आजची सोमवती अमावस्या, सौभाग्य, समृद्धी वाढवण्यासाठी, पितृदोषापासून मुक्ती मिळविण्यासाठी एक उत्तम संधी मानली जाते. हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला खूप महत्त्व आहे. हा दिवस भगवान शिव आणि पूर्वजांना समर्पित आहे. या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवला जातो आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदान केले जाते. या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवून प्रसन्न केले जाते. असे मानले जाते की यामुळे पूर्वजांना मोक्ष मिळतो आणि ते त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात. (Somvati Amavsya)
सोमवार हा महादेवाला समर्पित दिवस आहे. या दिवशी महादेवाची उपासना केल्याने मनाला शांती मिळते, जीवनात सुख-समृद्धी येते. सोमवती अमावस्येला दान केल्याने आणि पूजा केल्याने पापांचा नाश होतो तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात. महाशिवरात्रीच्या पावन पर्वानंतर लगेचच आलेली ही अमावस्या आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सोमवारी येणाऱ्या अमावस्येला ‘सोमवती अमावस्या’ म्हणतात, जी पितरांच्या आशीर्वादासाठी आणि वैवाहिक सुखासाठी वरदान ठरते. या दिवशी दान आणि उपवासाला विशेष महत्त्व आहे आणि विशेष प्रयोगांचे विशेष फायदे आहेत. सोमवारी अमावास्या येत असल्याने त्याला सोमवती अमावस्या म्हणतात. सोमवती अमावस्या आज अर्थात १६ फेब्रुवारी रोजी म्हणजेच आज साजरी केली जात आहे. (Marathi)
सोमवती अमावस्येला काय करावे?
– सोमवती अमावस्येच्या दिवशी अन्नाचे सेवन करू नये. या दिवशी पूर्वजांसाठी दान करा. या दिवशी जनावरांना हिरवा चारा द्यावा. शक्य असल्यास, घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर प्रकाश पडेल अशी व्यवस्था करा. (Top Trending Headline)
– पितृदोषापासून मुक्ती मिळविण्यासाठी, सोमवती अमावस्येच्या दिवशी काळे तीळ दान करावे. या उपायाने, तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद तर मिळतातच, पण तुमच्या कारकिर्दीतही समृद्धी येते.
– या दिवशी भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी सोमवती अमावस्येला शिवलिंगावर गंगाजल आणि बिल्वपत्र अर्पण करावे. हा उपाय केल्याने तुम्हाला पैसे आणि धान्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. (Top Stories)
– शनि देवाच्या साडे सातीचे दुष्परिणाम टाळण्यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी शनि देवाला मोहरीचे तेल अर्पण करावे.
– सोमवती अमावस्येला तुम्ही भगवान शिव आणि पार्वतीची पूजा आवश्य करावी. यामुळे तुमच्यावर शिवकृपा राहील. या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीला तुळस, कुंकू, शंख, नारळ आणि केतकीची फुले आवश्य अर्पण करावीत.
– सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही दूध आणि तांदळाचे दान आवश्यक करा, त्यामुळे तुम्हाला आर्थिक त्रासातून मुक्ती मिळेल. काही कारणाने जर पित्र तुमच्यावर नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर होईल. (Todays Marathi Headline)

– हिंदू धर्मात पिंडदानाला फार महत्त्व आहे. काही कारणांनी जर तुम्ही पितरांचे पिंडदान केले नसेल तर सोमवती अमावस्येला पिंडदान आवश्यक करावे. त्यामुळे पितरांची अतृप्त आत्मा संतुष्ट होतील. (Top Marathi News)
– सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी पाणी अर्पण करावे. पिंपळाचे झाड त्रिदेवांचे निवासस्थान मानले जाते. पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी पाणी ओतल्याने ब्रह्मा, विष्णू, महेश प्रसन्न होतात आणि तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद देखील मिळतात.
– सोमवती अमावस्येला काळ्या तिळाचे दान आवश्य करा. त्यामुळे पितृदोष दूर होतो आणि तुमच्यावर कृपा राहाते. त्यामुळे तुम्ही जीवनात प्रगती करता. तुम्ही काळे तीळ मंदिरातही दान करू शकता. (Latest Marathi Headline)
– सोमवती अमावस्येला सकाळी पूजेच्या ठिकाणी स्वच्छ लिंबू ठेवा. हे लिंबू सोमवती अमावस्येच्या रात्री त्या व्यक्तीच्या डोक्यावरून खालीपर्यंत ७ वेळा उतरवा. नंतर त्याचे ४ भाग करा आणि चौरस्त्यावर ४ दिशेने फेकून द्या. असे केल्याने लवकरच नोकरीची ऑफर मिळू शकते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
– कुंडलीत सूर्य ग्रहाच्या महादशाचा प्रभाव चालू असेल, तर सोमवती अमावस्येच्या दिवशी माणिक गहू, गूळ, केशर, सोने आणि तांबे दान करणे शुभ आहे.
