Home लाईफ स्टाईल Shiv- Parvati : शिव-पार्वतीच्या विवाहाची रंजक कथा
लाईफ स्टाईल

Shiv- Parvati : शिव-पार्वतीच्या विवाहाची रंजक कथा

0
Cricket

हिंदू धर्मात शंकर-पार्वती विवाह हा एक अत्यंत पवित्र आणि दिव्य सोहळा मानला जातो. सतीचा पुनर्जन्म असलेल्या माता पार्वतीने महादेवांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपस्या केली होती. त्यांच्या या अपार प्रेमामुळे शिवजी प्रसन्न झाले आणि त्यांनी त्रियुगीनारायण येथे पार्वतीशी विवाह केला, जो शिव-शक्तीच्या मिलनाचे प्रतीक आहे. भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या विवाहाच्या स्मरणार्थ संपूर्ण देशभरात महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो. आज महाशिवरात्र असल्याने आपण शिव आणि पार्वती यांचा विवाह कसा झाला, याची कथा जाणून घेऊया. भगवान शिवला आपल्या पतीच्या रूपात प्राप्त करण्यासाठी माता पार्वतीने कठोर तपश्चर्या केली होती. हीच तपश्चर्या फळाला आली आणि त्यांचा विवाह झाला.  शिव तपस्याने प्रसन्न झाले आणि माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला माता पार्वतीशी लग्न केले. आज महाशिवरात्र असल्याने याच निमित्ताने जाणून घेऊया शिव आणि पार्वती यांच्या विवाहाची कथा. (Shiv Parvati)

पौराणिक कथेनुसार पर्वतीय राजा हिमालयाची पत्नी मेनका हिच्या पोटी माता पार्वतीचा जन्म झाला. पर्वतराजाची कन्या असल्यामुळे तिला पार्वती असे संबोधण्यात आले. माता पार्वतीने शिवप्रभूंशी विवाह करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. पार्वतीने अनेक वर्षे जंगलात तपश्चर्या केली. अनेक वर्षांच्या कठोर तपश्चर्येनंतर त्यांना शिवप्रभूंचे दर्शन झाले. जेव्हा शिवप्रभूंनी माता पार्वतीला आशिर्वाद देऊन इच्छा विचारली. तेव्हा माता पार्वतीने शिवप्रभूंशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. (Mahashivratri)

भगवान शंकरांनी पार्वतीची इच्छा पूर्ण केली आणि तिच्याशी लग्न करण्याचे वरदान दिले. वरदान देऊन शिवप्रभू परत निघून गेले. भगवान शंकरांनी पार्वतीची लग्नापूर्वी परीक्षा घेण्यासाठी सात ऋषींना पाठवले. सप्तऋषींनी पार्वतीला समजावण्याचा प्रयत्न केला की भगवान शिव अशुभ आहे, अशुभ पोशाख आहे आणि ते जटाधारी आहे आणि तुमच्यासाठी योग्य वर नाही. तसेच शिवप्रभूंशी लग्न करून तू सुखी होणार नाहीस, असे देखील सप्तऋषींनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या बोलण्याचा माता पार्वतीवर काहीही परिणाम झाला नाही. त्या शिवप्रभूंशी लग्न करण्याच्या भूमिकेवर ठाम राहिल्या. (Marathi)

पार्वतीवर सात ऋषींच्या बोलण्याचा अजिबात परिणाम झाला नाही आणि त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या हे शंकरजींनी पाहिले. त्यांनी स्वत:च पार्वतीची परीक्षा घेण्याचे ठरवले. पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी भगवान शंकराने मगरीचे रूप धारण केले आणि पार्वतीसमोर गेले. पार्वतीने पाहिले की मगरीच्या जबड्यात एक लहान मूल आहे आणि ते मुल जीव वाचवण्यासाठी धडपड करत आहे. हे चित्र पाहून पार्वती भावूक झाली आणि तिने मगरीला मुलाला सोडण्याची विनंती केली. यावर मगरीने सांगितले की, दिवसाच्या या प्रहरात ती कधीही आपली शिकार सोडत नाही. मात्र पार्वतीने वारंवार विनंती केल्यावर मगरीने एक अट घातली. (Todays Marathi Headline)

