Home आंतरराष्ट्रीय Japan VS China : जपानवर चीनची दादागिरी !
आंतरराष्ट्रीय

Japan VS China : जपानवर चीनची दादागिरी !

0

थायलंड आणि कंबोडिया या दोन देशानंतर आशिया खंडातील आणखी दोन देशांमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. चीन आणि जपानमध्ये गेल्या महिनाभरापासून युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. चीनला तैवानवर वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे. तैवान आणि जपान यांच्यामध्ये असलेल्या समुद्रीपट्ट्यावर चीनच्या युद्धनौकांना जपाननं विरोध सुरु केल्यापासून चीननं जपानवर आपली शस्त्रे रोखली आहेत. चिनी विमानवाहू जहाजांची तैनाती पॅसिफिक महासागरात केल्यामुळे हा तणाव आणखी वाढला आहे. त्यातच चिनी लढाऊ विमानांनी ओकिनावाजवळील जपानच्या लष्करी विमानावर धोकादायक ‘फायर-कंट्रोल रडार लॉक’ केल्याचा आरोप करण्यात येत आहे. चीनकडून हे सर्व आरोप फेटाळण्यात आले असून आपण फक्त युद्ध सराव करीत आहोत, असे स्पष्टीकरण देण्यात येत आहे. मात्र चीनचा या सरावादरम्यान असलेला आक्रमकपण पाहता, आशिया खंडातील या दोन देशांमध्ये युद्धजन्य परिस्थितीचे वातावऱण आहे.
आशिया खंडातील चीन आणि जपान हे दोन शक्तीशाली देश आहेत. (Japan VS China)

या दोन देशांमध्ये सागरी सरावाचे कारण देत युद्ध सुरु होणार की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. या सर्वाची सुरुवात पॅसिफिक महासागरात चीनकडून सुरु झालेल्या लष्करी सरावावरुन झाली आहे. लष्करी सरावाचे कारण देत चीननं जपानजवळील समुद्रात जाणूनबुजून लष्करी कारवाया वाढवल्याचा आरोप जपाननं केला आहे. चिनी नौदलाची विमानवाहू युद्धनौका लिओनिंग जपानजवळ दिसल्यामुळे खळबळ उडाली आहे. लिओनिंगने ओकिनावाजवळ पॅसिफिक महासागरात लढाऊ टेकऑफ आणि लँडिंगचा सराव केला. त्यामुळे जपानच्या नौदलाला तयार रहाण्याचे आदेश देण्यात आले. वास्तविक चीनला तैवानवर वर्चस्व प्राप्त करायचे आहे. नैऋत्य जपानी बेटे तैवानपासून थोड्या अंतरावर आहेत, त्यामुळे सामुद्रधुनी ओलांडून होणाऱ्या कोणत्याही तणावाचा परिणाम जपानच्या राष्ट्रीय सुरक्षेवर होणार आहे. तैवान सामुद्रधुनीतील तणाव वाढल्याने फिलीपिन्स समुद्रातील समुद्री मार्ग, महत्त्वाचे दळणवळण केबल्स आणि पुरवठा मार्ग धोक्यात येऊ शकतात. शिवाय जपानच्या पुढील तळांपर्यंत पोहोचण्याच्या क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. (International News)

तैवान स्वतंत्र राहिला तर जपान सुरक्षित रहाणार आहे, असे जपान सरकारनं स्पष्ट केले आहे. त्यामुळेच जपान सरकारनं सामुद्रधुनीतील स्थिरता त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वाची मानली आहे. त्यानंतरच चीनकडून या समुद्रधुनीमध्ये लष्करी सराव सुरु करुन जपानच्या शंकेला अधिक बळकटी देण्यात आली. चीन पूर्व आशियाई समुद्री पटट्यात १०० हून अधिक नौदल आणि तटरक्षक जहाजे तैनात करत असल्याची माहिती आहे. गंभीर गोष्ट म्हणजे, चिनी लढाऊ विमानांनी जपानच्या लष्करी विमानांवर अग्नि नियंत्रण रडार बंद केल्याचा आरोप जपाननं केला. ही कृती संभाव्य क्षेपणास्त्र हल्ल्याची थेट सूचना मानली जाते. यानंतर जपान आणि चीनमध्ये असलेल्या तणावात वाढ झाली. जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी यांनी दावा केला की, चिनी लढाऊ विमानांनी ओकिनावाजवळ जपानी विमानांना रडारने बंद केले. (Japan VS China)

