Home लाईफ स्टाईल Chaturthi : जाणून घ्या माघ महिन्यात येणाऱ्या द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीचे महत्त्व
लाईफ स्टाईल

Chaturthi : जाणून घ्या माघ महिन्यात येणाऱ्या द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीचे महत्त्व

0

पौर्णिमा झाली की, वेध लगेच येते ती संकष्टी चतुर्थी. चतुर्थीचा दिवस हा गणपती बाप्पाला समर्पित आहे. या दिवशी बाप्पाची विधिवत पूजा करून उपवास केला जातो. हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणार्‍या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात. प्रत्येक महिन्यात चतुर्थी ही तिथी येते. एका वर्षात १२ आणि ज्या वर्षी अधिकमास आल्यास त्या वर्षी १३ संकष्टी चतुर्थी येतात. गणेशाच्या उपासनेत या दिवसाचे महत्व विशेष आहे. मान्यतेनुसार जो कोणी या दिवशी खऱ्या मनाने व्रत करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात. चंद्रदर्शन हा या व्रताचा महत्वाचा भाग असतो. आता माघ महिन्यातील चतुर्थी येणार आहे. ही चतुर्थी तिथी कधी आहे? जाणून घेऊया. (Chaturthi)

माघ महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थी व्रताला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी म्हणतात. पंचांगानुसार, माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीची सुरुवात गुरुवार, ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १२.०९ वाजता सुरू होणार आहे आणि या तिथीची समाप्ती शुक्रवार, ६ फेब्रुवारी रोजी १२.२२ वाजता संपेल. उद्यतिथीनुसार गुरुवार, ५ फेब्रुवारी रोजी संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाणार आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय रात्री ०९.३५ मिनिटांनी आहे. प्रत्येक संकष्टी चतुर्थीला स्वतःचे नाव, कथा आणि पार्श्वभूमी असते. असे मानले जाते की, श्रीगणेशाची आराधना केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात. या माघ महिन्यातील चतुर्थीचे नाव द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी आहे. (Marathi News)

संकष्ट चतुर्थी हे एक व्रत आहे. हे व्रत पुरुष व स्त्रिया दोघांनी करायचे असते. हे व्रत दोन प्रकारांनी करतात. एक असते ती मिठाची संकष्ट चतुर्थी आणि दुसरी पंचामृती चतुर्थी. दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला आणि गणपतीला महानैवेद्य दाखवावा. यासाठी मोदक करण्याची पद्धत आहे. त्यानंतर भोजन करावे. या व्रताचा काल आमरण, एकवीस वर्षे किंवा एक वर्ष असा आहे. व्रतराज या ग्रंथात हे व्रत सांगितले आहे. जी संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते तिला अंगारकी असे म्हटले जाते. अधिक मासातील अंगारकी चतुर्थी अत्यंत महत्त्वाची मानली जाते कारण ती एकवीस वर्षातून एकदाच येते. संकष्टी करणार्‍यांनी उपोषण सोड्ण्यापूर्वी नेहमी, पुढे दिलेले “संकष्टी चतुर्थी महात्म्य” अवश्य वाचावे. (Todays Marathi Headline)

Chaturthi

संकष्टी चतुर्थी पूजा विधी
सकाळी लवकर उठून नित्यकर्म करून स्नान झाल्यावस स्वच्छ वस्त्र परिधान करावे. यानंतर देवघर स्वच्छ करून देवपूजा करावी. देवघरातील गणपतीचा जलाभिषेक करा. गणपतीला पिवळे चंदन लावा, फुले, फळे अर्पण करा. प्रसाद म्हणून तिळाचे लाडू किंवा मोदक दाखवा. गणधीश संकष्टी चतुर्थीची कथा वाचा. ॐ गण गणपतये नम: मंत्राचा जप करा. पूर्ण भक्तीभावाने गणपतीची आरती करा. चंद्राचे दर्शन आणि अर्ध्य द्या. प्रार्थना करा. (Top Marathi HEadline)

उपवास कसा करावा?
संकष्टी चतुर्थीचा उपवास केल्यानंतर दुसऱ्या दिवशीही केवळ सात्विक अन्न किंवा फळेच घ्यावी आणि तामसिक अन्न टाळावे. संकष्टी चतुर्थीमध्ये उपवास सोडण्यासाठी चंद्रदर्शन आणि पूजा आवश्यक मानली जाते. चंद्राला अर्ध्य दिल्यानंतर हे व्रत पूर्ण मानले जाते. चंद्रोदयानंतर आपल्या सोयीनुसार अर्ध्य देऊन व्रत करावे आणि आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी पूजा करावी. यादिवशी उपवास करून रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राचे दर्शन घेऊनच व्रत सोडले जाते. श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी विशेष फ़लदयी व महत्वाची मानतात. चंद्राने तप करुन गणपतीला प्रसन्न करून घेतल्याने चंद्र दर्शनाचे महत्व आहे. या दिवशी प्रत्येकाने निदान वर्षांतून या दोन तरी अवश्य कराव्या, असे शास्त्र सांगते. (Latest Marathi News)

संकष्टी चतुर्थीची कथा
एकदां गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरला. तेव्हा त्याला बघुन चंद्र उपहासाने हासला. तें पाहून गणपतीला चंद्राचा फ़ार राग आला. त्या रागाच्या भरात गणपतीने चंद्राला शाप दिला की “आजपासून तुझें कोणी तोंड पाहणार नाही. जो कोणी पाहील त्यावर खोटा आळ येईल!” गणपतीचा हा शाप ऐकून चंद्र भयभीत झाला व क्षमा करुन शाप मागे घ्या, असे विनवणी करू लागला. गणपती ऐकत नाही हे जेव्हा चंद्राच्या लक्षात आले, तेव्हा चंद्राने मोठे तप करुन श्रीगणपतीला प्रसन्न करुन घेतले. (Top Trending Headline)

========

Ravi Pushya Yog : रवि पुष्य योग म्हणजे काय? याचे महत्त्व काय?

========

चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले. पण वर्षातून एक दिवस ” भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी ” तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहील त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले.त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशीं माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे? (Top Stories)

तेव्हां गणपतीने सांगितले की , त्याने संकष्ट चतुर्थी व्रत” करावे, म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल. गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्या मुळे श्रीकृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा खॊटा आळ आला होता. तो आळ कृष्णाने “संकष्ट चतुर्थी व्रत ” केल्यामुळे गेला, अशी कथा आहे. आबालवृद्ध स्त्रीपुरुषांनी सर्वांनी करावयाचे, हे एक साधे , सोपे पण शीघ्र फ़लदायी व्रत आहे. (Social News)

( टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!

📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🗳️ तुमची निवड करा
तुम्ही कोणत्या विषयावरील लेख जास्त वाचता?
📚 खालीलपैकी कोणत्या विषयावरील ब्लॉग तुम्हाला वारंवार वाचायला आवडतात?
💡 एक किंवा अधिक पर्याय निवडा:

Related Articles

Akshaya Tritiya
लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला मीठ का खरेदी केली जाते?

आता लवकरच अक्षय्य तृतीयेचा सण येत आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला...

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

⚙️ Font Size

100%
WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!