Home आरोग्य Health : पूजेमध्ये वापरल्या जाणाऱ्या भीमसेनी कापराचे आहेत इतरही अनेक फायदे
आरोग्य

Health : पूजेमध्ये वापरल्या जाणाऱ्या भीमसेनी कापराचे आहेत इतरही अनेक फायदे

0

सगळ्यांच्याच घरात दररोज किंवा सणावाराला देवासमोर कापूर जाळला जातो. देवाची आरती करून झाली की आपण घरात कापूर जाळतो. अनेक घरांमध्ये दररोज संध्याकाळी कापूर जाळून घरभर तो फिरवतात. साधारणत: आपण दोन प्रकारचे कापूर पाहिले असतील. एक कापूर पूजेमध्ये वापरला जातो आणि दुसरा कपड्यांत. पूजेमध्ये वापरला जाणार कापूर नैसर्गिक आहे, त्याला भीमसेनी कापूर म्हणतात. तर कपड्यांमध्ये ठेवलेला कापूर कृत्रिम आहे, जो अनेक प्रकारच्या रसायनांपासून बनवला जातो. यातला भीमसेनी कापूर हा नैसर्गिक आणि शुद्ध स्वरूपातील कापूर असून, तो आरोग्यदायी, औषधी आणि धार्मिक कारणांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. या कापूरचा वापर करून अनेक आरोग्यदायी फायदे मिळवू शकतो. (Health)

भीमसेनी कापूर हे चमत्कारीक आयुर्वेदिक औषध असून सर्दी, खोकला, त्वचारोग, सांधेदुखी आणि झोपेच्या समस्यांवर त्वरित आराम देते. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणात वापर केल्यास पचनशक्ती वाढवून शरीर बळकट करते. भीमसेनी कापूर एक चमत्कारी आयुर्वेदिक औषधी आहे. हे अनेक रोगांमध्ये आराम देते. भीमसेनी कापूर वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते आणि सर्दी, खोकला आणि फ्लू सारख्या समस्यांमध्ये त्वरित आराम देते. त्वचेच्या संसर्गामध्येही ते त्वरित आराम देते. (Marathi)

भीमसेनी कापराच्या वापराने बुरशीजन्य संसर्गात त्वरित आराम मिळतो. ते पचनशक्ती वाढवण्यासोबतच शरीराला बळकट करण्याचे काम करते. डोकेदुखी झाल्यास कापूर, सुंठ, अर्जुनाची साल आणि पांढरे चंदन समान प्रमाणात वाटून त्याची पेस्ट बनवा. हे पेस्ट डोकेदुखीसाठी खूप फायदेशीर ठरते. कापूरमध्ये अँटी-बॅक्टेरियाल गुणधर्म असतात. या गुणधर्मामुळे ते केवळ पुळ्यांवरच नियंत्रण ठेवत नाही तर, ते बरे करण्यासही उपयुक्त ठरतात. गरम पाण्यात कापूर घालून वाफ घेतल्यास सर्दी आणि तापामध्ये खूप आराम मिळतो. (Todays Marathi Headline)

Health

कापूर डोळ्यांच्या समस्येमध्ये देखील मोठा आराम प्रदान करतो. यासाठी वडाच्या झाडातून निघणाऱ्या दूध सदृश्य द्रवात कापूर मिसळून डोळ्यांमध्ये काजळाप्रमाणे लावल्यास डोळ्याच्या समस्यांपासून मुक्ती मिळते. तारुण्यात प्रवेश करताना चेहऱ्यावर खूप मुरुम येतात. बर्‍याच लोकांसाठी ही मुरुम खूप त्रासदायक ठरतात. या मुरुमांवर कापूर तेल लावल्याने खूप फायदा होतो. हे मुरुमांच्या पुनरावृत्तीस प्रतिबंध करते. कापूरमध्ये अँटी-बॅक्टेरियाल गुणधर्म असतात. या गुणधर्मामुळे ते केवळ पुळ्यांवरच नियंत्रण ठेवत नाही तर, ते बरे करण्यासही उपयुक्त ठरतात. (Latest Marathi HEadline)

