Home आरोग्य Hair Care : ‘हे’ उपाय करून मिळवा कोरड्या केसांपासून सुटका
आरोग्य

Hair Care : ‘हे’ उपाय करून मिळवा कोरड्या केसांपासून सुटका

0

सगळ्यांना हवाहवासा वाटणारा हिवाळा सुरु झाला आहे. मात्र या हिवाळ्याचे अनेक दुष्परिणाम आपल्या त्वचेवर आणि आरोग्यावर होताना दिसतात. हिवाळ्यात कोरडे वारे वाहत असल्याने आपली त्वचा आणि केस रुक्ष होतात. हिवाळ्यामध्ये आपल्या त्वचेप्रमाणेच केसांच्याही आरोग्यावर परिणाम होतात. बदलत्या वातावरणामुळे केस निर्जीव, कोरडे होऊ लागतात. हिवाळा सुरु झाला की थंड वारे वाहू लागतात त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्या त्वचेसोबतच केसांची देखील देखभाल करणे मह्त्वाचे असते. (Hair Care)

हिवाळ्यात वातावरणात थंडावा असल्याने केसांमध्ये कोंड्याची समस्या उद्भवते आणि केस कोरडे होतात. त्यामुळे या वेळी केसांची अतिरिक्त काळजी घेण्याची गरज असते. यामुळे केस कमकुवत होतात आणि तुटू लागतात. रेशमी, मऊ केस आपले सौंदर्य अधिकच खुलवतात. त्यामुळे प्रत्येकालाच सिल्की आणि चमकदार केस पाहिजे असतात. यासाठी सर्वजण अनेक उपाय करत असतात. महागड्या ट्रीटमेंट देखील अपेक्षित परिणाम दाखवू शकत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुमचे केस कोरडे आणि रुक्ष होण्यापासून वाचवू शकता. (Dry Hair)

तेलाने मसाज करावा
हिवाळ्यात केस कोरडे पडू नये म्हणून आठवड्यातून २ वेळा केसांना तेलाने मसाज करा. त्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीचे खोबरेल तेल, जोजोबा ऑईल, बदाम तेल, आवळा तेल असे कोणतेही तेल वापरु शकता. हे तेल थोडे कोमट करुन मग त्याने मसाज करावा. आवश्यकता वाटल्यास तुम्ही तेलामध्ये कांद्याचा रस घालू शकता. त्यामुळे केसांना चांगले पोषण मिळण्यास मदत होते. (hair Care in Winter)

केस धुण्यासाठी दही वापरा
रेशमी केसांसाठी शॅम्पू करण्यापूर्वी केसांना दही लावा आणि काही वेळाने केस धुवा. कारण केसांना दही लावून ठेवल्याने दह्यामध्ये असलेले लॅक्टिक अॅसिड आणि प्रथिने केसांना खोलवर स्वच्छ करतात आणि पोषण देतात. हे ओलावा टिकवून ठेवते आणि केसांना चमकदार आणि मऊ बनवते. तुम्ही सुद्धा या नैसर्गिक उपायांचा अवलंब करून तुम्ही तुमचे निर्जीव केस चमकदार आणि सुंदर बनवू शकता.

कोरफड जेल लावा
कोरफड जेल केसांना लावल्यामुळे केस गळती थांबते, केस दाट आणि मजबूत होतात. कोरफडीचा रस केसांना लावल्यामुळे केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा कोमट खोबरेल तेलात कोरफडीचा रस घालून केसांच्या मुळांना आणि केसांना लावल्याने केस सिल्की होतात. (Todays Marathi Headline)

Hair Care

बाहेर जाताना केस झाका
हिवाळ्यात केसांचे संरक्षण करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ते टोपी किंवा स्कार्फने झाकणे. हे केसांना थंड वाऱ्यापासून वाचवते आणि त्यात आर्द्रता राखते. (Marathi News)

​हेअर पॅक लावा
थंडीच्या वातावरणात हेअर पॅक लावणं अतिशय आवश्यक आहे. यामुळे केसांना खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो. केसांमधील नैसर्गिक ओलावा टिकून राहण्यासही मदत मिळते. आपल्या घरामध्ये काही नैसर्गिक सामग्री सहजरित्या आढळतात. यापासून तुम्ही हेअर पॅक तयार करू शकता. नैसर्गिक हेअर पॅकमुळे टाळूची त्वचा निरोगी राहते आणि केसांना मॉइश्चराइझर देखील मिळते. याव्यतिरिक्त तुम्ही कोरफड आणि आयुर्वेदिक तेलापासून तयार केलेल्या हेअर मास्कचाही वापर करू शकता. (Marathi News)

