Home आंतरराष्ट्रीय Hindu : ‘हा’ आहे जगातील एकमेव असे देश आहे जिथे आजही हिंदू कॅलेंडर पाळले जाते
आंतरराष्ट्रीय

Hindu : ‘हा’ आहे जगातील एकमेव असे देश आहे जिथे आजही हिंदू कॅलेंडर पाळले जाते

0
Diwali

लवकरच २०२५ हे वर्ष संपूर्ण २०२६ या नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. २०२६ या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वच सज्ज झाले आहेत. संपूर्ण जगामध्ये सध्या २०२६ या नवीन वर्षाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु आहे. भारतात देखील २०२६ या नवीन वर्षासाठी खूपच उत्सुकता पाहायला मिळत आहे. २०२६ हे इंग्रजी कॅलेंडरनुसार आलेले वर्ष आहे. आपल्या देशात हिंदू लोकांचे नवीन वर्ष हे चैत्र महिन्यात सुरु होते. यासोबतच विविध धर्मातील लोकांचे नवीन वर्ष हे वेगवेगळ्या दिवशी सुरु होते. मात्र भारत हा ग्रेगोरियन कॅलेंडर पाळणारा देश असल्याने भारतात ३१ डिसेंबर नंतर नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. जगातील सर्वच देश ग्रेगोरियन कॅलेंडर पाळतात त्यामुळे संपूर्ण जगात यंदा ३१ डिसेंबरनंतर २०२६ या नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. मात्र असे असले तरी या जगात एक असा देश आहे, जो ग्रेगोरियन कॅलेंडर नाही तर हिंदू कॅलेंडर पाळतो. जाणून घेऊया याच देशाबद्दल.

संपूर्ण जग ग्रेगोरियन कॅलेंडर पाळताना दिसते. हे कॅलेंडर त्या देशात शंभरहून अधिक वर्षांपासून चालत आले आहे. त्यानुसार २०२५ हे वर्ष ३१ डिसेंबरला संपूर्ण त्यानंतर २०२६ हे नवीन वर्ष येत आहे. आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावरही सर्व प्रकारचे व्‍यवसाय वगैरे याच दिनदर्शिकेनुसारच केले जातात. मात्र जगातील एकमेव असा देश जो ग्रेगोरियन कॅलेंडर पाळत नाही, तर हा देश फक्त हिंदू कॅलेंडर पाळतो. या देशाचे नाव आहे नेपाळ. हिंदू धर्माचे विक्रम संवत कॅलेंडर हे नेपाळचे अधिकृत कॅलेंडर आहे. भारतात हिंदू कॅलेंडरला खूपच जुना आणि मोठा इतिहास आहे. पण तरीही भारतातही ग्रेगोरियन कॅलेंडरचे पालन केले जाते. मात्र नेपाळ याला अपवाद आहे.

हिंदू कॅलेंडर हे विक्रम संवत या नावाने ओळखले जाते. पूर्वी हेच कॅलेंडर भारतातही चालू होते. परंतु, १९४७ साली जेव्हा भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला तेव्हा देशाला कॅलेंडर स्वीकारण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. त्यावेळी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ग्रेगोरियनसह विक्रम संवत हे दोन्ही कॅलेंडर स्वीकारले. पण, आंतरराष्ट्रीय स्तरावर जगाशी समतोल साधला जावा यासाठी त्यांनी ग्रेगोरियन कॅलेंडर स्वीकारले. त्यामुळे भारतात सरकारी आणि प्रशासकीय कामांसाठी ग्रेगोरियन इंग्रजी कॅलेंडरचा वापर सुरू झाला. त्यामुळे, आज भारतात नववर्ष, आर्थिक वर्ष आणि शासकीय सुट्ट्या इंग्रजी कॅलेंडरनुसारच ठरविल्या जातात, तर केवळ धार्मिक विधींसाठी हिंदू कॅलेंडरचा वापर होतो. (Latest Marathi Headline)

