आपल्या देशामध्ये कोणतेही खास दिवस हे गोडाशिवाय पूर्णच होत नाही. अगदी छोटे छोटे सेलिब्रेशन असो किंवा सणवार असो. जेवणामध्ये आणि देवाला नैवेद्यामध्ये गोड वाढलेच जाते. त्यात आपण पाहिले तर भारत हा देश विविध परंपरा आणि संस्कृतींनी नटलेला देश आहे. संपूर्ण देशामध्ये एकच सण अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. सणावाराला केले जाणारे पदार्थ देखील वेगळेच असतात. आता होळीचेच घ्या होळीला महाराष्ट्रामध्ये पुरणपोळी बनते तर उत्तर भारतामध्ये गुजिया अर्थात करंज्या बनतात. आपल्या देशामध्ये बऱ्यापैकी कोणत्या सणाला काय गोड बनवायचे हे ठरलेले आहे. याला गुढीपाडवा देखील अपवाद नाही. (Gudhipadwa)
गुढीपाडवा म्हणजे आपल्या हिंदू लोकांचे नवीन वर्ष. आता वर्षातला एवढा मोठा आणि महत्त्वाचा सण म्हटल्यावर यादिवशी गोड तर होतेच होते. गुढीपाडवा म्हटले की, लगेच डोळ्यासमोर येते श्रीखंड आणि पुरी. गुढीपाडवा आणि श्रीखंड पुरी हे समीकरण आहे. या दिवशी सर्व घरांमध्ये श्रीखंड पुरीचाच बेत असतो. यंदा १९ मार्च रोजी गुढीपाडवा साजरा होणार आहे. त्यामुळे आता तर घरांमध्ये नवीन वर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी देखील चालू झाली असेल. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का, की गुढीपाडव्याला श्रीखंड पुरी का बनवली जाते? (Marathi)
गुढीपाडव्याला प्रत्येक घरात श्रीखंड-पुरी दिसतेच. श्रीखंडा सोबत पुरी असेल तर जेवणाची लज्जत वाढून प्रत्येकाच्या तोंडातून केवळ वा वा वा….हेच शब्द निघतात. चवीला गोड आणि आंबट असणारे श्रीखंड म्हणजे लहान थोरांपासून सगळ्यांनाच आवडते. श्रीखंड हा खूप जुना पदार्थ आहे. श्रीखंडाचा उल्लेख हा महाभारतामध्ये सुद्धा आढळतो. अनेकांच्या मते श्रीखंडाचा उगमच महाभारताच्या काळात झाला असल्याचे सांगितले जाते. भीम जेव्हा बल्लव नामक आचाऱ्याच्या रुपात जगत होता, तेव्हा त्याने हा पदार्थ स्वत: सगळ्यात आधी तयार केला. हा पदार्थ भगवान श्रीकृष्णाने सेवन केला. पण झाले असे की हा पदार्थ खाताच भगवान श्रीकृष्णाला झोप आली. यामुळे श्रीकृष्णाच्या पुढील दिनचर्येत खंड पडला म्हणून श्रीखंड असे नाव या पदार्थाला पडले असे म्हटले जाते. (Todays Marathi HEadline)

गुढीपाडव्याचा सण हा चांगलाच उन्हाळ्यात येतो. या दिवसात उन्हाचा तडाखा खूपच वाढलेला असतो. या काळात वातावरणात असलेल्या उष्णतेपासून शरीराला थंडावा आणि आराम मिळावा म्हणून श्रीखंड सेवन केले जाते. यामुळे शरीरातील शक्ती सुद्धा तग धरते. जाणकारांच्या मते ज्या व्यक्तीचे शरीर उन्हामुळे शुष्क झाले आहे, याच्या अंगात उर्जा नाही, उत्साह नाही त्या व्यक्तींचे शरीर श्रीखंड खाल्ल्यानंतर अगदी ताजेतवाने होते. उन्हाळ्यातील उष्णतेचा प्रतिकार करताना थकवा येऊ शकतो शरीरातील ऊर्जा व शक्ती टिकून राहावी यासाठी श्रीखंड हे रसायनाप्रमाणे काम करते. (Top Marathi News)
उन्हाळ्यामुळे ज्यांना उत्साह वाटत नाही शक्ती हवी असेल त्यांना श्रीखंड हे उत्तम असते. श्रीखंड पचायला थोडे जड असते, आंबवलेले असते त्यामुळ; बरेच जण खाण्याचे टाळतात परंतु घरी छान दही लावून ते सुती कापडात आठ दहा तास बांधून त्यातले पाणी पूर्ण गेल्यावर त्याचा चक्का करावा. त्या चक्क्यात केशर खडीसाखर थोडे दूध दालचिनी आणि थोडीशी सुंठ पावडर मिसळून केलेलं श्रीखंड हे कफवर्धक ठरत नाही. म्हणून उन्हाळ्याच्या सुरुवातीचा हा सण श्रीखंड खाऊन साजरा केला जातो. (Latest Marathi Headline)
श्रीखंड रेसिपी
साहित्य
४ वाटी दही, ४ वाटी पिठी साखर, चवीसाठी वेलची पावडर, आवडीनुसार सुकामेवा
कृती
श्रीखंड बनवण्यासाठी सर्वप्रथम चक्का बनवावा लागतो. त्यासाठी सर्वप्रथम एक पांढरे स्वच्छ कापड घ्या आणि ते कापड एका भांड्यावर घाला आणि मग त्यामध्ये दही घाला. दही घातल्यानंतर त्यामध्ये असणारे पाणी भांड्यामध्ये गाळून घ्या. त्यानंतर कपड्यामध्ये उरलेले घट्ट दही त्याच कपड्यात पोटली सारखे बांधून, एका ठिकाणी ६ ते ७ तास टांगून ठेवा किंवा त्यापेक्षा जास्त वेळ देखील टांगून ठेवू शकता. जेणेकरून दहयामध्ये असलेले सर्व पाणी निघून जाईल. (Top Stories)
आता ते घट्ट दही किंवा चक्का कापडामधून काढून घेवून त्यामध्ये साखर घाला आणि ते चमच्याने १० ते १५ मिनिटे चांगले मऊ आणि क्रीम सारखे होईपर्यंत फेटून घ्या.
मग त्यामध्ये वेलची पावडर आणि काजू आणि बदामचे तुकडे घाला आणि ते मिक्स करा. श्रीखंड तुम्हाला एकदम थंड हवे असेल तर ते १ तास फ्रीजमध्ये ठेवा आणि कमी थंड हवे असल्यास ते फ्रीजमध्ये ठेवू नका, आणि गरमागरम पुरी सोबत सर्व्ह करा. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics