जगभरात नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सर्वच पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी झाली आहे. देशातील काय पण परदेशातील समुद्रकिनारेही या गर्दीनं फुलून गेले आहेत. थायलंड सारख्या देशात तर याच समुद्रकिना-यांसाठी जगभरातील पर्यटक दाखल झाले आहेत. मात्र हेच समुद्रकिनारे एका अनपेक्षित अशा धोक्याच्या सावलीत वावरत आहेत. जगभऱातील समुद्रकिना-यांच्या काठावर असलेल्या सर्वच शहरांना भविष्यात मोठा धोका निर्माण होणार आहे. याची सुरुवात झाली असून जागतिक समुद्र पातळी १.४ मीटरने वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे किनारी शहरांचे भविष्य धोक्यात आले आहे. जगभरातील समुद्र किनारे हे पुढच्या काही वर्षामध्ये त्यांच्या जवळील जमिन गिळंकृत करणार आहेत. जागतिक तापमानात वाढ होत असल्यामुळे हा धाका वाढला आहे. हिमनद्या आणि बर्फाच्या वितळण्यात झपाट्यानं वाढ झाली आहे. पृथ्वीच्या तापमानात वाढ झाल्यामुळे, ग्रीनलँड आणि अंटार्क्टिकासारख्या ठिकाणच्या हिमनद्या वेगाने वितळत आहेत. जे हिमनग कधीही तुटणार नाहीत, असे वाटत होते, ते हिमनग आता वेगळे होत आहेत. एखाद्या शहराच्या आकारमानाचे हिमनग समुद्रात सामावत आहेत, या घटना एकापाठोपाठ एक, अशा होत असल्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत चालली आहे. याचा धोका भारतापासून अमेरिकेपर्यंतच्या प्रमुख शहरांना बसणार आहे. पण हा धोका एवढा गंभीर आहे की, झपाट्यानं वाढणारी समुद्राची पातळी नियंत्रणात कशी ठेवावी, यावर हे प्रगत देशही काहीही करु शकणार नाहीत, असे पर्यावरण अभ्यासकांचे मत आहे. त्यामुळेच समुद्रकिना-यावरील मानवी वस्ती दूर हटवणे हा एकमात्र उपाय असल्याचे मत व्यक्त होत आहे. ( Rising Sea Levels )

समुद्रकिनारे हे पर्यटकांचे सर्वात आवडते पर्यटन स्थळ आहेत. काही देशांची संपूर्ण अर्थव्यवस्था या समुद्रपर्यटनावर अवलंबून आहे. मात्र आता जागतिक हवामानात बदल होत असल्यामुळे हेच समुद्रकिनारे धोक्यात आले आहेत. जगभरात औद्योगिकीकरणामुळे वातावरणात हरितगृह वायूंचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे पृथ्वीचे सरासरी तापमान वाढू लागले आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून हिमनद्या वितळून समुद्राची पातळी वाढू लागली आहे. यासंदर्भात झालेल्या संशोधनानुसार जेव्हा उबदार अटलांटिक महासागराचे पाणी ग्राउंडिंग रेषेपर्यंत पोहोचते तेव्हा खालून बर्फ वेगाने वितळू लागतो. यामुळे बर्फाचा थर कमकुवत होतो आणि तो तुटण्याचा किंवा मागे हटण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. यासंदर्भात अभ्यास करणा-या शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, या प्रक्रियेमुळे हजारो वर्षांपासूनच बर्फ वितळू लागला आहे. ईशान्य ग्रीनलँड आइस स्ट्रीम हा ग्रीनलँडचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बर्फाचा प्रवाह आहे. हा बर्फाच्या आवरणाच्या आतील भागातून उगम पावतो आणि ईशान्येकडे समुद्रात वाहतो. ग्रीनलँडच्या एकूण बर्फाच्या प्रवाहापैकी सुमारे १२% वाटा समुद्रात जातो. त्यामुळे समुद्राची पातळी वाढते. उबदार पाण्याच्या प्रवेशामुळे आणि अंतर्गत बर्फाच्या गतिशीलतेमुळे हाच हजारो वर्षांचा बर्फ आता सहजपणे वितळू लागला आहे. ईशान्य ग्रीनलँड आइस स्ट्रीमवर वाढत्या समुद्राच्या उष्णतेचा परिणाम हा केवळ एक प्रादेशिक पर्यावरणीय बदल नाही तर जागतिक समुद्र पातळीसाठी एक गंभीर धोका होणार आहे. ( Rising Sea Levels )
==============
हे देखील वाचा : Iran : इराणमध्ये सर्वसामान्य महिलांना हिजाबसक्ती !
