भगवान विष्णूला समर्पित असलेला अधिक महिना हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. त्यालाच आपण अधिक मास, मलमास असे म्हणतो. येत्या नव्या वर्षात हा अधिक महिना असणार आहे. १७ मे २०२६ ते १५ जून २०२६ पर्यंत हा अधिक महिना असणार आहे. हा अधिक मास ज्येष्ठ महिन्यात येतो, म्हणून याला ज्येष्ठ अधिक मास असेही म्हणतात. या अधिक महिन्यात भगवान विष्णूची पुजा आणि तिर्थयात्रा केल्या जातात. मात्र या काळात विवाह आणि गृहप्रवेश समारंभ यासारखे शुभ कार्यक्रम केले जात नाहीत. असे असले तरी या अधिक महिन्यात धार्मिक ग्रंथाचे सार्वजनिक पठन करण्यात येते. येत्या नव्या वर्षात येत असलेल्या या अधिक महिन्यामुळे भगवान विष्णुमंदिरांमध्ये धार्मिक पर्यटन मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे आत्तापासूनच या संबंधी यात्रा कंपनी आणि भाविकांनी वाहतूक नियोजन सुरु केले आहे. (Lord Vishnu)

नव्या वर्षाच्या मे महिन्यात अधिक महिना लागणार आहे. १७ मे ते १५ जून २०२६ या कालावधीत येणा-या अधिक महिन्यासाठी आत्तापासूनच धार्मिक यात्राचे नियोजन सुरु झाले आहे. अधिक मासला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. भगवान विष्णूला समर्पित असलेल्या या महिन्यात भगवान विष्णूमंदिरांमध्ये मोठ्या संख्येने भाविक येतात. या संपूर्ण महिन्यात उपवास करणा-यांची संख्याही अधिक असते. शिवाय या महिन्यात दानधर्म आणि सत्संगही मोठ्या प्रमाणात होतो. (Social News)
अधिक महिना साधारणपणे दर तीन वर्षांनी येतो. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक १९ वर्षांच्या चक्रात अधिकमास येतो. ज्या महिन्यात सूर्य संक्रांत नसते, तो महिना अधिक महिना मानला जातो. २०२३ मध्ये असा अधिक श्रावण महिना होता. साधारणपणे दर ३२ महिने १६ दिवसांनी एक अधिक मास येतो, जो १९ वर्षांच्या चक्राचा भाग असतो. चैत्र ते अश्विन या महिन्यांपैकी एखादा महिना अधिक येऊ शकतो. कार्तिक आणि फाल्गुन हे महिने अधिक येण्याची शक्यता असते. तर मार्गशीर्ष, पौष, माघ हे महिने कधीच अधिक येत नाहीत. २६ मध्ये येणाऱ्या अधिक महिन्याला श्रावण अधिक मास असे म्हणतात. हिंदू धर्मानुसार हा महिना मन, वाणी आणि वर्तन सुधारण्याचा, जीवनातील अडथळे दूर करण्याचा आणि मानसिक शांती मिळवण्याचा काळ मानला जातो. त्यामुळे या महिन्यामध्ये करण्यात येणा-या धार्मिक पर्यटनाला अधिक महत्त्व असते. (Lord Vishnu)

अधिक महिन्याचा संदर्भ वैदिक साहित्यातही आहे. सौर कालगणना वेदकाळात अस्तित्वात होती आणि चांद्र कालगणना ही अस्तित्वात होती. वैदिक ऋषींना हे लक्षात आले की, चांद्र आणि सौर कालगणना यांचा एकमेकांशी मेळ जुळण्यासाठी काही दिवसांचा फरक पडत होता. हे अंतर भरून काढण्यासाठी काही दिवस अधिक घ्यावे लागले. वैदिक काळातच हे अंतर भरून काढण्यासाठी दर ३ वर्षांनी कालगणनेमध्ये ३० दिवस अधिक घेतले गेले. हाच तो अधिक मास होय. या अधिक महिन्याचा आणि विष्णूपुजेचा संबंध कसा आला, याचीही आख्यायिका सांगितली जाते. त्यानुसार, या अधिक महिन्यात घरात मंगलकार्य करता येत नाहीत, त्यामुळे या महिन्याप्रती हेडाळणीची भावना निर्माण झाली. त्यामुळे प्रत्यक्ष भगवान विष्णुने या अधिक महिन्याला आपलेसे केले. भगवान विष्णुंनी या अधिक महिन्याचे नाव बदलून ‘पुरुषोत्तम मास’ असे ठेवले. तेव्हापासून अधिक महिन्यात विष्णुपूजेची परंपरा सुरु झाली. (Social News)
=========
Durga Ashtami : मासिक दुर्गाष्टमीची माहिती आणि महत्त्व
=========
या काळात भारतातील सर्वच तिर्थश्रेत्रांवर मोठी गर्दी होते. त्यातही प्रयागराज संगमावर भाविकांचा मोठा मेळा भरतो. तसेच हरिद्वारलाही मोठ्या संख्य़ेनं भाविक जातात. महाकाल नगरी उज्जैनमध्ये तर या अधिक महिन्यात मोठी यात्रा भरते. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात पुरुषोत्तम मंदिर आहे. या मंदिरातही अधिक मासात संपूर्ण महिना विशेष धार्मिक उत्सव आयोजित केला जातो. असे असले तरी, या अधिक महिन्यात काही मंगल कृत्ये करू नयेत, असा संकेत रूढ आहे. त्यात विवाह, मुंज, बारसे यांचा समावेश आहे. नव्या वर्षात येत असलेल्या अधिक महिन्यात द्वारका, जगन्नाथ पुरी, अयोध्या आणि मथुरा-वृंदावन येथे मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाकड़ून तयारी करण्यात येत आहे. (Lord Vishnu)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
- adhik mas
- America
- Ayodhya
- bhagwan vishnu
- BJP
- china
- congress
- donald trump
- Dwarka
- eknath shinde
- Hindu
- india
- information
- International news
- Jagannath Puri
- Latest International News
- Latest Marathi Headline
- latest marathi news
- Mahakal city
- maharashtra politics
- Marathi News
- Mathura-Vrindavan
- Mumbai
- Narendra Modi
- News
- Political News
- political updates
- Politician
- Politics
- purushottam mas
- Social News
- Social Updates
- Temple
- todays marathi headlines
- Todays Marathi News
- Top Marathi Headlines
- Top Stories
- Uddhav Thackery
- ujjain
- vani