जेवण झाल्यानंतर जवळपास सगळ्यांनाच ढेकर येतो. जेवणानंतर येणाऱ्या ढेकरला आपल्याकडे ‘तृप्तीचा ढेकर’ असे म्हटले जाते. ढेकर येणे ही खूपच सामान्य आणि दररोज होणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे. ढेकर म्हणजे पोटातील गॅस तोंडाद्वारे बाहेर पडणे. ढेकरद्वारे पचनक्रियेत तयार झालेले वायू बाहेर पडतात, ज्यामुळे पोटाचा जडपणा कमी होऊन आराम मिळतो. ढेकरचे सामान्यपणे दोन प्रकार असतात. एकतर साधा ढेकर आणि दुसरा आंबट ढेकर. जेव्हा आपण खाल्लेले अन्न अन्ननलिकेमार्फत पोटात सरकते तेव्हा तिथे असलेली हवा बाहेर पडते. जेवणानंतर लगेच ढेकर येणे ही पोट भरल्याची लक्षणे आहेत, असा ढेकर शक्यतो २ तासांत येतो त्याला साधा ढेकर म्हटले जाते. तर जेवणाच्या २ तासांनंतर अन्नपचनाची सुरुवात झालेली असते, अशा वेळी अन्न नीट पचले नाही तर आंबट ढेकर येतो. (Health)
ढेकर का येतात?
– काहीजण लवकर जेवण संपवण्याच्या नादात मोठे-मोठे घास खातात. मोठे-मोठे घास घेतल्यामुळे पचनक्रियेवर परिणाम होतो आणि जास्त ढेकर येतात.
– खाताना जांभया देताना मोठे तोंड उघडले जाते, तेव्हा जास्त प्रमाणात हवा शरीरात जाते. जास्त हवा गेल्याने सारखे-सारखे ढेकर येऊ शकतात.
– पचनक्रियेवर परिणाम झाल्याने बद्धकोष्ठता किंवा अपचन होते. यामुळे पोटात गॅस निर्माण होऊन डेकर येतात. पचनक्रियेच्या मदतीसाठी पोटात जीवाणू असतात. त्यांच्यात काही बिघाड झाल्यानेसुद्धा ढेकर येतात. (Marathi)
– कधी कधी अनेकांना उपाशी असताना देखील ढेकर येतात. उपाशी असल्यामुळे पोटात बाहेरची हवा जमा होते. जमलेली हवा ढेकरच्या रुपात शरीराबाहेर फेकली जाते.
– कार्बोनेटयुक्त पेये, जंक फूड, कोबी, मटार, डाळी या सारख्या पदार्थांमुळे पोटात गॅस निर्माण होतो. हे पदार्थ खाल्ल्यावर जास्त ढेकर येतात.
– धुम्रपान केल्याने सिगारेटच्या धुराबरोबर बाहेरची हवासुद्धा शरीरात जाते. ही हवा ढेकरद्वारे बाहेर फेकली जाते. (Todays Marathi Headline)

– हिरड्यांमध्ये फट असल्यास किंवा कृत्रिम दात योग्यरीत्या बसवले नसतील आणि तर त्यात फट निर्माण होते. काही खाताना-पिताना हवा शरीरात जाते. यामुळे सारखे-सारखे ढेकर येऊ शकतात.
– काही वेळा ताण-तणाव असल्यामुळे काहीजण अाहाराचे अतिसेवन करतात. ज्यामुळे पचनक्रियेवर परीणाम होतो आणि पचनक्रिया मंदावते. हे देखील सतत ढेकर येण्याचे कारण असू शकते. (Top Marathi HEadline)
– पचनक्रिये संबंधित आजार, इरिटेबल बावेल सिंड्रोम, अल्सर अशा पोटांच्या आजारामुळे पोटात गॅस तयार होतो. त्यामुळे वारंवार ढेकराच्या समस्या निर्माण होतात.
– च्युइंगम चघळणं, खूप जलद खाणं, जलद पाणी पिणं, जेवताना बोलणं, सिपर किंवा बाटलीतून पाणी पिणं या सर्व मार्गांनी हवा पोटात जाते. अनेक वेळा आतड्याची स्थिती बिघडलेली असतानाही पोट खूप फुगतं. ही अतिरिक्त हवा आपल्या पोटात अडकते आणि आपल्याला नेहमीपेक्षा जास्त ढेकर येऊ लागतात. (Latest Marathi News)
– जर वारंवार ढेकर येत असेल तर त्याची इतर कारणे असू शकतात ज्याचा आरोग्याशी संबंध असू शकतो. वारंवार ढेकर येण्यामुळे, ऍसिड रिफ्लक्स, ऍसिडिटी आणि अनेक गंभीर समस्या देखील उद्भवू शकतात.
काही खाताना सावकाश खा, सोडा आणि बिअर पिऊ नका, च्युइंगम चघळू नका, धूम्रपान थांबवा, जेवणानंतर थोडे चाला, जेणेकरून पचन होईल, तुमच्या सवयींमध्ये थोडेफार बदल केल्यास ढेकरचे प्रमाण कमी होईल. मात्र तरीदेखील डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. ढेकर येण्याने आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतात. ढेकर आल्यामुळे पोटात साठलेली अतिरिक्त बाहेर पडतो, ज्यामुळे पोट फुगणे आणि अस्वस्थता होत नाही. यामुळे पचन संस्था सुधारण्यास मदत होते. (Top Trending Headline)
========
Health : तुम्ही देखील झोपेत घोरत असाल तर ‘हे’ उपाय नक्कीच करून बघा
========
सतत ढेकर येत असल्यास उपाय
– सतत ढेकर येत असल्यास घाेट घाेट गार पाणी प्यावं.
– पोटासंबंधित समस्यांसाठी बडीशेप लाभदायक आहे. याने गॅसची समस्या दूर होते. बडीशेपचे रस आणि गुलाबजल समप्रमाणात मिळवून पिण्याने उचकी आणि ढेकर येणे थांबते. आपण बडीशेप चावूनही खाऊ शकता.
– ढेकर आल्यावर वेलची टाकून केलेला चहा हळूहळू प्यावा. (Top Stories)
– पुदिनाचे सेवन केल्याने पोट स्वच्छ राहते. पुदिन्याची पाने चहात टाकून सेवन करावे.
– ढेकर येत असल्यास कोथिंबीरची काडी चावावी.
– गॅस विकारात सोडा पिणे फायदेशीर आहे. सोडा असॅडिक असल्यामुळे गॅसपासून मुक्ती मिळते.
– काही न मिसळता ताज्या लिंबाचे रस प्यावे.
– आल्याचा चहा पिण्याने किंवा आल्याचा रस मध मिसळून पिण्याने फायदा होतो.
– सतत ढेकर येत असल्यास तोंडात एक लवंग ठेवून चघळावी. (Social News)
(टीप: कोणतेही उपाय करताना डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics