Home राजकारण Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्र, भाजपा-शिंदेसेनेसाठी धोक्याची घंटा ?
राजकारण

Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्र, भाजपा-शिंदेसेनेसाठी धोक्याची घंटा ?

70

आशिया खंडातली सर्वात मोठी आणि श्रीमंत महानगरपालिका म्हणजेच मुंबई मनपा जिंकण्यासाठी आता सर्वच पक्षांमध्ये चुरस पहायला मिळत आहे. त्यातच ठाकरे बंधूंनी ऐतिहासिक युतीची घोषणा केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र लढणार आहेत. २४ डिसेंबर रोजी एकत्र पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही घोषणा केली. पण केवळ मुंबईच नाही, तर महाराष्ट्रातल्या ६ मनपा निवडणुकींमध्येही ते एकत्र लढतील. पण त्यांचं एकत्र येणं भाजपा आणि शिंदे-सेनेसाठी धोक्याची घंटा असल्याचं अनेक राजकीय विश्लेषक म्हणत आहेत. मनपा निवडणुकांसाठी फडणवीस आणि शिंदे यांनी अजूनही कोणत्याही युतीची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण काही ठराविक निवडणुकांमध्ये ते एकत्र लढताना दिसू शकतात पण जागावाटपावरून त्यांच्यात ‘तू तू मै मै’ सुरु आहे. (Thackeray Brothers)

तसं पहायला गेलं, तर २०१७ च्या मनपा निवडणुकीत शिवसेनेचा ८४ जागांवर विजय झाला होता. तर भाजपाने तब्बल ८२ जागांवर विजय मिळवला होता. पण गेल्या ८ वर्षात महाराष्ट्रात राजकारण पूर्णपणे बदललं. युतींमध्ये भेसळ झाली आणि राजकीय वर्चस्वासाठी अनेक पक्ष एकमेकांसोबत आले. शिवसेना फोडून एकनाथ शिंदे फडणवीस यांच्यासोबत सरकारमध्ये आले आणि मुख्यमंत्रीसुद्धा आले. तर दुसरीकडे अजित पवार यांनीही राष्ट्रवादी फोडून दुसरा राष्ट्रवादी बनवला आणि तेसुद्धा सरकारमध्ये बसले. पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसारखी मनपा निवडणूक नसते तर इथे युती करणारे पक्षदेखील एकत्र लढतात. (Political Updates)

पण मुंबईचं राजकारण गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेभोवतीच फिरत आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईला आपला बालेकिल्ला बनवलेला होता, उद्धव ठाकरे यांची परंपरागत मतपेढी म्हणजे मुंबई…. त्यामुळे मुंबईकर जनतेचा कल नेहमीच शिवसेनेकडे जास्त राहिला आहे.२०१७ च्या निवडणुकीत भाजपाला फायदा झाला होता, कारण सेना-मनसे एकत्र नसल्याने मराठी मतांचं विभाजन झालं होतं, मात्र आता ते विभाजन होणार नाही. दुसरीकडे राज ठाकरे यांची शैली तरुणांसाठी नेहमीच आकर्षक राहिली आहे आणि नवीन मतदारांसाठी ती महत्वाची ठरेल. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसमोरची मोठी अडचण म्हणजे ठाकरे बंधू हा मराठी माणसासाठी भावनिक मुद्दा आहे. (Thackeray Brothers)

=======

हे देखील वाचा : Japan VS China : जपानवर चीनची दादागिरी !

=======

त्यातच बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा ते चालवत आहेत. त्यामुळे निश्चितच शिंदेंना मुंबईत तर तोटा होईलच पण ठाण्यातही त्यांचं नुकसान होऊ शकतं. पण तरीही शेवटचे निकाल, योग्य जागावाटप, प्रचाराची धार, स्थानिक उमेदवार आणि मराठी मतदारांचा भावनिक प्रतिसाद हेच ठरवतील. त्यामुळे देशातल्या कित्येक राज्यांपेक्षाही श्रीमंत असलेल्या मुंबई महानगरपालिकेसाठी आता हा लढा सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेचा असणार आहे. (Political Updates)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

राजकारण

West Bengal Politics : हे माधवा, मधुसूदना, ये बंगालमध्ये ‘खलनिर्दालना’

देशात ४ राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला...

राजकारण

BJP Vs TMC : भाजपाची ‘सीख’ विरुद्ध ममतांची ‘चीख’

स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी एकदा भाजपच्या निवडणुकांतील यशाचे रहस्य एका वाक्यात...

गाजावाजा स्पेशलराजकारण

Middle East War : अमेरिका-इराण संघर्ष, अमेरिकेचा सेल्फ गोल ?

२८ फेब्रुवारी २०२६ हा दिवस जगाच्या इतिहासात एक ‘लँडमार्क ‘ दिवस म्हणून...

गाजावाजा स्पेशलराजकारण

Sharad Pawar : शरदराव व्हाय नॉट?

प्रख्यात क्रिकेटपटू, उद्योजक, आणि दानशूर समाजसेवक म्हणून आपल्या हयातीत कीर्ती मिळवलेले कै....

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!