Home आरोग्य Health : तुम्ही पण जेवल्यानंतर लगेचच झोपता….? मग आजच ही सवय बदला
आरोग्य

Health : तुम्ही पण जेवल्यानंतर लगेचच झोपता….? मग आजच ही सवय बदला

0

आजच्या काळात आपण पाहिले तर आपल्यावर पाश्चात्य संस्कृतीचा मोठा पगडा निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आपण आपली संस्कृती आणि जुने विचार मागे सोडून आधुनिक विचार आत्मसाद करत आहोत. मात्र हे करताना त्याचे दुष्परिणाम देखील आपल्यालाच भोगावे लागणार आहेत, हेच आपल्या लक्षात येत नाही. पूर्वी किंवा आजही घरातील वयस्कर मंडळी रात्री लवकर जेवून शतपावली करतात आणि लवकर झोपून सकाळी लवकर उठतात. पण आजकाल याच्या अगदी उलट असते. रात्री उशिरापर्यंत जागणे उशिरा जेवणे, पहाटे उशिरा झोपणे आणि सकाळी उशिरा उठणे. याचा तुमच्या आरोग्यावर चुकीचा परिणाम होत आहे. (Health)

आजकाल तर सगळे रात्री उशिरा जेवतात आणि लगेच झोपतात. खाण्याच्या या चुकीच्या पद्धतींमुळे खूपच कमी वयात मोठ्या व्याधी मागे लागताना देखील दिसत आहे. जेवल्यानंतर लगेच झोपणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच चुकीचे आणि गंभीर आजारांना आमंत्रण देणारे आहे. दुपारच्या जेवणानंतर किंवा रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपल्याने शरीरावर अनेक नकारात्मक परिणाम होऊ शकतात. यामुळे अनेक आजारांची शक्यता वाढते.
अनेक लोकं जेवणानंतर बसून राहणं किंवा झोपणं पसंत करतात. खाण्यानंतर लगेच झोपणे हे शरीराच्या पचनक्रियेला आणि आरोग्याला प्रभावित करते. जेवल्यानंतर लगेच झोपल्याने नक्की कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते चला जाणून घेऊया. (Todays Marathi Headline)

पचनक्रियेवर ताण
जेवल्यानंतर लगेच झोपल्यास पचनक्रियेवर ताण येऊ शकतो. पचनक्रिया ही एक जटिल प्रक्रिया आहे ज्यात अन्नाचे विभाजन, विघटन, आणि पोषणाचे शोषण या गोष्टींचा समावेश होतो. खाण्यानंतर शरीरातील रक्तप्रवाह पचनसंस्थेकडे वाढतो, ज्यामुळे पचनक्रिया सोपी होते. परंतु, जेवल्या जेवल्या लगेच झोपल्यावर रक्तप्रवाह कमी होतो आणि पचनक्रियेच्या गतिमानतेवर परिणाम होतो. यामुळे अन्नाचे नीट पचन होत नाही. नीट पचन न झाल्यामुळे अनेक समस्या उद्भवतात. (Latest Marathi HEadline)

ऍसिडिटीचा त्रास होणे
खाण्यानंतर लगेच झोपल्यास ॲसिडिटी आणि छाती जळजळणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. पचनक्रियेतील ऍसिडचे प्रमाण वाढल्यामुळे, अन्ननलिकेत ऍसिडची मात्रा वाढते. यामुळे ऍसिड रिफ्लक्स, छातीत जळजळणे, आणि घशात जळजळ होणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. ऍसिडिटीमुळे झोपेच्या वेळी अपचन आणि अस्वस्थता देखील जाणवू शकते. या समस्या टाळण्यासाठी, खाण्यानंतर किमान एक तास बसून राहणे किंवा चालणे आवश्यक आहे. यामुळे पचनक्रियेतील ऍसिडचे प्रमाण नियंत्रित राहते आणि ऍसिडिटीची समस्या कमी होते. (Top Marathi News)

Health

वजन वाढणे
जेवल्यानंतर लगेच झोपल्याने वजनवाढ होण्याची शक्यता अधिक असते. रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपल्याने शरीरातील कॅलरी जलद बर्न होत नाही. त्यामुळे, न वापरलेल्या कॅलरीज चरबीच्या स्वरूपात जमा होऊ लागतात. शरीराच्या चयापचयाच्या क्रियेतही याचा परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे अतिरिक्त वजनाची समस्या निर्माण होते. (Top Marathi Headline)

डायबिटिस आणि हृदयविकाराचा धोका
खाण्यानंतर लगेच झोपल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते, ज्यामुळे डायबिटिसचा धोका वाढतो. विशेषतः गोड पदार्थ किंवा कार्बोहायड्रेट समृद्ध अन्न खाल्ल्यानंतर लगेच झोपल्यास, रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढते. यामुळे इन्सुलिनच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो आणि हळूहळू डायबेटिसचा धोका वाढू शकतो. तसंच, वजनवाढीमुळे हृदयविकारांचा धोका देखील वाढतो. हृदयविकारांपासून बचावासाठी, खाण्यानंतर काही काळ विश्रांती घेणे आणि सक्रिय राहणे अत्यंत आवश्यक आहे. (Latest Marathi News)

झोपेची गुणवत्ता कमी होणे
खाण्यानंतर लगेच झोपल्यास झोपेची गुणवत्ता कमी होऊ शकते. पचनक्रियेच्या वेळी शरीरातील उष्मांक अधिक प्रमाणात वापरला जातो, ज्यामुळे शरीराचा आरामदायीपणा कमी होतो. त्यामुळे झोपेत सतत व्यत्यय येऊ शकतो, ज्यामुळे झोपेची गुणवत्ता कमी होते. नियमितपणे अशी झोप घेतल्यास, झोपेची सायकल बिघडू शकते. (Trending Headline)

जेवल्यानंतर चालण्याचे फायदे
जेवण आणि झोपेच्या वेळेमध्ये किमान तीन तासांचं अंतर असणे गरजेचे आहे. या तीन तासांच्या अंतरामध्ये पोटातून अन्न लहान आतड्यांकडे सरकतं आणि यामुळे पचनक्रिया सुरूळीत होण्यास मदत होते. त्याचबरोबर रात्री छातीत जळजळ होणे आणि निद्रानाशासारख्या समस्यादेखील उद्भवत नाहीत. रात्री जेवल्यावर चालण्याची सवय पचन प्रक्रियेला वेग देते आणि पचनतंत्र सक्रिय करते. त्यामुळे अन्न पचन योग्य प्रकारे होण्यास मदत होते. जेवणानंतर नियमितपणे चालल्याने पोट फुगणे, एसिडिटी आणि छातीतील जळजळ कमी होते. (Top Stories)

========

Health : तुमची देखील झोपेत लाळ गळते का? जाणून घ्या यामागचे कारण

========

यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रासही कमी होतो, कारण हे आतड्यांच्या कार्यक्षमतेला उत्तेजन देते आणि मल त्याग करणे सोपे करते. यासोबतच जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. जेवणाच्या अगोदर किंवा जेवण केल्यानंतर अर्ध्या ते पाऊण तासाच्या अंतराने पाणी प्यावे. तसेच जेवण केल्यानंतर अर्ध्या किंवा एका तासाने शतपावली करावी. जेवणानंतर वज्रासन करणे खूप फायदेशीर आहे. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीराला ऊर्जा मिळते. हे आसन पायांच्या स्नायूंना आराम देते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. या सवयी जर तुम्ही अंगिकारल्या तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. (Social News)

(टीप: या लेखात देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. कोणतेही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Blood Pressure 
आरोग्य

Health : स्मरणशक्ती शार्प ठेवण्यासाठी आजच आहारात करा ‘हे’ बदल

आपण दैनंदिन जीवनात करत असलेल्या प्रत्येक लहान सहान गोष्टीचा चांगला, वाईट परिणाम...

Potato
आरोग्य

Potato : खरंच बटाटा खाल्ल्याने वजन वाढते का?

आपल्या भारतीय घरांमध्ये स्वयंपाक घराचा राजा कोण असे विचारल्यावर सर्वच लोकांचे एकच...

Pooja Bhatt Relationships
आरोग्य

Dental Care : मोत्यासारखे पांढरेशुभ्र दात पाहिजे, मग आजच ‘हे’ उपाय करा

असे अनेकदा म्हटले जाते की दातांची ट्रीटमेंट ही सर्वात खर्चिक असते. त्यामुळे...

आरोग्य

Joints Sound : हाडांमधून येणाऱ्या कटकट आवाजाचे कारण आणि त्यावर उपाय

अनेकदा आपल्या लक्षात येते की, आपण खाली बसतो, उठतो तेव्हा आपल्या हाडांमधून...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!