Hindu

भारताप्रमाणेच नेपाळ हे सुद्धा हिंदू राष्ट्र आहे. पण, नेपाळने विक्रम संवत कॅलेंडरचे पालन केले आहे. आजही शतकानुशतके नेपाळ राष्ट्र विक्रम संवतचे पालन करत आहे. विशेष म्हणजे विक्रम संवत हे ग्रेगोरियन कॅलेंडरच्या ५७ वर्षे पुढे आहे. नेपाळमध्ये सर्व सरकारी, प्रशासकीय, आर्थिक आणि निवडणूक प्रक्रियेच्या तारखा हिंदू कॅलेंडरनुसार जाहीर केल्या जातात. नेपाळमध्ये १९०१ पासूनच विक्रम संवतचा अधिकृत वापर सुरू झाला, आणि राणा घराण्याने त्याला देशाचे अधिकृत कॅलेंडर म्हणून मान्यता दिली. आजही नेपाळचे शासकीय अर्थसंकल्प, राष्ट्रीय सुट्ट्या, शैक्षणिक वर्ष, आणि सार्वजनिक निवडणुकांची वेळ हिंदू कॅलेंडरच्या आधारावर ठरवली जाते. (Top Stories)

दरम्यान विक्रम संवत कॅलेंडरमध्ये आठवड्यात फक्त सात दिवस असतात आणि साधारणपणे वर्षात १२ महिने असतात. पण, कधी कधी वर्ष १३ महिनेही चालते. विक्रम संवताची सुरुवात राजा भर्तृहरी यांनी केली. विक्रमादित्य त्यांचा धाकटा भाऊ होता. भर्तृहरीचा त्याच्या पत्नीने विश्वासघात केला. यामुळे दु:खी होऊन राजाने संन्यास घेतला आणि राज्य विक्रमादित्याकडे सोपवले. राजा विक्रमादित्य हा अतिशय लोकप्रिय राजा होता. त्यांच्या नावावरून संवत हे नाव पडले आणि ते लोकप्रिय झाले अशी कहाणी सांगितली जाते. हे कॅलेंडर चंद्राची स्थिती आणि सूर्याभोवती पृथ्वीच्या क्रांतीच्या वेळेवर आधारित आहे. बरेच लोक याला पंचाग असेही म्हणतात. (Top Trending News)

======

New Year : नवीन वर्षात ‘हे’ संकल्प करून २०२६ चे करा दणक्यात स्वागत

Travelling : भारतातील सर्वोत्तम रोड ट्रिप करायची असेल तर ‘ही’ ठिकाणं आहेत परफेक्ट ऑप्शन

======

नेपाळमध्ये विक्रम संवत ही अधिकृत दिनदर्शिका प्रणाली म्हणून प्रचलित असल्यामुळे त्यांचे नवीन वर्ष हिंदू परंपरेनुसार साजरे केले जाते. नेपाळमध्ये नववर्षाची सुरुवात बैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी होते. हा बैशाख महिना इंग्रजी कॅलेंडरनुसार १३ ते १५ एप्रिल दरम्यान येतो. याच्या तुलनेत, भारतात हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र शुक्ल प्रतिपदेला अर्थात गुढीपाडव्याला होते, जो होळीच्या पंधरा दिवसांनंतर येते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नववर्ष सुरू होते, आणि देवी दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते. नेपाळने हिंदू कॅलेंडरला आपले अधिकृत राष्ट्रीय कॅलेंडर म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे, नेपाळ हा जगातील एकमेव असा देश आहे, जिथे प्रत्येक सरकारी निर्णय, प्रशासकीय कामकाज आणि शासकीय कार्यक्रम हिंदू कॅलेंडरनुसार होतात. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Katrina Kaif
आंतरराष्ट्रीय

Jiang Xueqin : चीनच्या नॉस्ट्राडॅमसने सांगितले ट्रम्पचे भविष्य

अमेरिका-इराण युद्धामध्ये पंधरा दिवसांचा विराम आला आहे. यात चीनची भूमिका असल्याची माहिती...

Jewellery
आंतरराष्ट्रीय

Jared Kushner : ट्रम्पचा जावई आहे तरी कोण

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर कायमचा विराम आणण्यासाठी पाकिस्तानची राजधानी...

Mobile
आंतरराष्ट्रीय

First Lady Melania Trump : अमेरिकेच्या फर्स्ट लेडीसाठी शाही सवारी

इराणमध्ये सत्तांतर करण्याच्या हेतूने अमेरिकेने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरुद्ध लष्करी मोहीम...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!