Home लाईफ स्टाईल Mahashivratri : शंकरांच्या गळ्यात नाग का आहे?
लाईफ स्टाईल

Mahashivratri : शंकरांच्या गळ्यात नाग का आहे?

0

महाशिवरात्री हा सण भगवान शिवाला समर्पित आहे आणि या दिवशी शिवभक्त उपवास ठेवतात आणि महादेवाकडे मनोकामना पूर्ण करण्याची प्रार्थना करतात. महाशिवरात्रीला भगवान शिव आणि माता पार्वतीची विशेष पूजा केली जाते. यंदा महाशिवरात्र १५ फेब्रुवारी रविवारी साजरी होत आहे. धार्मिक मान्यतेनुसार महाशिवरात्री हा सण मनोकामना पूर्ण करणारा आहे. आपण नेहमीच बघतो की भगवान शिव आपल्या गळ्यात नाग धारण करतात. त्यांच्या गळयात कायम नाग असतो. पिंडीवर देखील आपल्याला नाग पाहायला मिळतो. पण भोलेनाथ नाग का धारण करतात माहिती आहे का? (Mahashivratri)

पौराणिक कथेनुसार भगवान शंकराच्या गळ्यात गुंडाळलेल्या सापाचे नाव वासुकी आहे. असे म्हणतात की नागराज वासुकी हे भगवान शिवाचे परम भक्त होते. नागवंशी लोक हिमालयात, शिवाच्या प्रदेशात राहत होते आणि भगवान शिवाला या सर्वांवर खूप प्रेम होते. याचा पुरावा नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे. ज्यांच्या नावावरून शिव हे सापांचे दैवत असल्याचे दिसून येते आणि त्यांच्याशी शिवाचे अतूट नाते आहे. नागराज वासुकी सदैव भगवान शंकराच्या उपासनेत तल्लीन असे. समुद्रमंथनाच्या वेळी ज्या दोरीने समुद्रमंथन करण्यात आले ती दोरी राजा वासुकीची होती. यानंतर नागराज वासुकीच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिवाने त्याला नागलोकचा राजा बनवले आणि तो आपल्या गळ्यात दागिन्याप्रमाणे गुंडाळून ठेवण्याचे वरदानही दिले. (Todays Marathi Headline)

Mahashivratri

पुराणानुसार शेषनाग (अनंत), वासुकी, तक्षक, पिंगला आणि कर्कोटक नावाच्या सापांची पाच कुळे होती. यापैकी शेषनाग हा सापांचा पहिला वंश मानला जातो. त्याचप्रमाणे पुढे वासुकीचा जन्म झाला. जो शिवाची पूर्ण भक्तिभावाने पूजा करत असे. वासुकीची भक्ती पाहून भगवान शिव खूप आनंदित झाले आणि त्यांनी त्याला गळ्यात धारण करण्याचे वरदान दिले. भगवान शंकराच्या भक्तीतून मिळालेल्या या वरदानामुळेच शिवाच्या गळ्यात साप लपेटलेला दिसतो. असे मानले जाते की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची पूर्ण भक्तिभावाने पूजा केली जाते. असे केल्याने भगवान शिवाला आनंद मिळतो आणि ते आपल्या भक्तांना सुख-समृद्धी देतात. महाशिवरात्रीच्या दिवशी विधीनुसार महादेवाची पूजा केल्याने कुंडलीतील काल सर्प दोषापासून मुक्ती मिळते आणि जीवनात सदैव सुख-समृद्धी राहते आणि कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागत नाही. (Top Stories)

========

Mahashivratri : महाशिवरात्रीला घरी अशा पद्धतीने भगवान शंकराची पूजा केल्यास मिळेल उत्तम फळ

Mahashivratra : महाशिवरात्र साजरी करण्यामागच्या आख्ययिका

========

नागकुळातील सर्व साप शिवाच्या प्रदेशात म्हणजे हिमालयात राहत होते. भगवान शिवाचेही नागवंशीयांवर खूप प्रेम होते. सुरुवातीला सापांची पाच कुळं होती ज्यात शेषनाग, वासुकी, तक्षक, पिंगला आणि कर्कोटक यांचा समावेश होता. सापांच्या या पाच कुळांना देवांच्या श्रेणीत ठेवण्यात आले होते. यापैकी शेषनाग हा सापांचा पहिला राजा मानला जातो, त्याला अनंत या नावानेही ओळखले जाते. पुढे, शेषनागानंतर, वासुकी नागांचा राजा झाला, जो भगवान शिवाचा सेवक देखील झाला. वासुकीनंतर तक्षक आणि पिंगला यांनी राज्याचा ताबा घेतला. (Social News)

(टीप: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

लाईफ स्टाईल

Vallabhacharya : वल्लभाचार्य जयंती – कोण होते कृष्णभक्त वल्लभाचार्य?

आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अकरावी तिथी अर्थात. आज चैत्र महिन्यातील एकादशीचा...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!