Home लाईफ स्टाईल Christmas : ख्रिसमस अँथम असणाऱ्या ‘जिंगल बेल्स’ गाण्याची इंटरेस्टिंग गोष्ट
लाईफ स्टाईल

Christmas : ख्रिसमस अँथम असणाऱ्या ‘जिंगल बेल्स’ गाण्याची इंटरेस्टिंग गोष्ट

0

आज संपूर्ण जगभरात ख्रिसमसचा सण मोठ्या जल्लोषात आणि आनंदात साजरा होत आहे. ख्रिश्चन धर्मियांचा मोठा सण म्हणून ख्रिसमसला ओळखले जाते. येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून ख्रिसमसचा सण साजरा करण्याची परंपरा आहे. दरवर्षी २५ डिसेंबरला ख्रिसमस साजरा केला जातो. ख्रिसमस म्हटले की, अनेक गोष्टी आपल्याला आठवतात. जसे की सांताक्लॉज, भरपूर गिफ्ट्स, ख्रिसमस ट्री आणि मुख्य म्हणजे ख्रिसमसचे गाणे ‘जिंगल बेल्स’. आपण कधीही हे गाणे ऐकले की सर्वात आधी डोक्यात ख्रिसमसच येते. कारण हे गाणे ख्रिसमसचे अँथम सॉन्ग म्हणून ओळखले जाते. मात्र या गाण्याचा इतिहास तुम्हाला माहित आहे का? हे गाणे कोणी लिहिले?, कसे ते ख्रिसमसशी जोडले गेले? आज ख्रिसमसच्या निमित्ताने आपण याच गाण्याबद्दल रंजक माहिती जाणून घेऊया. (Christmas)

पांढरी बर्फाळ दाढी, जाड चष्मा आणि लाल-पांढरे कपडे घातलेल्या सांताक्लॉज पाहून लहान मुलं काय आणि मोठे काय सर्वच आनंदाने नाचू लागतात. ख्रिसमससाठी जेवढ्या पार्ट्या होतात त्या सर्व पार्ट्यांमध्ये जिंगल बेल्स हे गाणे वाजतेच वाजते. ख्रिसमस सणाच्या निमित्ताने जिंगल बेल्स हे गाणे अनेकदा ऐकायला मिळते. खासकरून सांताक्लॉजसाठी हे गाणे खूप जास्त वापरले जाते. जिंगल बेल्स हे गाणे ख्रिसमसचे अँथम सॉन्ग आणि या सणाची ओळख आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. (jingle bells song)

तुम्हाला एकूण नक्कीच आश्चर्य वाटेल की, ख्रिसमसच्या दिवशी सगळीकडे वाजणाऱ्या ‘जिंगल बेल्स’ या गाण्याचा आणि ख्रिसमसचा काहीही संबंध नाहीये. जिंगल बेल्स हे थँक्स गिव्हिंग गाणे आहे, जे १८५० मध्ये जेम्स पियरपॉन्ट नावाच्या संगीत दिग्दर्शकाने लिहिले होते. त्यानंतर १८५७ मध्ये पहिल्यांदा सामान्य प्रेक्षकांसमोर जिंगल बेल्स हे गाणं गाण्यात आले होते. जेम्स पिअरपॉन्टने या गाण्याचे नाव ‘वन हॉर्स ओपन स्लेघ’ असे ठेवले होते. त्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये हे गाणं याच नावाने प्रसिद्ध झाले. मात्र १८९० पासून पुढे नाताळ सणाच्या दिवशी सगळीकडे लावले जाते. (Latest Marathi Headline)

Christmas

पियरपॉइंटने हे गाणे १८५० मध्ये मेडफोर्ड, मॅसॅच्युसेट्स येथे लिहिले होते असे मानले जाते. जिथे त्याने ते एका मधुशाळेत बसून रचले होते. आता या ठिकाणी एक चष्म्याचे दुकान आहे, ज्याच्या भिंतीवर ‘जिंगल बेल्स कम्पोज्ड हिअर’ असे लिहिलेला एक फलक आहे. पण ही गोष्ट इथेच संपत नाही तर, पियरपॉइंट पुढे जॉर्जिया देशातील सवाना येथे शिफ्ट झाला. तिथे एका चर्चच्या बाहेर असलेल्या फलकावर दावा करण्यात आला होता की हे गाणे तिथे लिहिले गेले आहे. एवढेच नाही तर २०१७ मध्ये, थिएटर इतिहासकार कियाना हॅमिल यांनी त्यांच्या संशोधनात सांगितले की, त्यावेळी पियरपॉइंट कॅलिफोर्नियामध्ये होता आणि गोल्ड रशमध्ये काम करत होता. (Top Marathi News)

जिंगल बेल्स या शब्दाचा विशेष असा काही अर्थ नाही. मात्र हळूहळू जेव्हा जेम्स पिअरपॉंटचे हे गाणे हळूहळू ख्रिसमस पार्टीची रंगत अधिकच वाढवू लागले आणि गाण्यात ख्रिसमसचा उल्लेख नसतानाही, या गाण्याशिवाय ख्रिसमस सेलिब्रेशन अपूर्ण वाटू लागले तेव्हा त्याचे नाव ‘वन हॉर्स ओपन स्लीह’ बदलून ‘जिंगल बेल्स’ करण्यात आले. प्रत्यक्षाच सांताक्लॉजच्या हातातील घंटा त्याच्या आगमनाची माहिती देते, म्हणूनच हे गाणे ख्रिसमसशी संबंधित असल्याने त्याला जिंगल बेल्स असे नाव दिले गेले. आज जिंगल बेल गाण्याचे अनेक व्हर्जन तयार झाले आहेत. तसेच, या गाण्याचे विविध व्हर्जन हॉलीवूड आणि बॉलीवूड चित्रपटांमध्ये अनेकदा वापरले गेले आहेत. जिंगल बेल्स या गाण्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, अंतराळात वाजवले जाणारे पहिले गाणे जिंगल बेल्स हे होते, असे सांगितले जाते. १६ डिसेंबर १९६५ रोजी नासाच्या जेमिनी ६ ए अंतराळ उड्डाणादरम्यान अंतराळात खेळवली गेली. (Top Trending Headline)

=======

Santa Claus : ख्रिसमसच्या दिवशी लहान मुलांमध्ये गिफ्ट्स वाटणारा सांताक्लॉज नेमका आहे तरी कोण?

SantaClaus : ख्रिसमसच्या दिवशी सांताक्लॉज लाल रंगाचेच कपडे का घालतो?

=======

जिंगल बेल्स गाण्याचे शब्द
डैशिंग थ्रू द स्नो
इन अ वन हॉर्सओपन स्लेई,
ओ द फ़ील्ड्स वी गो
लाफिंग आल दा वे
बैल्स ओन बॉब टेल्स रिंग
मेकिंग स्पिरिट्स ब्राइट
वट फन इट इस टू लाफ एंड सिंग
अ स्लायिंग सोंग टूनाईट
ओ, जिंगल बैल्स, जिंगल बैल्स
जिंगल आल दा वे
ओ वट फन इट इस टू राइड
इन अ वन हॉर्सओपन स्लेई
ओ, जिंगल बैल्स, जिंगल बैल्स
जिंगल आल दा वे
ओ वट फन इट इस टू राइड
इन अ वन हॉर्सओपन स्लेई (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

लाईफ स्टाईल

Vallabhacharya : वल्लभाचार्य जयंती – कोण होते कृष्णभक्त वल्लभाचार्य?

आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अकरावी तिथी अर्थात. आज चैत्र महिन्यातील एकादशीचा...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!