Home लाईफ स्टाईल Recipe : होळीसाठी ‘या’ सोप्या पद्धतीने तयार करा पुरणपोळी आणि कटाची आमटी
लाईफ स्टाईल

Recipe : होळीसाठी ‘या’ सोप्या पद्धतीने तयार करा पुरणपोळी आणि कटाची आमटी

0
Vasubaras

‘होळी रे होळी पुरणाची पोळी’ होळीचा सण महाराष्ट्रात पुरणपोळीशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. होळीच्या दिवशी आपल्या सर्वांच्या घरात पुरणाची पोळी बनतोच बनते. महाराष्ट्रात होळीच्या दिवशी होळीला किंवा होळीच्या अग्नीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची पद्धत आहे. या दिवशी पुरणाची पोळी होळीच्या अग्नीमध्ये अर्पण केली जाते. त्यामुळे होळी आणि पुरणपोळी हे समीकरण खूपच जुने आणि प्रसिद्ध आहे. त्यामुळे यंदा देखील अनेकांना होळीच्या दिवशी परफेक्ट, मऊसूद पुरणपोळी करायची असेल त्यांच्यासाठी आम्ही सोपी रेसिपी घेऊन आलो आहोत. सोबतच कटाची आमटी असतेच असते. (Recipe)

पुरणपोळी
​महाराष्ट्रात विविध प्रकारे पुरणपोळी तयार केली जाते. सामान्यपणे पुरणपोळीची जी रेसिपी सर्वत्र केली जाते. तीच आपण रेसिपी आज जाणून घेऊया. ही रेसिपी फॉलो करून जे पहिल्यांदा पुरणपोळी करत असतील ते देखील परफेक्ट पुरणाची पोळी करतील.

साहित्य : १ कप चणा डाळ, १ कप किसलेला गूळ, एक कप मैदा, ७ ते ८ टे. स्पून तेल, १ टी स्पून वेलची पूड, मैदा पोळी लाटण्यासाठी

कृती :
एका कुकरमध्ये तुम्ही जितकी हरभराडाळ घ्याल त्याच्या अडीचपट पाणी त्यात घाला. अशाप्रकारे हरभरा डाळ पाण्यात नीट शिजवून घ्या. ही डाळ शिजल्यावर त्यातील पाणी निथळू द्यावे. या पाण्याचा वापर करून आमटी केली जाते. त्यानंतर, डाळ एका भांड्यात घ्या मग, त्यात किसलेला गूळ घाला. त्यानंतर हे डाळ-गुळाचे मिश्रण मध्यम आचेवर आटवा. हे मिश्रण आटवताना मंद आचेवर चांगले ढवळत रहा. जर तुम्ही हे मिश्रण नीट ढवळले नाही, तर ते करपण्याची शक्यता असते. या पुरणात तुम्ही एक चमचाभर वेलची पूड आवर्जून घाला. हे मिश्रण घट्ट झाले की गॅस बंद करा. नंतर, हे मिश्रण जरा गरम असताना पुरण यंत्रातून फिरवून घ्या. कारण, हे मिश्रण थंड झाल्यावर ते पुरण नीट वाटले जात नाही. यानंतर, गव्हाचे पीठ घेऊन त्यात, ५ ते ६ चमचे तेल आणि थोडीशी हळद मिसळावी. हे पीठ सैलसर मळून घ्यावे. भिजवलेले पीठ २ तास ठेवून द्या. त्यानंतर, पुरणाचे मध्यम प्रकारचे गोळे बनवून घ्या. त्याची पातळसर पारी बनवून घ्या. त्यात पुरणाचा गोळा भरावा. नंतर, हा पीठाचा गोळा सर्व बाजूंनी बंद करून घ्यावा. यानंतर पोळपाटावर थोडेसे गव्हाचे पीठ टाकून हलक्या हाताने पोळी लाटून घ्या. ही पोळी गरम तव्यावर खरपूस भाजून घ्या आणि त्यावर साजूक तूप घालून गरम गरम सर्व्ह करा. नंतर, या तयार पुरणपोळ्या तुम्ही गरम दूधासोबत किंवा गुळवणीसोबत खाऊ शकता. (Latest Marathi News)

Recipe

​कटाची आमटी
पुरणपोळी सोबत कटाची आमटी केली जाते. पुरणपोळी करताना चणाडाळ शिजवतो तेव्हा थोडे जास्त पाणी घालून डाळ शिजवा. पुरणासाठी पाणी वाडग्यात निथळून घेताना निथळलेले पाणी एक कप असेल तर त्यासोबत दीड कप शिजवलेली डाळ बाजूला काढा किंवा चणाडाळ कुकरमध्ये नेहमीप्रमाणे मऊसर शिजवून घ्या. खोबर्‍याचा किस, जिरे, मिरी, लवंगा, दालचिनी आणि तमालपत्र असे वेगवेगळे मंद आचेवर थोडावेळ भाजून घ्या. मसाले मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. शिजलेली चणाडाळ आणि पाणी व्यवस्थित घोटून घ्या. एका पातेल्यात तेल गरम करून, मोहरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, कढीपत्ता घालून मिश्रणाला चांगली फोडणी द्या. वरून गरजेनुसार पाणी घाला. आमटीला उकळी फुटली कि त्यात कुटलेला मसाला, गोडा मसाला घाला. मिश्रण ढवळून त्यात चिंचेचा कोळ आणि गुळ घाला. चवीपुरते मिठ टाका. वरून ओलं खोबरं आणि चिरलेली कोथिंबीर घालून एकदोन मिनिटे मंद आचेवर उकळू द्या. (Top Trending Headline)

गुजिया
​गॅसवर कढईत एक चमचा तूप टाका. त्यात खजूर, अंजीर टाकून परतून घ्या. त्यात पिठीसाखर, ड्रायफ्रुट पावडर टाकून मिश्रण एकजीव करा. गॅस बंद करा आणि वरून वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाका. मैदा, मीठ आणि तूप एकत्र करून पीठ चांगले मळून घ्या. पीठ मळण्यासाठी थंड पाण्याचा वापर करा. अर्धा तासाने या पीठाचे छोटे छोटे गोळे तयार करा त्याला आकार देऊन त्यात मिश्रण भरा. पुरीच्या दोन्ही कडांना पाण्याचा हात लावून त्यांना अर्धचंद्राकार आकाराने बंद करा. तेल तापवा आणि त्यात अर्धचंद्राकृती गुजिया तळून घ्या. गुजिया हा उत्तर भारतातील होळीचा स्पेशल पदार्थ आहे. (social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

लाईफ स्टाईल

Vallabhacharya : वल्लभाचार्य जयंती – कोण होते कृष्णभक्त वल्लभाचार्य?

आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अकरावी तिथी अर्थात. आज चैत्र महिन्यातील एकादशीचा...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!