Home लाईफ स्टाईल Airpark : ‘या’ शहरात प्रत्येक घरासमोर पार्क आहेत प्रायव्हेट जेट, दैनंदिन कामासाठी केला जातो याच जेटचा वापर
लाईफ स्टाईल

Airpark : ‘या’ शहरात प्रत्येक घरासमोर पार्क आहेत प्रायव्हेट जेट, दैनंदिन कामासाठी केला जातो याच जेटचा वापर

0

आजकाल तर प्रत्येकाच्या घराबाहेर आपल्याला कार, गाड्या पार्क केलेल्या दिसतात. काही घरांमध्ये तर जितके सदस्य तितक्या गाड्या दिसतात. आता घरांसमोर कार, टु व्हीलर, सायकल आदी वाहनं दिसणे खूपच सामान्य आहे. काही घरांमध्ये फार फार तर टेम्पो, ट्रक, खाजगी बस दिसू शकतील. पण जर आम्ही तुम्हाला असे सांगितले की, एक असे शहर आहे जिथे प्रत्येक घरासमोर खाजगी जेट अर्थात विमान पार्क केलेले दिसते तर? तुम्ही म्हणाल काहीही काय? असे थोडी असते. प्रत्येक घरात विमान….शक्यच नाही. मात्र हे खरे आहे. जगात एक असे शहर आहे, जिथे प्रत्येक घरासमोर तुम्हाला एक विमान पार्क केलेले दिसेल. (Top Stories)

आपल्याला घरभर किती महागडी गाडी पार्क केलेली दिसते त्यावरून त्यांच्या श्रीमंतीचा अंदाज बांधता येतो. जितकी महाग गाडी तितके श्रीमंत लोकं. मात्र जगात एका शहरामध्ये तर प्रत्येकाच्या घरासमोर थेट खाजगी जेटच पार्क केलेले दिसते. म्हणजे ते शहर पूर्ण श्रीमंत लोकांनी भरलेले आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतातील कॅमेरॉन एअर पार्क गाव हे विमान वाहतुकीसाठी एक अतिशय खास गाव आहे. या गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे खासगी जेट आहे. गावात सुमारे १२४ घरे आहेत. प्रत्येक घरासमोर स्वतःचे खासगी जेट पार्क केलेले असते. जसे आपण आपल्या लहान मोठ्या कामासाठी गाड्यांचा वापर करतो तसे ते लोकं या जेटचा वापर करतात. (Top Marathi News)

कॅमेरॉन एअर पार्क या गावाची स्थापना १९६३ साली झाली. खरे तर दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेतील वैमानिकांची संख्या लक्षणीय वाढली होती. युद्धासाठी अनेक विमानतळ बांधले गेले. युद्ध संपल्यानंतर ते बंद झाले नाहीत. सरकारने ही एअरफील्ड्स निवासी एअर पार्क म्हणून सोडली. नंतर सरकारने या भागात निवृत्त वैमानिकांची सोय करण्याचा निर्णय घेतला. कॅलिफोर्नियातील कॅमेरॉन एअर पार्क हे असेच एक एअरफिल्ड आहे, ज्या ठिकाणी प्रत्येक कुटुंबाचे स्वतःचे खासगी जेट आहे. हॉटेलला जाण्यासाठी, ग्रोसरी आणण्यासाठी ते विमानातून जातात. (Latest Marathi Headline)

Airpark

कॅमेरॉन एअर पार्कचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रस्त्यांची नावे, बोईंग रोड, सेस्ना ड्राइव्ह, इत्यादी सर्व रस्त्यांची नावे विमानचालनाशी संबंधित आहेत. या शहरात लोक त्यांच्या खाजगी विमानांनी प्रवास करतात हे एक सामान्य दृश्य आहे. ते कामासाठी आणि इतर गरजांसाठी खाजगी जेट वापरतात. या शहरांमधील रस्ते खाजगी विमानांना विमानतळावर जाण्यासाठी बांधलेले आहेत. इतर वाहनेही इथे चालवता येतात, पण इथल्या लोकांचे मुख्य वाहतुकीचे साधन खाजगी विमानेच आहेत. या शहरात १२४ घरे आणि कॅमेरॉन पार्क विमानतळ आहे. बाहेरून येणाऱ्या लोकांना इथे राहणाऱ्यांच्या परवानगीशिवाय प्रवेश नाही. (Top Trending News)

=======

Alaska : या देशात सूर्यदर्शन आता ६५ दिवसांनी होणार… !

=======

कॅमेरून एअरपार्कमधील रस्ते धावपट्टीसारखे रुंद रचले आहेत. ज्यामुळे विमानाच्या उड्डाणासाठी लागणारा प्लॅटफॉर्म म्हणून त्यांचा वापर होतो. कॅमेरून एअरपार्कमध्ये रस्त्यावरील चिन्हे आणि लेटरबॉक्सेस सामान्य उंचीपेक्षा किंचित खाली बांधण्यात आली आहेत. जेणेकरून विमानाच्या पंखांना किंवा विमानाच्या इतर कोणत्याही भागाचे नुकसान होणार नाही. तसेच इथल्या प्रत्येक घरामध्ये हँगरचे बांधकाम करण्यात आले आहे. हँगर म्हणजे अशी जागा जिथे विमान किंवा अवकाशयान ठेवले जाते. हि जागा यासाठी विशेष डिझाइन केलेली इमारत असते. यासाठी धातू, लाकूड किंवा काँक्रीटचा वापर केला जातो. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

लाईफ स्टाईल

Vallabhacharya : वल्लभाचार्य जयंती – कोण होते कृष्णभक्त वल्लभाचार्य?

आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अकरावी तिथी अर्थात. आज चैत्र महिन्यातील एकादशीचा...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!