Home आंतरराष्ट्रीय Prince Andrew : माजी राजकुमाराच्या कर्माची फळं
आंतरराष्ट्रीय

Prince Andrew : माजी राजकुमाराच्या कर्माची फळं

0

ब्रिटनचे राजा चार्ल्स यांचे भाऊ आणि माजी राजकुमार अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर यांची जवळपास १२ तासांच्या चौकशीनंतर सुटका करण्यात आली. माजी प्रिन्स अँड्र्यू यांना जेफ्री एपस्टाईनशी संबंधित आरोपांवरून पोलिसांनी अटक केली तेव्हा ब्रिटनमध्ये खळबळ उडाली होती. नॉरफोकमधील सँडरिंगहॅम इस्टेट येथील वुड फार्म येथे अँड्र्यू यांना अटक झाली, तेव्हा त्यांचा वाढदिवस साजरा होत होता. अँड्र्यू यांच्यावर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि गुंतवणुकीबाबत अन्य देशांना आवश्यक अशी माहिती पुरवल्याचा आरोप आहे. जेफ्री एपस्टाईन प्रकरणात नाव आल्यावर आधीच ब्रिटिश राजघराण्याने अँड्र्यू यांच्या सर्व उपाध्या काढून घेतल्या आहेत. ब्रिटनच्या राजघराण्याच्या वारसांमध्ये आठव्या स्थानावर अँड्र्यू यांचे नाव होते. मात्र ६६ वर्षीय या माजी राजकुमाराने आपल्या नावापुढे ‘प्लेबॉय प्रिन्स’ अशी उपाधी लावून घेतली होती. अँड्र्यू यांचे संपूर्ण आयुष्य अशाच प्रकारच्या वादांनी भरलेले आहे. पैशांचा गैरव्यवहार ते प्रेमप्रकरणे, यामुळे अँड्र्यू हे राजघराण्यासाठी डोकेदुखी ठरले आहेत. ( Prince Andrew )

आता जेफ्री एपस्टाईन प्रकरणात त्यांचे नाव आल्यामुळे राजघराण्याने अखेर त्यांच्याकडून सर्व उपाध्या काढून घेतल्या आणि ब्रिटिश कायद्याचा आम्ही सन्मान करतो, असे जाहीर केले आहे. मात्र अँड्र्यू यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सारा आणि दोन मुलींचाही जेफ्री प्रकरणात सहभाग असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अँड्र्यू यांच्या चौकशीनंतर त्यांचीही चौकशी होणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. अमेरिकेत दोषी ठरलेल्या लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टाईन यांच्याशी संबंधित फायली प्रसिद्ध झाल्याने ब्रिटिश राजघराण्यात वादळ निर्माण झाले आहे. एपस्टाईन फाइल्समधून माजी राजकुमार अँड्र्यू यांनी एपस्टाईनसोबत संवेदनशील सरकारी अहवाल शेअर केल्याचे उघड झाले आहे. सार्वजनिक पदावरील गैरवर्तन हा इंग्लंड आणि वेल्समध्ये गंभीर गुन्हा असून त्यासाठी जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे अँड्र्यू भविष्यात गंभीर अडचणीत येऊ शकतात.

ब्रिटनमध्ये अँड्र्यू यांची प्रतिमा ‘प्लेबॉय प्रिन्स’ अशीच राहिली आहे. त्यामुळे त्यांच्या वागण्यामुळे ब्रिटिश राजघराण्याच्या प्रतिमेला तडा गेल्याची टीका होत आहे. किंग चार्ल्स तिसरे यांनी या घटनेनंतर लेखी निवेदन जारी करून कायद्याला त्याचे काम करू द्यावे, असे सांगत बकिंगहॅम पॅलेसकडून पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले आहे. याआधीच अँड्र्यू यांच्या राजेशाही पदव्या काढून घेण्यात आल्या असून विंडसरमधील अधिकृत निवासस्थानही त्यांच्याकडून काढून घेण्यात आले आहे. अँड्र्यू यांचे नाव जेफ्री एपस्टाईन प्रकरणाशी अनेक वर्षांपासून जोडले गेले आहे. २०१० मध्ये त्यांनी एपस्टाईनला काही गोपनीय अहवाल पाठवले होते, तेव्हा ते यूकेचे व्यापार दूत होते. या अहवालांमध्ये आशियाई देशांच्या अधिकृत भेटींशी संबंधित माहिती होती. सार्वजनिक कार्यालयातील गैरवर्तन हा यूकेमध्ये गंभीर गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी अँड्र्यू यांना जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. या प्रकरणात नऊ ब्रिटिश पोलिस दल कागदपत्रांची तपासणी करत आहेत. अमेरिकेच्या न्याय विभागाने फायली जाहीर केल्यामुळे तपासाची व्याप्ती वाढली आहे. ( Prince Andrew )

