Home आंतरराष्ट्रीय Hamida Soleimani : इराणच्या सौंदर्यवतीला अमेरिकेत का झाली अटक
आंतरराष्ट्रीय

Hamida Soleimani : इराणच्या सौंदर्यवतीला अमेरिकेत का झाली अटक

70

अमेरिका-इराण युद्धाचा शेवट दिसत नाही. या युद्धामध्ये दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण असतानाच इराणच्या एका सौंदर्यवतीला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. ही सौंदर्यवती दुसरी-तिसरी कोणीही नसून इराणी जनरलची भाची आहे. इराणमध्ये महिलांसाठी हिजाब सक्तीचा असताना इराणी जनरलची ही भाची अमेरिकेमध्ये तिच्या ग्लॅमरस कपड्यांमुळे ओळखली जात होती. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर, मॉडेलसारख्या दिसणाऱ्या या महिलेला अटक करून तिला इराणमध्ये परत पाठवण्याची तयारी सुरू झाली आहे. ही महिला इराणी लष्करी कमांडर कासिम सुलेमानी यांची भाची आहे. तिचे नाव हमीदा सोलेमानी असून तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. अमेरिकेत राहून हमीदा इराणच्या आयआरजीसीची पाठराखण करत होती, तसेच अमेरिकेचा उल्लेख सैतान असा करत होती. त्यामुळेच तिला तिच्या मुलीसह अटक झाली असून लवकरच हमीदाला इराणमध्ये पाठवण्यात येणार आहे. ( Hamida Soleimani )

अमेरिका आणि इराणच्या युद्धात हमीदा सोलेमानी हे नाव चर्चेत आले आहे. एकतर हमीदाचे सोशल मीडियावरील हॉट फोटो पाहून ही महिला खरोखरच इराणी आहे का, हा प्रश्न विचारला जाऊ लागला. शिवाय, तिने अमेरिकेचा उल्लेख सैतान असा केल्यावर अमेरिकेत राहून अमेरिकेलाच सैतान म्हणण्याचे धाडस हमीदाने कसे केले, हा प्रश्नही विचारला जाऊ लागला आहे. आता हमीदाला अटक झाली असली, तरी तिच्या कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे हमीदाबद्दल इराणमध्येही संताप व्यक्त होत आहे. कारण, हमीदा इराणचे सर्वोच्च कमांडर कासिम सुलेमानी यांची भाची आहे. अमेरिकेने कासिम सुलेमानी यांना २०२० मध्ये एका कारवाईत ठार केले होते. कासिम सुलेमानी हे इराणचे सर्वात शक्तिशाली लष्करी जनरल मानले जात होते. २०२० मध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ते मारले गेले. ते कुड्स फोर्सचे माजी कमांडर होते. त्यांनी इस्रायलविरुद्ध इराणचे हस्तक असलेल्या हुथी, हिजबुल्लाह आणि हमास यांना प्रशिक्षण दिले होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू इराणसाठी एक मोठा धक्का होता. त्यांच्याच ग्लॅमरस भाचीच्या फोटोमुळे अमेरिकेत खळबळ आणि इराणमध्ये संताप व्यक्त होत आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने कासिम सुलेमानी यांच्या या भाचीला अमेरिकेत अटक केल्याची माहिती दिली असून तिचे आणि तिच्या मुलीचे रहिवासी परवाने रद्द केल्याचीही माहिती आहे. हमीदा इराणी राजवटीचा प्रचार करत होती आणि अमेरिकेच्या कारवाईला उघडपणे विरोध करत होती. हमीदा स्वतः लॉस एंजेलिसमध्ये आलिशान जीवनशैलीचा आनंद घेत होती. लॉस एंजेलिसमध्ये अतिशय आलिशान हवेलीत राहत असलेली हमीदा अमेरिकी सैनिकांवरील इराणी हल्ल्यांचा आनंद साजरा करत होती. ( Hamida Soleimani )

या हमीदाकडे आलिशान गाड्यांचा ताफा आहे. तसेच तिने महागड्या जातीचे कुत्रेही पाळले होते. तसेच तिच्याकडे बंदुकांचाही मोठा साठा होता. या सर्वांचे अनेक व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत होती. याच हमीदाने अमेरिकी सैनिकांवरील इराणी हल्ल्यांचा आनंद साजरा केल्याचा व्हिडिओही शेअर केला आहे. शिवाय, नवीन इराणी सर्वोच्च नेत्याची प्रशंसा केली असून इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सला पाठिंबा व्यक्त केला आहे. या संघटनेला अमेरिकेने दहशतवादी संघटना घोषित केले आहे. त्यामुळे हमीदावर दुहेरी कारवाई होण्याची शक्यता आहे. हमीदा ४७ वर्षांची आहे. तिला अमेरिकेत २०१९ मध्ये आश्रय देण्यात आला आणि २०२१ मध्ये बायडेन प्रशासनाकडून तिला ग्रीन कार्ड मिळाले. तिची मुलगी २५ वर्षांची आहे. ती २०१५ मध्ये विद्यार्थी व्हिसावर अमेरिकेत आली आणि नंतर ग्रीन कार्डधारक बनली. या दोघी आई-मुलगी अमेरिकेत अत्यंत ऐषआरामाचे आणि निवांत जीवन जगत होत्या. खाजगी जेटने प्रवास करताना, यॉटवर सनबाथिंग करताना आणि संगीत महोत्सवांमध्ये नाचतानाचे त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आहेत. मायामी, अलास्का आणि लास वेगासमध्ये या दोघींनी भेट दिली तेव्हाचीही त्यांची छायाचित्रे आक्षेपार्ह अशाच कपड्यांतील आहेत.

=======

हे देखील वाचा : U.S. Mission : God is good या शब्दांनी वाचवले अमेरिकन पायलटचे प्राण

=======

त्यामुळेच हमीदाला अमेरिकेत अटक झाल्यावर इराणमध्ये तिच्याबद्दल सहानुभूती व्यक्त होण्याऐवजी संताप व्यक्त होऊ लागला आहे. कारण, इराणमध्ये महिलांसाठी हिजाब घालणे हा एक सामाजिक आणि कायदेशीर नियम आहे. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी नैतिकता पोलिसांची तैनाती केलेली आहे. हे पोलीस महिलांच्या कपड्यांची तपासणी करतात आणि नियमांचे पालन न केल्यास त्यांना चेतावणी, दंड, अटक किंवा मृत्यूदंडाची शिक्षा देतात. अशा देशातील उच्च अधिकाऱ्याच्या कुटुंबातील महिला अमेरिकेत बिकिनी आणि टू-पीस घालून मुक्तपणे फिरत आहेत, हे पाहून इराणमध्ये संताप व्यक्त होत आहे. ( Hamida Soleimani )

सई बने…

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Katrina Kaif
आंतरराष्ट्रीय

Jiang Xueqin : चीनच्या नॉस्ट्राडॅमसने सांगितले ट्रम्पचे भविष्य

अमेरिका-इराण युद्धामध्ये पंधरा दिवसांचा विराम आला आहे. यात चीनची भूमिका असल्याची माहिती...

Jewellery
आंतरराष्ट्रीय

Jared Kushner : ट्रम्पचा जावई आहे तरी कोण

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर कायमचा विराम आणण्यासाठी पाकिस्तानची राजधानी...

Mobile
आंतरराष्ट्रीय

First Lady Melania Trump : अमेरिकेच्या फर्स्ट लेडीसाठी शाही सवारी

इराणमध्ये सत्तांतर करण्याच्या हेतूने अमेरिकेने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरुद्ध लष्करी मोहीम...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!