==============
NEGIS म्हणजेच ईशान्य ग्रीनलँड आइस स्ट्रीम हा ग्रीनलँड बर्फाच्या चादरीतून उद्भवणारा सर्वात मोठा बर्फाचा प्रवाह आहे. त्यातील बर्फाचे प्रमाण इतके प्रचंड आहे की, जर तो पूर्णपणे वितळला तर जागतिक समुद्राची पातळी अंदाजे 1.1 ते 1.4 मीटरने वाढू शकते. म्हणूनच शास्त्रज्ञ ग्रीनलँड बर्फाच्या चादरीच्या स्थिरतेचा सर्वात संवेदनशील आणि महत्त्वाचा भाग मानतात. समुद्राची पातळी एवढी वाढली तर अनेक शहरे, देश, आणि लाखो नागरिकांचे भविष्य जलमय होण्याची भीतीही शास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत. या गंभीर घटनेचा अभ्यास करण्यासाठी न्यूकॅसल विद्यापीठ आणि डरहम विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखालील एक गट तयार करण्यात आला आहे. या अभ्यासकांनी ईशान्य ग्रीनलँड आइस स्ट्रीमचे केलेले विश्लेषण प्रतिष्ठित वैज्ञानिक जर्नल नेचर कम्युनिकेशन्समध्ये प्रकाशित झाले आहे. त्यानुसार समुद्राच्या उष्णतेचा आणि वाढत्या वातावरणीय तापमानाचा एकत्रित परिणाम बर्फाच्या कवचावर झाला असून हे कवच कमकुवत झाले आहे. या सर्वांचा परिणाम होऊन गेल्या ३० वर्षात समुद्राची पातळी वाढण्याच्या वेगाला गती आली आहे. शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की, पुढच्या काही वर्षात समुद्राची पातळी १ मीटर किंवा त्याहून अधिक वाढणार आहे. समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे जगातील अनेक प्रमुख किनारी शहरे, विशेषतः मुंबई, कोलकाता, ढाका, शांघाय, न्यू यॉर्क, मियामी, बँकॉक आणि जकार्ता यांना धोका निर्माण झाला आहे. समुद्राच्या जवळ असल्याने त्यांना पूर आणि पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. याशिवाय लाखो नागरिकांपुढे विस्थापीत होण्याची भीती आहे. ( Rising Sea Levels )
सई बने
- Antarctica ice melt
- Bangkok coastal threat
- beaches disappearing
- climate change impacts
- climate crisis
- climate refugees
- coastal cities at risk
- coastal erosion
- coastal flooding
- Dhaka flooding danger
- Durham University research
- environmental research
- forced relocation
- future of beaches
- glacier retreat
- global sea level increase
- global warming
- Greenland ice sheet
- grounding line melt
- ice shelf thinning
- ice stream collapse
- Jakarta sinking city
- Kolkata sea level threat
- land loss
- melting glaciers
- Miami flooding
- Mumbai flood risk
- Nature Communications study
- NEGIS
- New York sea level
- Newcastle University research
- Northeast Greenland Ice Stream
- ocean warming
- polar ice melt
- rising tides
- sea level rise
- Shanghai coastal risk
- storm surge risk
- tourism vs climate
- warm Atlantic water