अँड्र्यू हे वादात सापडण्याची ही पहिली वेळ नाही. त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९६० रोजी लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसमध्ये झाला. राणी एलिझाबेथ द्वितीय आणि प्रिन्स फिलिप यांचे ते तिसरे अपत्य आहेत. १९८२ मध्ये फॉकलंड युद्धादरम्यान त्यांनी हेलिकॉप्टर पायलट म्हणून काम केले. त्यावेळी त्यांचा मोठा सत्कार झाला. मात्र युद्धानंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वाद वाढले. अभिनेत्री, मॉडेल आणि इतर महिलांशी त्यांचे नाव जोडले गेले. १९८६ मध्ये त्यांनी सारा फर्ग्युसनशी विवाह केला. राजकुमारी बीट्रिस आणि राजकुमारी युजेनी या दोन मुली त्यांना झाल्या. १९९६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर ते व्यापार राजदूत झाले. त्यांनी अनेक श्रीमंत उद्योगपतींशी संबंध प्रस्थापित केले. २००७ मध्ये त्यांनी सनिंगहिल पार्क हे घर मोठ्या किमतीत विकले. त्यावर टीका झाली.

=======

हे देखील वाचा : Afghanistan : महिलांना मारा… फक्त त्यांची हाडं मोडू नका…

=======

१९९९ पासून त्यांची एपस्टाईनसोबत मैत्री होती. एपस्टाईन अटकेत गेल्यानंतरही त्यांनी संपर्क ठेवला. २०१० मध्ये एपस्टाईनच्या न्यूयॉर्कमधील घरातील अँड्र्यूचे फोटो व्हायरल झाले. हे राजघराण्यासाठी लाजिरवाणे ठरले. २०१९ मध्ये व्हर्जिनिया गिफ्रे यांनी अँड्र्यूवर गंभीर आरोप केले. या प्रकरणानंतर त्यांच्यावर अधिक चौकशी सुरू झाली. २०२२ मध्ये किंग चार्ल्स सत्तेवर आल्यानंतर त्यांनी अँड्र्यू यांना समज दिली. तरीही संवेदनशील कागदपत्रे लीक केल्याचा आरोप आहे. अँड्र्यू यांच्या अटकेनंतर त्यांच्या माजी पत्नी सारा फर्ग्युसन आणि मुलींबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. सारा यांचे एपस्टाईनसोबतचे जुने ईमेल समोर आले आहेत. सध्या तरी त्यांच्यावर कोणतीही अधिकृत कारवाई झाल्याची माहिती नाही. तपास मुख्यतः अँड्र्यू यांच्यावर केंद्रित आहे. ठोस पुरावे मिळाल्यास त्यांना जन्मठेप होऊ शकते. दरम्यान, राजकुमारी बीट्रिस आणि राजकुमारी युजेनी या नव्या खुलाशांमुळे अस्वस्थ असल्याचे सांगितले जाते. आता पुढील घडामोडीकडे ब्रिटिश जनतेचे लक्ष लागले आहे. ( Prince Andrew )

सई बने

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Katrina Kaif
आंतरराष्ट्रीय

Jiang Xueqin : चीनच्या नॉस्ट्राडॅमसने सांगितले ट्रम्पचे भविष्य

अमेरिका-इराण युद्धामध्ये पंधरा दिवसांचा विराम आला आहे. यात चीनची भूमिका असल्याची माहिती...

Jewellery
आंतरराष्ट्रीय

Jared Kushner : ट्रम्पचा जावई आहे तरी कोण

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर कायमचा विराम आणण्यासाठी पाकिस्तानची राजधानी...

Mobile
आंतरराष्ट्रीय

First Lady Melania Trump : अमेरिकेच्या फर्स्ट लेडीसाठी शाही सवारी

इराणमध्ये सत्तांतर करण्याच्या हेतूने अमेरिकेने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरुद्ध लष्करी मोहीम...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!