केस जास्त धुवू नका
हिवाळ्यात केसांना जास्त शॅम्पू केल्याने टाळूचे नैसर्गिक तेल कमी होते, ज्यामुळे कोरडेपणा वाढू शकतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच केस धुवा. या काळात गरम पाणी वापरू नका. (Marathi Trending Headline)

केसांना कंडिशनिंग करा
थंड हवा केसांचा ओलावा काढून टाकू शकते, ज्यामुळे ते कोरडे आणि कमकुवत बनतात. नियमित कंडिशनिंग केल्याने केस मजबूत होतात, ज्यामुळे  केस तुटण्याची शक्यता कमी होते. (Top Marathi News)

ग्रीन टीने केस धुवा
केसांना शाम्पू केल्यानंतर ग्रीन टीने केस धुणे हा एक उत्तम उपाय आहे. गरम पाण्यात ग्रीन टी बॅग घाला, ती थंड होऊ द्या आणि केस धुण्यासाठी वापरा. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स केसांची ओलावा टिकवून ठेवतात आणि केसांची फ्रिजीपणा कमी करतात, ज्यामुळे केस चमकदार दिसतात. (Latest Marathi Headline)

अंड्याचे हेअर मास्क लावा 
अंडी, मध आणि दहीपासून बनवलेला हेअर मास्क केसांना चमक आणण्यासाठी खूप फायदेशीर आहे. ते केसांवर 30 मिनिटे ठेवा आणि नंतर धुवा. अंड्यांमध्ये असलेले प्रथिने आणि पोषक घटक केसांना खोलवर पोषण देतात आणि त्यांना चमक देतात. (Top Trending News)

=======

Blood Sugar : अचानक कमी होणारे शुगर लेवल कोणत्या आजाराचे संकेत? तज्ज्ञांचे महत्त्वाचे इशारे

Health Care : व्यायाम केल्याने लवकर वजन कमी होते असे मानता? आधी वाचा या गोष्टी                                

=======

हीट स्टाइलिंग मर्यादित करा
स्ट्रेटनर किंवा ब्लो ड्रायर सारख्या गरम साधनांचा जास्त वापर टाळा. यामुळे कोरडेपणा आणि केस तुटणे कमी होऊ शकते. जर तुम्हाला ते वापरायचे असतील तर, हीट प्रोटेक्टंट लावा. वास्तविक, ते केसांसाठी मॉइश्चरायझर म्हणून काम करतात, ज्यामुळे स्ट्रेटनर किंवा ब्लो ड्रायरच्या उष्णतेने केस खराब होत नाहीत. (Top Stories)

सकस आहार घ्या आणि पुरेसे पाणी प्या
केस निरोगी ठेवण्यासाठी केवळ बाह्य काळजी पुरेशी नाही तर ती आतून मजबूत ठेवण्याचीही गरज आहे. यासाठी सुका मेवा, हिरव्या पालेभाज्या आणि व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सने युक्त हंगामी फळांचा आहारात समावेश करा. यासोबतच रोज किमान ८-१० ग्लास पाणी प्यावे, ज्यामुळे शरीर हायड्रेट राहते. निरोगी आहार आणि हायड्रेशनमुळे केस गळणे कमी होते आणि त्यांची वाढ होण्यासही मदत होते. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Blood Pressure 
आरोग्य

Health : स्मरणशक्ती शार्प ठेवण्यासाठी आजच आहारात करा ‘हे’ बदल

आपण दैनंदिन जीवनात करत असलेल्या प्रत्येक लहान सहान गोष्टीचा चांगला, वाईट परिणाम...

Potato
आरोग्य

Potato : खरंच बटाटा खाल्ल्याने वजन वाढते का?

आपल्या भारतीय घरांमध्ये स्वयंपाक घराचा राजा कोण असे विचारल्यावर सर्वच लोकांचे एकच...

Pooja Bhatt Relationships
आरोग्य

Dental Care : मोत्यासारखे पांढरेशुभ्र दात पाहिजे, मग आजच ‘हे’ उपाय करा

असे अनेकदा म्हटले जाते की दातांची ट्रीटमेंट ही सर्वात खर्चिक असते. त्यामुळे...

आरोग्य

Joints Sound : हाडांमधून येणाऱ्या कटकट आवाजाचे कारण आणि त्यावर उपाय

अनेकदा आपल्या लक्षात येते की, आपण खाली बसतो, उठतो तेव्हा आपल्या हाडांमधून...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!