Home लाईफ स्टाईल Holi : जीवनातील अनेक समस्या सोडवण्यासाठी होळीच्या राखेचे करा ‘हे’ उपाय
लाईफ स्टाईल

Holi : जीवनातील अनेक समस्या सोडवण्यासाठी होळीच्या राखेचे करा ‘हे’ उपाय

0

होळी या सणाचे धार्मिक तसेच आध्यात्मिक महत्त्व हिंदू धर्मात विशेष मानले जाते. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी रात्री सर्वत्र होलिका दहन केले जाते. होलिका दहन म्हणजे आपल्यातील सर्व वाईट गुण, वाईट प्रवृत्ती, नकारात्मक विचार यांना जळणाऱ्या होळीच्या स्वाधीन करून चांगले विचार आणि सद्गुण अंगी अवलंबणे होय. होळी केवळ लाकडू रचून त्याला हार घालून पेटवणे एवढेच नाहीये. जेव्हा होळी पेटवली जाते तेव्हा होळीमध्ये जाळण्यासाठी ठेवली जाणारी लाकडे ही विशिष्ट झाडांची, मंत्रोच्चाराने प्रभावित केलेली असतात. त्यामुळे जेव्हा होळी संपूर्णपणे जळून राख बनते तेव्हा ती राख अतिशय खास असते. त्यामुळे ही राख आपल्या आयुष्यातील अनेक समस्या कमी करण्यासाठी, त्यांचे निवारण करण्यासाठी मोलाची भूमिका निभावते. मग होळीच्या राखेचे कोणते उपाय केले जाऊ शकतात आणि त्या उपायांमुळे कोणते लाभ होऊ शकतात चला जाणून घेऊया. (Holi)

नोकरी असेल किंवा तुमचा व्यवसाय असेल त्यात सतत समस्या येत असतील तर तुम्ही होळीच्या राखेचा उपाय करून तुम्ही लाभ मिळवू शकता. यासाठी होळी दहनाच्या वेळी होळीची उलट्या दिशेने प्रदक्षिणा घालत असताना थोडी राख लावा. तसेच कार्यक्षेत्रातील सर्व समस्या दूर होऊ देत आणि तुम्हाला यश मिळू दे अशी प्रार्थना करा. (Marathi)

होलिका दहन झाल्यानंतर उरलेली ही राख घरात शिंपडल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात शांतता नांदते. घरातील वादविवाद, भांडणे संपतात आणि कुटुंबात प्रेम वाढते. वास्तुदोषही दूर यामुळे होतात. या राखेने स्नान केल्याने ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी होतो. होलिका दहनाची भस्म आणून ती घरात शिंपडल्याने तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मकता वाढते. (Todays Marathi Headline)

Holi

होलिका दहनाच्या राखेचा वापर करून पैशाशी संबंधित समस्या कमी होऊ शकतात. यासाठी होळीची राख लाल कापडात घेऊन त्यात सात छिद्रे असलेले एक नाणे ठेवून ते कापड बांधून घरातील कपाटाच्या तिजोरीत ठेवावी. असे केल्याने आर्थिक फायदा होतो आणि कुटुंबात समृद्धीही येते. ही राख छोट्या कपड्यात बांधून तुम्ही तुमच्या पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता. यामुळे पैशाचा ओघ कायम राहील आणि उत्पन्न वाढेल. लाल कपड्यात बांधलेली राख कायम पैसे असलेल्या ठिकाणी म्हणजेच तिजोरी, कपाट किंवा तुमच्या पैशांचा गल्ला, ड्रॉवर याठिकाणी ठेवावी या उपायाने पैशाची तंगी दूर होण्यास मदत होते. (Top Marathi News)

घरावर असणाऱ्या वाईट प्रवृत्तींच्या नजरा दूर पळवून लावण्यासाठीसुद्धा ही राख फायद्याची. यासाठी होलिका दहनानंतर दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास राख आणा आणि यामध्ये मीठ, राई मिसळून ती घरातील गुप्त स्थानी ठेवा.

घरातील जी व्यक्ती सतत आजारी असते त्यांनी साधारण होलिका दहनापासून एक महिना कपाळावर ही राख टीळा म्हणून लावावी. याचे परिणाम लगेचच दिसू लागतील. नवग्रहांच्या दुष्परिणामांना टाळण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात होळीची राख मिसळावी. यामुळं आर्थिक आणि शारीरिक फायदा होतो. (Latest Marathi Headline)

=======

Marathi : ‘मराठी भाषा गौरव दिना’चा इतिहास आणि माहिती

=======

होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी पहाटे, थोडी राख घराच्या कोपऱ्यात उडवा. हा उपाय सकाळच्याच वेळेत करा. एक बाब लक्षात ठेवा की इतर कुणी हे पाहणार नाही. यामुळं गृहक्लेश दूर होण्यासोबतच घरातील सदस्यांमध्ये असणारे मतभेदही दूर होतील. (Top Stories)

होलिका दहनाची राख एका कपड्यात बांधून आपल्या घराच्या, दुकानाच्या किंवा ऑफिसच्या गेटवर कोणाच्या नजरेत न येईल अशा पद्धतीने टांगल्यास व्यवसायात वृद्धी होते आणि वाईट नजरेपासून संरक्षण होते. तसेच रखडलेला व्यवसाय पुन्हा सुरू होतो असे मानले जाते. यासोबतच नकारात्मक ऊर्जाही निघून जाते. (Social News)

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Akshaya Tritiya
लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला मीठ का खरेदी केली जाते?

आता लवकरच अक्षय्य तृतीयेचा सण येत आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला...

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!