Home लाईफ स्टाईल Kinkrant : जाणून घ्या संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या किंक्रांतचे महत्त्व
लाईफ स्टाईल

Kinkrant : जाणून घ्या संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या किंक्रांतचे महत्त्व

0
Karwa Chauth

१५ जानेवारी रोजी सर्वत्र संक्रांतीचा सण साजरा होणार आहे. या दिवशी सगळेच एकमेकांना तिळगुळ देतात आणि गोड बोलण्याचा संदेश देतात. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या दिवसाला मकर संक्रांत असे म्हटले जाते. संक्रातीपासूनच सूर्य हळूहळू उत्तरेकडे झुकायला लागतो आणि दिवस मोठा होऊन रात्र लहान होते. संक्रांतीला जेवढे महत्त्व धार्मिकदृष्ट्या आहे तेवढेच महत्त्व वैज्ञानिकदृष्ट्या देखील आहे. या दिवसापासून थंडी कमी होऊन ऊन वाढायला लागते. संक्रांतीचे महत्त्व बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे. संक्रातीचा सण साजरा झाल्यानंतर लोकं आपल्या कामाला लागतात. मात्र संक्रातीचा दुसरा दिवस देखील खूपच महत्त्वाचा समजला जातो. या दिवसाला देखील मोठा अर्थ आहे. (Kinkrant)

संक्रातीनंतर येणाऱ्या दुसऱ्या दिवसाला ‘किंक्रांत’ किंवा ‘कर दिन’ असे म्हटले जाते. किंक्रांत हा दिवस अशुभ समजला जातो. पौष शुक्ल षष्ठीचा दिवस हा किक्रांत म्हणजेच करदिन मानला जातो. यादिवशी चांगले काम किंवा शुभ कार्य केले जात नाही, अशी मान्यता आहे. ज्याप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी देवी संक्रांतीने शंकासूराचा वध केला होता, त्याचप्रमाणे देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकर नावाच्या दैत्याला मारले होते; त्यामुळे हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जाऊ लागला. या दिवशी कोणतेही शुभ कार्य असल्याचे म्हटले जाते. किंक्रांतच्या दिवशी तीळ व गूळ आपल्याला खाण्यात यावा याचे नियोजन आपले ऋषी मुनी पूर्वजांनी आपल्या शरीराची ऊर्जा वाढावी, कडाक्याच्या थंडीपासून आपलेसंरक्षण करणे ह्या हेतूनेच हे सण साजरे करण्याचे ठरवले असावे. (Latest Marathi Headline)

Kinkrant

ज्योतिषशास्त्रानुसार किंक्रांत हा दिवस अशुभ मानण्यात आला आहे. त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. महाराष्ट्रासारख्या अनेक भागात या दिवशी महिला शेण सारवत नाही. या दिवशी शिळी भाकरी खाल्ली जाते. बेसनाचे धिरडे बनवण्याची परंपरा किंक्रांत या सणाच्या दिवशी आहे. किंक्रांतीला मोकळे केस सोडून काम करणे वर्ज्य मानले जाते. घरात भांडण होत असतील तर या दिवशी शांत राहायला हवे. लांबचा प्रवास टाळायला हवा. आजच्या दिवशी कुलदैवतांचे स्मरण करुन देवाची पूजा करायला हवी. तसेच अनेक ठिकाणी आजच्या दिवशी घरासमोर शेणाचे गोळे करुन पूजा केली जाते. (Top Stories)

किंक्रांतच्या दिवशी स्त्रिया हळदीकुंकू समारंभ साजरा करतात. या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये असे सांगितले जाते, किंक्रांतला भोगीच्या दिवशी केलेली भाकरी राखून ठेवली जाते आणि ती शिळी भाकरी खाल्ली जाते, केरकचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असे सांगितले जाते, तसेच दुपारी हळदीकुंकू करतात. अशा काही प्रथा किंक्रांतला महाराष्ट्रामध्ये पाळल्या जातात. तसेच, यादिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याचीही प्रथा आहे. या दिवशी संक्राती देवीची पूजा करून तिला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. त्याचप्रमाणे कुलदैवताचे नामस्मरण केले जाते. (Top Trending Headline)

=======

Makar Sankranti : वर्षातला पहिला सण असलेल्या मकरसंक्रांतीची माहिती आणि महत्त्व

=======

दक्षिण भारतात किंक्रांतीचा दिवस ‘मट्टू पोंगल’ म्हणून साजरा करतात. या दिवशी गाई-बैलांना स्नान घालून त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालतात. त्यांच्या शिंगाना बेगड लावून त्यांना सजवतात. गुरांना दुपारी गोडधोड जेवण घालून दिवसभर त्यांना मोकळे सोडतात. संध्याकाळी त्यांची गावातून मिरवणूक काढतात. त्यानंतर नृत्यगायनाचा कार्यक्रमही केला जातो. (Social News)

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!

📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा

Related Articles

Akshaya Tritiya
लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला मीठ का खरेदी केली जाते?

आता लवकरच अक्षय्य तृतीयेचा सण येत आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला...

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!