– जर एखाद्याला चंद्र ग्रहाची महादशा असेल, तर सोमवती अमावस्येच्या दिवशी तांदूळ, कापूर, मोती, शंख, चांदीचे दान करावे. यामुळे चंद्राची स्थिती मजबूत होते.
सोमवती अमावस्येला काय करू नये?
– सोमवती अमावस्येला तुळशीचे पान तोडणे सक्त मनाई आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास तुळशीमध्ये असतो. तसेच, विनाकारण तुळशीला स्पर्श करणे किंवा जास्त पाणी घालणे या दिवशी अशुभ मानले जाते. यामुळे घरातील समृद्धी कमी होऊ शकते. (Social Updates)
– सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा आणि पिंडदान केले जाते. म्हणूनच या दिवशी पितरांबद्दल वाईट बोलू नये आणि त्यांना तर्पण द्यायला विसरू नये.
– सोमवती अमावस्येच्या दिवशी कुत्रे, गाय आणि कावळे यांना त्रास देऊ नये. या दिवशी या प्राण्यांना त्यांच्या पूर्वजांचा भाग म्हणून त्यांना अन्न दिले जाते. म्हणूनच त्यांना इजा करू नये.
– अमावस्येच्या दिवशी पिंडदान, तर्पण आणि श्राद्धासाठी पूर्वज वाट पाहत असतात. म्हणूनच या दिवशी सर्व गोष्टी करायला विसरू नये. या गोष्टी करायला विसरले तर पूर्वज रागवतात आणि शाप देतात. (Top Trending Headline)
– सोमावती अमावस्येच्या दिवशी केलेल्या पूजेचे शुभ फळ प्राप्त करण्यासाठी दिवसभर ब्रह्मचर्य पाळावे नाहीतर. पूजेचे पूर्ण फल प्राप्त होत नाही.
– सोमवती अमावस्येच्या दिवशी तामसिक वस्तूंना हात लावू नये. चुकूनही मांस आणि मद्य सेवन करू नये. तरच या दिवशी केलेल्या पूजेचे चांगले फळ मिळते.
=========
Somvati Amavasya : सोमवती अमावस्येचे महत्त्व आणि माहिती
=========
– सोमवती अमावस्येच्या दिवशी घराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. घरात किंवा आजूबाजूला घाण पसरवू नये. तरच पूजा शुभ होते.
– सोमवती अमावस्येच्या दिवशी कुणाशीही भांडण करू नये, तसेच शिवीगाळ आणि अपशब्द देखील कोणाला बोलू नये. (Top Stories)
– सोमवती अमावस्येच्या दिवशी चुकूनही स्मशानभूमीत जाऊ नये. या दिवशी मांस आणि मदिराचे सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो. तसेच सोमवती अमावस्येच्या दिवशी नखे कापू नयेत.
– सोमवती अमावस्येला सूर्योदयापूर्वी उठून स्नान करणे महत्त्वाचे असते. जो व्यक्ती या दिवशी उशिरापर्यंत झोपतो, त्याच्या कुंडलीतील चंद्र आणि शनी खराब होतात. तसेच, या दिवशी कोणाशीही भांडण, वाद किंवा कोणाचा अपमान करू नका. विशेषतः घरातील स्त्री किंवा वडिलांचा अपमान केल्यास पितर संतप्त होतात. (Social News)
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
- remedies for Somvati Amavasya
- Somvati Amavasya
- Somvati Amavasya dan
- Somvati Amavasya date
- Somvati Amavasya in marathi
- Somvati Amavasya information
- Somvati Amavasya shubh muhurt
- Somvati Amavasya significance
- Somvati Amavsya
- Somvati Amavsya 2026
- upay for Somvati Amavasya
- what is Somvati Amavasya
- पिंडदान
- पितर पूजा
- शिव पूजा
- सोमवती अमावस्या
- सोमवती अमावस्या २०२६
- सोमवती अमावस्या माहिती
- सोमवती अमावस्या मुहूर्त
- सोमवती अमावस्येला काय करावे?