Shiv- Parvati

मगर पार्वतीला म्हणाली की भगवान शंकराने तुला जे वरदान दिले आहे, ते तु मला दिलेस तर मी बालकाला सोडून देईन. पार्वतीने क्षणाचाही विलंब न लावता मगरीला वचन दिले आणि मुलाचे प्राण वाचवले. मुलाचे प्राण वाचवल्यानंतर पार्वतीला वाटले की शंकराशी लग्न करण्याचा आशीर्वाद गेला. ती पुन्हा कठोर तपश्चर्येत लीन झाली. तेव्हा भोलेनाथ प्रकट झाले आणि पार्वतीकडे पाहून हसत म्हणाले, मगर आणि मूल दोन्ही मीच होतो. मी तुझी परीक्षा घेत होतो. तू परीक्षेत पास झाली आहेस. यानंतर भगवान शंकरांनी पार्वतीशी विवाह केला आणि तिला आपली अर्धांगिनी बनवले. (Top Marathi News)

अजून एका कथेनुसार सतीने आपल्या वडिलांच्या यज्ञात झालेल्या अपमानामुळे योगाग्नीने देह त्याग केला. त्यानंतर त्या हिमालय पर्वताच्या घरी पार्वती म्हणून जन्माला आल्या. त्यांचे वडील हिमवान आणि आई मेना होते. लहानपणापासूनच पार्वतींच्या मनात भगवान शंकरांविषयी अपार भक्ती आणि प्रेम होते. त्यांनी त्यांनाच पती म्हणून स्वीकारण्याचा निश्चय केला. (Latest Marathi Headline)

माता पार्वतीने भगवान शिवला आपला पती मानले होते. तिचा निर्धार होता की तिचे लग्न झाले तर ते भोलेनाथ यांच्यासोबतच होईल. दुसरीकडे देवांनाही तेच हवे होते. देवतांनी माता पार्वतीच्या विवाहाचा प्रस्ताव कामदेवांकडून भगवान शिवकडे पाठविला. ज्याला भोलेनाथांनी नाकारले आणि तिसर्‍या डोळ्याने नष्ट केले. पण माता पार्वती यापासून परावृत्त झाल्या नाही आणि त्यांनी कठोर तपश्चर्या सुरू केली. (Social Updates)

या तिन्ही लोकात देवी पार्वतीच्या तपश्चर्येने हाहाकार माजला. पर्वत डगमगू लागले. देवता भगवान शिवकडे मदतीसाठी पोहोचले. भोलेनाथ पार्वतीच्या तपश्चर्येने प्रसन्न झाले आणि दर्शन देऊन म्हणाले राजकुमारशी लग्न करून घे. कारण, माझ्यासोबत राहणे सोपे नाही. पण माता पार्वती म्हणाल्या की तिने त्यांनाच आपला पती म्हणून स्वीकारले आहे. आता ती त्याच्याशिवाय कोणाशीही लग्न करणार नाही. पार्वतीचे हे असीम प्रेम पाहून भोलेनाथांनी लग्नास होकार दिला. (Top Trending News)

=========

Mahashivrtari : महाशिवरात्रीला ‘या’ लाभांसाठी न चुकता करा महामृत्युंजय मंत्राचा जप

Mahashivratri : महाशिवरात्रीच्या दिवशी ‘हे’ उपाय करून मिळवा सकारात्मक लाभ

पौराणिक कथेनुसार, जेव्हा भगवान शिव माता पार्वतीशी लग्न करण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांच्याबरोबर संपूर्ण जगतातले भूत-प्रेत होते. याखेरीज शिवजींच्या मिरवणुकीत भुत, चुडैलसुद्धा सहभागी होते. त्यांनी भोलेनाथ यांना भस्माने सुशोभित केले. हाडांची माळ घातली. ही अनोखी मिरवणूक पाहून राणी मैना देवी म्हणजेच माता पार्वतीची आई हैराण झाली. त्यांनी आपल्या मुलीचा विवाह करण्यास नकार दिला. (Top Stories)

शिवाचे हे रूप पाहून माता पार्वतीने त्यांना विनंती केली की, त्यांनी विवाह परंपरेनुसार तयार होऊन यावे. यानंतर, भोलेनाथ यांनी त्यांची विनंती मान्य केली आणि ते नवरदेव म्हणून तयार झाले. त्यांचे हे अनोखे सौंदर्य पाहून राणी मैना देवी चकित झाली. यानंतर, देवी पार्वती आणि भोलेनाथ यांचे लग्न सृष्टीचे निर्माते श्री ब्रह्माच्या उपस्थितीत झाले. पौराणिक कथेनुसार शिव आणि पार्वती यांच्या लग्नाची तारीख महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते. (Social News)

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Akshaya Tritiya
लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला मीठ का खरेदी केली जाते?

आता लवकरच अक्षय्य तृतीयेचा सण येत आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला...

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!