Home सामाजिक Ram Navami 2026 : रामनवमीसाठी सजू लागली अयोध्यानगरी
सामाजिक

Ram Navami 2026 : रामनवमीसाठी सजू लागली अयोध्यानगरी

0

प्रभू श्रीरामांची नगरी असलेल्या अयोध्येमध्ये २२ जानेवारी २०२४ रोजी श्रीराम मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाच्या नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्यात बालरूपातील प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून अयोध्येमध्ये फक्त भारतातूनच नव्हे, तर जगभरातून लाखो-कोट्यवधी रामभक्त येत आहेत. या सर्व रामभक्तांसाठी रामनवमी हा दिवस सर्वात मोठा असतो. अयोध्येत रामनवमीला लाखो रामभक्त येऊन प्रभू रामांच्या चरणी लीन होणार आहेत. त्यामुळे अयोध्यानगरी आता सजू लागली आहे. संपूर्ण अयोध्येत रोषणाई करण्यात येत आहे. प्रभू श्रीरामांचे प्रमुख मंदिर फुलांनी सजवण्यात येणार आहे. तसेच हनुमानगढी आणि इतर प्रमुख मंदिरांचीही फुलांनी सजावट करण्यात येणार आहे. याशिवाय शहरातील प्रमुख मार्गांवर श्रीरामांच्या आयुष्यातील प्रसंगांची चित्रे रेखाटण्यात येत आहेत. पुढील आठवड्यात रामनवमी असली तरी अयोध्येत आत्तापासूनच मोठ्या संख्येने भाविक दाखल होत आहेत. या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने विशेष पथके तयार केली आहेत. ( Ram Navami 2026 )

प्रभू श्रीरामांच्या जन्माचा पवित्र सण रामनवमी हा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला साजरा केला जातो. यावर्षी रामनवमी गुरुवार, २६ मार्च २०२६ रोजी येत आहे. नवमी तिथी २६ आणि २७ मार्च या दोन्ही दिवशी असली, तरी पूजेचा शुभ काळ म्हणजेच मध्यान्ह मुहूर्त अंदाजे सकाळी ११:१३ ते दुपारी १:४१ पर्यंत आहे. त्यामुळे रामनवमी २६ मार्च रोजी साजरी होईल. दुपारी १२:२७ ही वेळ प्रभू रामांच्या जन्माची मानली जाते. यावेळी राममंदिरात पाळणा करून प्रभू रामांचा जन्मसोहळा साजरा केला जातो. या जन्मसोहळ्यासाठी अयोध्येमध्ये मोठी लगबग सुरू आहे. रामनवमी हा भारतात साजरा होणारा एक विशेष सण असून अधर्मावर धर्माच्या विजयाचे आणि मर्यादा पुरुषोत्तमाच्या आदर्शांचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी प्रभू रामांचे दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. नवमी तिथीची सुरुवात २६ मार्च २०२६ रोजी सकाळी ११:४८ वाजता होणार असून नवमी तिथीचा शेवट २७ मार्च २०२६ रोजी सकाळी १०:०६ वाजता होणार आहे. त्यामुळे काही ठिकाणी रामनवमीचा पवित्र सण २६ आणि २७ मार्च या दोन्ही दिवशी साजरा केला जाणार आहे. अयोध्येतही या दोन दिवसांत रामनवमी साजरी होणार आहे.

अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या रामनवमी उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे दुपारी १२ वाजता इस्रो तंत्रज्ञानाचा वापर करून रामलल्लांना दिला जाणारा चार मिनिटांचा ‘सूर्य टिळक’ सोहळा. या सोहळ्यादरम्यान मंदिरात विशेष सजावट करण्यात येणार आहे. रामनवमीच्या दिवशी दुपारी १२ वाजता सूर्याची किरणे थेट रामलल्लाच्या कपाळावर पडतील; या विधीला ‘सूर्य टिळक’ असे म्हणतात. हा सोहळा तमाम रामभक्तांना पाहता यावा म्हणून अयोध्यानगरीमध्ये सर्वत्र टीव्ही संच लावण्यात येत आहेत. यावेळी रामलल्लांना विशेष अभिषेक आणि सजावट केली जाईल, तसेच ५६ प्रकारचे नैवेद्य प्रभू श्रीरामांना अर्पण करण्यात येणार आहेत. रामभक्तांची मोठी गर्दी लक्षात घेता हनुमानगढी आणि श्रीराम हॉस्पिटल दरम्यानच्या १ किलोमीटर अंतरावर रामपथवर लाल गालिचा अंथरला जाणार आहे. तसेच रामनवमी यात्रेदरम्यान सुरक्षा देखरेखीसाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे. गर्दीच्या व्यवस्थापनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळी संपूर्ण परिसर लाखो दिव्यांनी उजळून निघणार आहे. ( Ram Navami 2026 )

=======

हे देखील वाचा : Shakumbhari Shakti Peeth : शाकुंभरी शक्तीपीठाची महती

=======

समस्त रामभक्तांसाठी आनंदाची बातमी म्हणजे, रामजन्मभूमी संकुलातील पूरक आणि सप्तर्षी मंदिरांमध्ये लवकरच दर्शन सुरू होणार आहे. रामनवमीनंतर दररोज ५ ते ६ हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. राम मंदिर आणि सर्व पूरक मंदिरांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने गेल्या वर्षी २५ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धर्मध्वज फडकवला होता. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वर्षप्रतिपदेच्या दिवशी राम मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर श्रीरामयंत्र आणि रामनामाची स्थापना केली. तेव्हापासून मंदिरातील सर्व सात पूरक मंदिरे आणि सप्तर्षी मंदिरांमध्ये दर्शन कधी सुरू होणार याबाबत भाविकांमध्ये उत्सुकता होती. आता ट्रस्टने हे दर्शन रामनवमीनंतर सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ( Ram Navami 2026 )

— सई बने

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Health Care
सामाजिक

Chardham Yatra : चारधाम यात्रेची तयारी सुरू

उत्तराखंडची चारधाम यात्रा १९ एप्रिल रोजी सुरू होणार आहे. अक्षय तृतीयेचा मुहूर्त...

सामाजिक

Yamunotri Dham : यमुनोत्री धामची रहस्ये

उत्तराखंड राज्यातील चारधाम यात्रेचे हिंदू धर्मात मोठे महत्त्व आहे. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ...

सामाजिक

Narmadeshwar Mahadev Temple : रंग बदलणारे शिवलिंग

उत्तर प्रदेशामध्ये भगवान शंकराची अनेक मंदिरे आहेत. या मंदिरांच्या स्थापनेमागे पौराणिक कथा...

सामाजिक

Chilkur Balaji Temple : अनोखे व्हिसा मंदिर

प्रभू श्रीरामांचे परमभक्त असलेल्या महाबली हनुमानांचा जन्मोत्सव २ एप्रिल रोजी साजरा होणार...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!