ही कृती कोणत्याही लष्करी संघर्षापूर्वीचे सर्वात धोकादायक पाऊल आहे. जपान सरकारनं याला वर्षातील सर्वात गंभीर घटना अशी टिपण्णी यावर केली. शिवाय आपल्या सुरक्षेवर परिणाम झाला तर जपान सरकार त्याला तोडीस तोड उत्तर देईल, असे उत्तर दिले आहे. सोबतच जपानने चिनी राजदूताला बोलावून या कृतीचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. चीननं हा सर्व लष्करी सरावाचा भाग असून नौदल आणि तटरक्षक दलाच्या कारवाया आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार झाल्याचे सांगितले आहे. चीनची विमानवाहू जहाजे आणि युद्धनौका पश्चिम पॅसिफिकमध्ये नियमित सराव करत असून त्यात झालेली वाढ ही जपानसाठी डोकेदुखी ठरणार आहे. जपान सोबत दक्षिण चीन समुद्रात चीन फिलीपिन्सलाही अशाच प्रकारची अप्रत्यक्ष धमकी देत आहे. यातून चीन अमेरिकेला युद्ध झालंच तर आपण किती सक्षम आहोत, याची चुणूक दाखवत असल्याचे सांगण्यात येत आहे.  (International News)

========

हे देखील वाचा :  Jaish-e-Mohammed : जैशने तयार केली महिला दहशतवादी ब्रिगेड !

========

फिलीपिन्स हा अमेरिकेचा संरक्षण भागीदार आहे. तर जपान हा अमेरिकेचा सर्वात मोठा आशियाई लष्करी तळ आहे. त्यामुळे या दोन देशांच्या माध्यमातून चीन अमेरिकेला आव्हान देत असल्याचेही सांगण्यात येत आहे. फिलिपिन्स आणि जपानसारख्या देशांवर वार करुन आशियाई सागरी प्रदेशावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचीही चीनची खेळी आहे. उपग्रह प्रतिमांमधूनही असे दिसून आले आहे की, चिनी नौदल फिलीपिन्स समुद्र आणि पश्चिम पॅसिफिकमध्ये लष्करी पायाभूत सुविधा तयार करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये चीनची सर्वात मोठी युद्धनौका, हैनान, क्षेपणास्त्र फ्रिगेट आणि एक टाइप 055 विनाशक तैनात करण्यात आले आहे. त्यामुळेच जपान आणि फिलिपिन्स या दोन्ही देशांनी आपल्या लष्कराला तयार रहाण्याचे आदेश दिले आहेत. (Japan VS China)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Katrina Kaif
आंतरराष्ट्रीय

Jiang Xueqin : चीनच्या नॉस्ट्राडॅमसने सांगितले ट्रम्पचे भविष्य

अमेरिका-इराण युद्धामध्ये पंधरा दिवसांचा विराम आला आहे. यात चीनची भूमिका असल्याची माहिती...

Jewellery
आंतरराष्ट्रीय

Jared Kushner : ट्रम्पचा जावई आहे तरी कोण

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर कायमचा विराम आणण्यासाठी पाकिस्तानची राजधानी...

Mobile
आंतरराष्ट्रीय

First Lady Melania Trump : अमेरिकेच्या फर्स्ट लेडीसाठी शाही सवारी

इराणमध्ये सत्तांतर करण्याच्या हेतूने अमेरिकेने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरुद्ध लष्करी मोहीम...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!