मुरुमांमुळे किंवा इतर पुळ्यांमुळे चेहऱ्यावर बर्‍याच वेळा दाग येतात. अशा परिस्थितीत नारळाच्या तेलात कापूर मिसळून चेहऱ्यावर लावल्यास डाग दूर होतात. यासह, हे चेहऱ्यावरील कोरडी त्वचा कमी करण्यास देखील मदत करतो. प्रदूषण आणि इतर कारणांमुळे सध्या बहुतेक लोकांचे केस गळतात आणि केसांमध्ये कोंडा निर्माण होतो. नारळाच्या तेलात मिसळून कापूर केसांमध्ये लावल्याने डोक्यातील कोंडा आणि केस गळतीपासून आराम मिळतो. खोकला झाल्यास मोहरी किंवा तीळ तेलात कापूर मिसळा आणि थोडा वेळ मिश्रण तसेच ठेवा. मग, या तेलाने पाठीवर आणि छातीवर हलक्या हाताने मसाज करा, हे खूप फायदेशीर ठरेल. (Top Trending News)

तोंडाच्या दुर्गंधीसाठीही कापूर उपयुक्त मानला जातो. कापूर व्यवस्थित श्वासावाटे आत घेतल्याने तोंडाला घाण वास येत असल्यास निघून जातो. मूठभर कापूर थोडासा तव्यावर तापवून ते एका रुमालात बांधून त्याचा शेक गळ्याला दिल्यास घसा बसला असेल तर बरा होतो. दाढ जास्त दुखत असल्यास कापराचा लहानसा खडा किडलेल्या दातात ठेवावा. तो आपोआप विरघळतो आणि आराम मिळतो. लाळ पोटात गेल्यास काही अपाय नाही. कापराच्या सुगंधाने जिवाणू, विषाणू, लहान कीटक नष्ट होतात. त्यामुळे वातावरण शुद्ध राहते व आजार दूर राहतात. तिळाच्या तेलात कापूर एकत्र करून ते तेल सांध्यांना लावावे. तिळाच्या तेलाच्या उग्र वासाचा त्रास होत नाही. कापूर खोबरेल तेलात एकत्र करून ते तेल केसांच्या मुळाला लावावे. दुसऱया दिवशी केस स्वच्छ धुवावेत. कोंडा कमी होतो. (Top Stories)

========

Health : ग्लुटेन फ्री डाएट म्हणजे काय? काय आहे या डाएटचे फायदे?

========

या भीमसेनी कापूरचे इतर देखील अनेक फायदे आहेत. जसे की, कपाटात किंवा कपडे ठेवता अशा ठिकाणी कापूर ठेवावा. त्याने कपड्यांना कुबट वास येत नाही. घरात डास जास्त असल्यास रात्री आपल्या सभोवती कापूर ठेवा, डास फिरकत नाहीत. मात्र असे असले तरी कापूर अति जाळू नये. कारण अति धुराने डोळे झोंबतात, डोळ्यांना त्रास होऊ शकतो. (Social News)

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. कोणतेही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Blood Pressure 
आरोग्य

Health : स्मरणशक्ती शार्प ठेवण्यासाठी आजच आहारात करा ‘हे’ बदल

आपण दैनंदिन जीवनात करत असलेल्या प्रत्येक लहान सहान गोष्टीचा चांगला, वाईट परिणाम...

Potato
आरोग्य

Potato : खरंच बटाटा खाल्ल्याने वजन वाढते का?

आपल्या भारतीय घरांमध्ये स्वयंपाक घराचा राजा कोण असे विचारल्यावर सर्वच लोकांचे एकच...

Pooja Bhatt Relationships
आरोग्य

Dental Care : मोत्यासारखे पांढरेशुभ्र दात पाहिजे, मग आजच ‘हे’ उपाय करा

असे अनेकदा म्हटले जाते की दातांची ट्रीटमेंट ही सर्वात खर्चिक असते. त्यामुळे...

आरोग्य

Joints Sound : हाडांमधून येणाऱ्या कटकट आवाजाचे कारण आणि त्यावर उपाय

अनेकदा आपल्या लक्षात येते की, आपण खाली बसतो, उठतो तेव्हा आपल्या हाडांमधून...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!