Home आंतरराष्ट्रीय Dubai City of Gold : चक्क सोन्याचं शहर
आंतरराष्ट्रीय

Dubai City of Gold : चक्क सोन्याचं शहर

0

दुबईचे नाव आल्यावर समोर येतात त्या गगनचुंबी इमारती आणि सोन्याच्या दागिन्यांनी सजलेली दुकाने. दुबई हे जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या व्यापार केंद्रांपैकी एक आहे. इथे दरवर्षी ५०० टनांपेक्षा जास्त सोन्याचा व्यापार होतो. भारत, दुबईच्या सोन्याच्या प्रमुख खरेदीदारांपैकी एक आहे. भारताकडे येणारे पुरुष प्रवासी २० ग्रॅमपर्यंत सोने हे दागिन्यांच्या स्वरूपात आणि महिला प्रवासी ४० ग्रॅमपर्यंत सोने हेही दागिन्यांच्या स्वरूपात सीमाशुल्काशिवाय आणू शकतात. दुबईमध्ये सोने स्वस्त आहे कारण तिथे आयात शुल्क फारच कमी आहे. त्यामुळे भारतासह जगभरातील पर्यटकांसाठी एक प्रमुख पर्यटन आकर्षण झाले आहे. ( Dubai City of Gold )

 

या सर्वांसाठी आता एक नवी बातमी आली आहे, ती म्हणजे, दुबईमध्ये चक्क सोन्याचे शहर तयार करण्यात येत आहे. या शहरात दुबईमधील सर्व सोन्याची दुकाने एकत्र बघता येणार आहेत. सिटी ऑफ गोल्ड असे या शहराला नाव देण्यात येणार असून जगातील असे हे पहिलेच शहर ठरणार आहे. जगभरातील सर्वात जास्त सोन्याचा व्यापार दुबईमध्ये होतो. दुबईमध्ये जे पर्यटक जातात, ते परत येतांना हमखास सोन्याचे दागिने घेऊन येतात, अशाच पर्यटकांसाठी आता खुशखबरी आली आहे. दुबईमध्ये चक्क ‘सोन्याचे शहर’ उभारण्यात येत आहे.

या सोन्याच्या शहरामधील रस्तेही गोल्ड स्ट्रीट म्हणून ओळखण्यात येणार आहेत. या शहरात १,००० किरकोळ सोन्याच्या दुकाने असतील. यामुळे या शहराला “सिटी ऑफ गोल्ड” ची ओळख मिळणार आहे. दुबईमध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत. त्यात जगातील सर्वात उंच इमारत, बुर्ज खलिफा, भव्य दुबई मॉल, कृत्रिम बेट पाम जुमेराह, दुबई डेझर्ट सफारी, दुबई फ्रेम आदीचा समावेश आहे. आता त्यात या सोन्याच्या शहराची भर पडणार आहे. यामुळे आधीच आकर्षणाचे केंद्र असलेल्या दुबईला एक नवीन ओळख मिळणार आहे. ( Dubai City of Gold )

हे सोन्याचे शहर आणि गोल्ड स्ट्रीट दुबईच्या देहरा या सर्वात मोठ्या शहरात होत आहे. येथील रस्तेही सोन्याचे असणार आहेत. देइरा येथे एक प्रमुख पर्यटन केंद्र तयार करण्यासाठी या सिटी ऑफ गोल्डची संकल्पना राबवण्यात येत आहे. या प्रकल्पावर जे अधिकारी काम करत आहेत, त्यांनी सांगितले की, हा प्रकल्प एकाच छताखाली किरकोळ विक्री, घाऊक व्यापार, आणि गुंतवणूक एकत्र व्हावी या दृष्टीकोनातून तयार करण्यात येत आहे. यामुळे सोने आणि दागिने क्षेत्रासाठी एक एकीकृत परिसंस्था निर्माण होणार आहे.

दुबईतील मुख्य “गोल्ड सिटी” किंवा प्रसिद्ध दुबई गोल्ड सूक, देइरा या जुन्या व्यवसाय जिल्ह्यात तयार होत आहे. हा परिसर उच्च शुद्धतेच्या सोन्याचे दागिने आणि गोल्ड बार विकणाऱ्या शेकडो दुकानांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. देइरा हे दुबईतील सर्वात मोठे शहरही असून हे जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या व्यापार केंद्रांपैकी प्रमुख केंद्र मानले जाते. याशिवाय देइरामधील पारंपारिक मसाले आणि परफ्यूमही जगभर ओळखले जातात. ( Dubai City of Gold )

=======

हे देखील वाचा : Reza Pahlavi : इराणची राणी सत्तांतरासाठी मैदानात

=======

यामुळेच या देइरामध्ये आता सिटी ऑफ गोल्ड या नावानं प्रकल्प राबवण्यात येत आहे. या सोन्याच्या शहरातील गोल्ड स्ट्रीटमध्ये किमान १,००० किरकोळ सोन्याची दुकाने असणार आहेत. या गोल्ड स्ट्रीटसाठी योजना, डिझाइन आणि इतर नियोजनाबाबत अधिक तपशील प्रसिद्ध केले जाणार असले तरी सध्या या गोल्ड स्ट्रीचटा एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. दुबई डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमी अँड टुरिझमचा भाग असलेल्या दुबई फेस्टिव्हल्स अँड रिटेल एस्टॅब्लिशमेंटचे सीईओ अहमद अल खाजा यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार, सोने हे दुबईच्या सांस्कृतिक आणि व्यावसायिक रचनेचा वारसा आहे, शिवाय समृद्धी आणि उद्यमशीलतेच्या चिरस्थायी भावनेचे प्रतीक आहे. त्यामुळेच दुबईमध्ये होणा-या गोल्ड स्ट्रीटमुळे येथे येणा-या पर्यटकांच्या संख्येत अधिक भर पडेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

दुबईमध्ये सोन्यावर कोणताही जीएसटी नाही, फक्त ५% व्हॅट आहे. तसेच दुबईमध्ये सोन्याच्या दागिन्यांवर मेकिंग शुल्क भारतापेक्षा लक्षणीयरीत्या कमी आहे, ज्यामुळे एकूण किंमत आणखी कमी होते. दुबईमध्ये सोन्याच्या शुद्धतेबाबत कडक नियम आहेत, ज्यामुळे भेसळ कमी होते आणि ग्राहकांचा विश्वास वाढतो. या सर्व घटकांमुळे, भारतापेक्षा दुबईमध्ये सोने स्वस्त आहे. आता दुबईमध्ये गोल्ड स्ट्रीट आणि सिटी ऑफ गोल्ड तयार झाल्यावर येथून होणा-या सोनेखरेदीमध्येही वाढ होण्याची आशा आहे. ( Dubai City of Gold )

सई बने

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Katrina Kaif
आंतरराष्ट्रीय

Jiang Xueqin : चीनच्या नॉस्ट्राडॅमसने सांगितले ट्रम्पचे भविष्य

अमेरिका-इराण युद्धामध्ये पंधरा दिवसांचा विराम आला आहे. यात चीनची भूमिका असल्याची माहिती...

Jewellery
आंतरराष्ट्रीय

Jared Kushner : ट्रम्पचा जावई आहे तरी कोण

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर कायमचा विराम आणण्यासाठी पाकिस्तानची राजधानी...

Mobile
आंतरराष्ट्रीय

First Lady Melania Trump : अमेरिकेच्या फर्स्ट लेडीसाठी शाही सवारी

इराणमध्ये सत्तांतर करण्याच्या हेतूने अमेरिकेने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरुद्ध लष्करी मोहीम...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!