Home सामाजिक Kiradu Temples Rajasthan : किराडू मंदिराचे रहस्य
सामाजिक

Kiradu Temples Rajasthan : किराडू मंदिराचे रहस्य

0

भारतातील अनेक मंदिरे त्यांच्या स्थापत्यकलेसाठी आणि रहस्यासाठी ओळखली जातात. यापैकी प्रमुख मंदिरांमध्ये राजस्थानमधील किराडू मंदिराचा समावेश होतो. या मंदिरामध्ये संध्याकाळनंतर राहिल्यास मनुष्य दगड होतो, असे सांगितले जाते. यामागे एका ऋषींचा शाप असल्याची कथा प्रचलित आहे. या कथेची भीती एवढी आहे की, किराडू मंदिरात सायंकाळी पाच नंतर कोणीही थांबत नाही. इतकेच नव्हे तर मंदिराच्या परिसरात सायंकाळनंतर पशू-पक्षीही राहत नाहीत, त्यामुळे मंदिराबाबतचे रहस्य अधिक गडद झाले आहे. किराडू मंदिर राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात आहे. या रहस्यमय मंदिराची वास्तुकला दक्षिण भारतीय शैलीतील असून मंदिरातील नक्षीकाम पाहण्यासाठी आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी अनेक वास्तुतज्ञ येथे येतात. किराडू मंदिर परिसरात पाच प्रमुख मंदिरे आहेत. त्यातील एक मंदिर भगवान विष्णूला समर्पित असून उर्वरित चार मंदिरे भगवान शंकराला समर्पित आहेत. ( Kiradu Temples Rajasthan )

राजस्थानमधील किराडू मंदिर त्याच्या वास्तुकलेसाठी आणि रहस्यासाठी प्रसिद्ध आहे. बाडमेरच्या वाळवंटात असलेल्या या मंदिराला एका ऋषींचा शाप लागल्याची कथा सांगितली जाते. हजारो वर्षांपूर्वी लागलेल्या या शापाची भीती आजही मंदिरात जाणाऱ्या भाविकांच्या मनात आहे. त्यामुळे सायंकाळी पाच नंतर हे मंदिर ओस पडते. प्राणी-पक्षीही या मंदिरापासून दूर जातात. हे मंदिर म्हणजे पाच मंदिरांचा समूह आहे. त्यापैकी एक मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे आणि इतर चार मंदिरे महादेवाला समर्पित आहेत. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ते संपूर्ण दक्षिण भारतीय शैलीत बांधले गेले आहे. या भागात अन्यही काही मंदिरे आहेत, परंतु किराडू मंदिराची वास्तुकला वेगळी असल्यामुळे त्याबाबतचे रहस्य अधिक वाढले आहे. हे मंदिर वास्तुशास्त्राच्या अभ्यासकांसाठी मोठा खजिना मानले जाते. किराडू मंदिराचे सौंदर्य अलौकिक आहे. पाच मंदिरांच्या या समूहातील प्रत्येक भिंतीवरील नक्षीकाम आश्चर्यकारक मानले जाते, कारण त्यामध्ये अत्यंत सूक्ष्म आणि बारीक काम केलेले आहे. मुख्य मंदिर भगवान शंकराला समर्पित असून त्याला सोमेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते. सोमेश्वर मंदिर जागृत मंदिर म्हणूनही परिचित आहे. या शिवमंदिरात दर सोमवारी भाविक मोठ्या संख्येने येतात. महाशिवरात्रीला तर येथे हजारो भाविक उपस्थित असतात. मात्र मंदिरात जाण्याचे नियम पाहता, पहाटे मंदिर खुले केले जाते आणि सायंकाळी पाच वाजता दरवाजे बंद केले जातात.

किराडू मंदिर परिसरातील अन्य चार मंदिरे भगवान विष्णूला समर्पित आहेत. येथे एकादशी आणि कृष्ण जन्माष्टमीला भाविकांची मोठी गर्दी होते. मात्र या मंदिरांतील उत्सवांमध्येही भाविक पहाटे येतात आणि सायंकाळी पाच वाजता मंदिरे रिकामी केली जातात. या सर्व मंदिरांतील अनेक मूर्ती तुटलेल्या अवस्थेत आहेत. मुघल शासकांनी या मंदिरांना मोठी हानी पोहोचवल्याची माहिती आहे. या मंदिरांना एका ऋषीचा शाप असल्याची कथा सांगितली जाते. कथेनुसार, काही वर्षांपूर्वी एक तपस्वी ऋषी आपल्या शिष्यांसह या मंदिरसमूहात आले. त्यांनी येथे काही दिवस ध्यानधारणा आणि तप करण्यासाठी मुक्काम केला. एके दिवशी त्यांच्या एका शिष्याची प्रकृती बिघडली. यावेळी इतर शिष्यांनी गावात मदत मागितली, परंतु गावकऱ्यांनी मदत केली नाही. मात्र एका कुंभार महिलेनं त्या शिष्याची काळजी घेतली. ऋषी मंदिरात परत आल्यानंतर त्यांना त्यांच्या शिष्याच्या प्रकृतीबाबत माहिती मिळाली. ( Kiradu Temples Rajasthan )

=======

हे देखील वाचा : Nishkalank Mahadev Temple: निष्कलंक महादेव आणि पांडव

=======

गावकऱ्यांनी मदत केली नाही यामुळे ते संतप्त झाले. त्यांनी शाप दिला की, जिथे मानवता नाही, तिथे लोकांनीही राहू नये. त्यानंतर गावातील लोक दगड झाले, अशी कथा सांगितली जाते. ज्या कुंभार महिलेनं शिष्याला मदत केली होती, तिला मात्र ऋषींनी मागे वळून न पाहता गावातून बाहेर पडण्याचा सल्ला दिला. मात्र ती महिला घाबरली आणि चालताना मागे वळून पाहिले. तेव्हा तिचाही दगडाचा पुतळा झाल्याचे सांगितले जाते. तेव्हापासून या मंदिरात सायंकाळी कोणीही थांबत नाही.

किराडू मंदिर परमार राजवंशाच्या शासकांनी बांधले आहे. आजही काही मूर्ती तुटलेल्या असल्या तरी इतर संरचना सुस्थितीत आहेत. रहस्यमय असलेल्या या मंदिराला जागृत मंदिर म्हणूनही मान्यता आहे. त्यामुळे पहाटेपासून सायंकाळी पाचपर्यंत पूजा करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येथे येतात. ( Kiradu Temples Rajasthan )

– सई बने

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Health Care
सामाजिक

Chardham Yatra : चारधाम यात्रेची तयारी सुरू

उत्तराखंडची चारधाम यात्रा १९ एप्रिल रोजी सुरू होणार आहे. अक्षय तृतीयेचा मुहूर्त...

सामाजिक

Yamunotri Dham : यमुनोत्री धामची रहस्ये

उत्तराखंड राज्यातील चारधाम यात्रेचे हिंदू धर्मात मोठे महत्त्व आहे. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ...

सामाजिक

Narmadeshwar Mahadev Temple : रंग बदलणारे शिवलिंग

उत्तर प्रदेशामध्ये भगवान शंकराची अनेक मंदिरे आहेत. या मंदिरांच्या स्थापनेमागे पौराणिक कथा...

सामाजिक

Chilkur Balaji Temple : अनोखे व्हिसा मंदिर

प्रभू श्रीरामांचे परमभक्त असलेल्या महाबली हनुमानांचा जन्मोत्सव २ एप्रिल रोजी साजरा होणार...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!