आता तर सर्वच लोकांची एकच समस्या आहे, आणि ती म्हणजे दिवसेंदिवस वाढणारे ऊन. मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा सुरु झाला असून, उन्हाच्या झळा अगदी मे महिना असल्यासारख्या जाणवत आहे. या वाढणाऱ्या उन्हामुळे घाम येण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये तर दमट वातावरणामुळे वर्षभर कमी अधिक प्रमाणात घाम येत असतो. उन्हाळ्यात तर या घाम येण्याचे प्रमाण कमालीचे वाढते. घाम म्हणजे काय तर आपल्या शरीरातील क्षार. घामाद्वारे शरीरातील क्षार बाहेर पडतात. त्यामुळे उन्हाळ्यात तर बहुतकरून घामामुळे अंगावरील कपड्यांना पांढरे डाग पडतात.
मुंबईतर कपड्यांना घामाचे डाग पडणे ही सामान्य समस्याच वाटू लागली आहे. मात्र हे डाग कपडे धुऊन देखील निघत नाही. घामाचे डाग हे हट्टी डाग असल्याने ते सहजा सहजी निघत नाही. घामाचे डाग कपड्यांवर तसेच टिकून राहतात. यामुळे कपडे पिवळे पांढरे पडतात. कपड्यांना घामाचा वास येऊ लागतो.पण काहीवेळा कपडे व्यवस्थित घुतल्यानंतर सुद्धा हा घामाचा वास आणि डाग निघून जात नाही. यावर आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे घामामुळे कपड्यांवर असलेले घामाचे डाग लगेच निघून जातील. (Sweat Stain)
लिंबाचा वापर
बाजारात अशी अनेक उत्पादने उपलब्ध आहेत जी घामाचे डाग सहजपणे काढून टाकतात आणि त्यात लिंबाचा वापर केला जातो. डाग घालवण्यासाठी लिंबाला देसी जुगाड देखील म्हणतात. लिंबू केवळ डागच नाही तर कपड्यांमधला घामाचा वासही दूर करतो. अनेक डिटर्जंट किंवा इतर गोष्टींमध्ये लिंबाचाही समावेश होतो. घाण दूर करण्यासोबतच कपड्यांमधील सुगंधही टिकून राहतो. (Top Marathi NEws)
कॉर्न स्टार्च
कॉर्न स्टार्चचा वापर करून तुम्ही कपड्यांवरील डाग काढू शकता. यासाठी एका वाटीमध्ये कॉर्न स्टार्च घेऊन त्यात थोडेसे पाणी मिक्स करा. जाडसर पेस्ट केल्यानंतर डाग पडलेल्या ठिकाणी ही पेस्ट लावून कपडे स्वच्छ धुवून घ्या. कॉर्न स्टार्च कपड्यांमधील तेल खेचून घेऊन डागांचा थर काढून टाकतो. (Todays Marathi Headline)

बेकिंग सोडा
घामाचे डाग घालवण्यासाठी तुम्ही बेकिंग सोड्याचीही मदत घेऊ शकता. त्यात असे गुणधर्म असता , ज्यामुळे घामाचे डाग आणि दुर्गंध क्षणार्धात नाहीसे होऊ शकतात. जर डाग खूप चिवट असतील तर त्यावर बेकिंग सोड्याची पेस्ट लावून चांगली चोळा. थोड्या वेळाने ते पाण्याने स्वच्छ धुवून टाका. (Latest Marathi Headline)
अॅस्पिरिन
अॅस्पिरिनमध्ये सॅलिसिलिक अॅसिड असते जे डाग काढून टाकण्यास उपयुक्त ठरते. यासाठी 2-3 अॅस्पिरिन गोळ्या बारीक करून पावडर बनवा. ही पावडर थोड्या पाण्यात मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट पिवळ्या डागावर लावा आणि काही तास तसेच राहू द्या. त्यानंतर कपडे धुवा.
व्हाईट व्हिनेगर
कपड्यांवरील घामाचे डाग काढण्यासाठी तुम्ही व्हाईट व्हिनेगरचीही मदत घेऊ शकता. यासाठी थोडे कोमट पाणी घ्या आणि त्यात थोडे पांढरे व्हिनेगर घाला. कापड थोडा वेळ भिजत ठेवा आणि नंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. (Top Stories)
=========
Skin Care : हायपरपिग्मेंटेशनपासून सुटका हवी? घरच्याघरी करा हे 5 सोपे उपाय
Skin Care : फेसमास्क लावताना करू नका या 5 चुका; अन्यथा त्वचेचे होईल मोठे नुकसान
=========
हायड्रोजन पेरोक्साइड
जर तुमच्याकडे हायड्रोजन पेरोक्साइड असेल तर ते पाण्यात मिसळा आणि डागावर लावा. हे उपाय विशेषतः पांढऱ्या किंवा हलक्या रंगाच्या कपड्यांसाठी प्रभावी आहेत.
बर्फ
जर डाग नवीन असेल तर त्यावर बर्फाचा तुकडा घासून घ्या. यामुळे डाग हलका होईल आणि नंतर धुतल्यावर तो सहज निघून जाईल.
साबण
बाजारात असे अनेक डिटर्जंट्स उपलब्ध आहेत जे घामाचे डाग सहज काढून टाकण्यासाठी प्रभावी आहेत. प्रथम डाग असलेले कापड हे डिटर्जंट असलेल्या पाण्यात भिजवा. थोड्या वेळाने कापड बाहेर काढा आणि त्यावर लिक्विड डिटर्जंट लावा आणि थोडावेळ असेच राहू द्या. नंतर ते मशीन मध्ये टाका किंवा किंवा हाताने स्वच्छ धुवा. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics