱ्या वाहनांना त्रास होऊ नये म्हणून हेडलाइट्स कमी बीमवर ठेवा. तुमच्या कारमध्ये फॉग लॅम्प असेल तर तोही ऑन ठेवा. (Todays Marathi Headline)

फॉग लाईट आणि लो बीमचा वापर करा
अनेक लोक धुक्यात हाय बीम लाईट लावतात. यामुळे प्रकाश डोळ्यांवर परत येतो आणि पाहणे अधिक कठीण होते. सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी फॉग लाईट किंवा लो बीम हेडलाईटचा वापर करणे हा योग्य पर्याय आहे.

Winter

योग्य अंतर ठेवा
धुक्यात गाडी चालवत असताना तुम्ही नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की पुढची गाडी आणि तुमच्या गाडीमध्ये योग्य अंतर ठेवा. बऱ्याचदा असे होते की पुढे जाणारे वाहन अचानक ब्रेक लावते आणि मागचे वाहन त्याला धडक देते. त्यामुळे योग्य अंतर ठेवा जेणेकरून त्यांनी आपत्कालीन स्थितीत ब्रेक लावला तरी वेळेत स्वतःवर नियंत्रण ठेवता येईल आणि अपघात टाळता येईल. (Marathi News)

ओव्हरटेक करू नका
धुक्यात गाडी चालवताना कोणत्याही वाहनाला ओव्हरटेक करणे टाळा. कमी दृश्यमानतेमुळे समोरील वाहन दिसणे कठीण होऊ शकते, ज्यामुळे अपघातांचा धोका वाढतो. म्हणून, कोणत्याही बेपर्वा किंवा अविचारी कृती टाळा. (Top Trending Headline)

गरज नसताना लेन बदलू नका
धुक्यात वाहन चालवताना तुमच्या लेनमध्ये रहा. सतत लेन बदलणे देखील धोकादायक ठरू शकते कारण धुक्यात अनेक वेळा समोरचे वाहन दिसत नाही. त्यामुळे गरज असेल तेव्हाच लेन बदला.

पिवळ्या लाईटचा वापर करा
पिवळा लाईट तुम्हाला धुक्यात मदत करू शकतो, कारण धुक्यात व्हाईट लाईट फारसा प्रभावी नसतो, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही येल्लो कलरची ट्रांसपेरेंट शीट देखील वापरू शकता, तुम्ही ती टेपने बसवू शकता. (Top Stories)

विंडशील्ड आणि खिडक्या स्वच्छ ठेवा
कारचे विंडशील्ड, खिडक्या आणि मागील व्ह्यू मिरर स्वच्छ ठेवून गाडी चालवणे तुम्हाला सोपे जाईल. याच्या मदतीने तुम्ही आजूबाजूचे वातावरण सहज पाहू शकाल. हिवाळ्यात, कारच्या विंडशील्डवर ओलावा जमा होतो ज्यामुळे समोरचे स्पष्टपणे दिसत नाही. असे झाल्यास, कारचे डीफ्रॉस्टर वापरा किंवा ओलावा काढून टाकण्यासाठी कापड वापरा. (Latest Marathi News)

=========

Vehicle : थंडीच्या दिवसात तुमची गाडी लवकर स्टार्ट होत नाही? मग ‘या’ टिप्स वापराच

=========

ड्रायव्हर सीट अॅडजस्ट करा
तुम्ही गाडी चालवत असल्यास, सीट अॅडजस्ट करून व्हिजिबिलिटी वाढवता येते. तुम्हाला कारचा हुड स्पष्ट दिसत नसेल तर सीट थोडी उंच करा. अॅडजस्टेबल सीट हाइट सुविधेसह येणाऱ्या कारमध्ये तुम्ही सीट अॅडजस्ट केल्यानंतर व्हिजिबिलिटी वाढवू शकता. (Top Marathi Headline)

सावध राहा
कमी दृश्यमानतेत ओव्हरटेक करणे अत्यंत धोकादायक असते. समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नाही, ज्यामुळे तोंड-समोर टक्कर होण्याचा धोका वाढतो. जर धुके खूपच दाट असेल आणि रस्ता अजिबात स्पष्ट दिसत नसेल, तर कोणत्याही सुरक्षित ठिकाणी वाहन थांबवणे सर्वात उत्तम आहे. दरम्यान, रेडिओ, नेव्हिगेशन किंवा ट्रॅफिक अपडेट्सद्वारे रस्त्याच्या परिस्थितीची माहिती घेत राहा. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

लाईफ स्टाईल

Vallabhacharya : वल्लभाचार्य जयंती – कोण होते कृष्णभक्त वल्लभाचार्य?

आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अकरावी तिथी अर्थात. आज चैत्र महिन्यातील एकादशीचा...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!